Monday, July 18, 2011

Shri BadriNarayan Stotra श्री बद्रीनारायण स्तोत्र

Shri BadriNarayan Stotra
This Stotra is in Sanskrit. It is a beautiful creation of Shri Shridhar Swami. This was created when Shri Shridhar Swami was at Badrikashrama in 1942.
1 Shri Shridhar Swami says that I know Narayana is Atmaswaroop, ParBrahmaroop. That Atmaswaroop is destroyer of maya (maya means “that” which is not true). Hence I pray Badrinarayan.
2 Brahma makes us holy, it is beyond maya. It is very beautiful. When anybody acquires this knowledge becomes one with that Brahma. Just like that I have become one with Badrinarayan. Hence I pray Badrinarayan.
3 Brahma and Maya are not two separate entities, they are one. Treating them separate causes fear. However I know that Oneness and I pray my guru Badrinath.
4 If anybody feels that The Vishwa (World) and Maya are both present, then it is a totally wrong understanding and a lie like telling that a barren woman has given a birth to a child. However I know that Oneness rest with Badrinath and hence I pray my guru Badrinath.
5 If it is felt that Jiva, Ishwar and Vishwa are there because of false knowledge; let it be there.
However I have become one with Badrinath and thus I have acquired true knowledge. Hence I pray my guru Badrinath.
This Shri Narayan-Panchak is very holy and makes free from bondage of false knowledge and gives Mukti. Anybody who listens’s this stotra or by reciting this stotra becomes free from bondage of life.
Here completes BadriNarayan stotra created by Shri Shridhar Swami. 
श्री बद्रीनारायण स्तोत्र
यो नारायण आत्मरूप इति यज्जानाम्यहं तत्त्वतः I
यस्मिन् सर्वमिदं प्रकल्पितमहो रज्ज्वां यथाहिर्वृथा II
मायायाविनिवर्तकं निजमहो ब्रह्मेति यः श्रूयते I
नित्यं तं बदरीश्वरं गुरूवरं सच्चित्सुखं नौम्यहम् II १ II
ब्रह्मैक्यं निजपावनं सुरुचिरं मायाविहीनं परं I
ज्ञात्वा सर्वमतीत्य मायिकमिदं जीवेश-विश्वादिकम् II
यस्मिन्नित्यमहं जले जलमिव प्राप्यैकतां संस्थितः I
नित्यं तं बदरीश्वरं गुरूवरं सच्चित्सुखं नौम्यहम् II २ II
एकस्मिन् कथमीदृशं जगदिदं मायाSपि वा भाव्यते I
नैकस्मिन्नितरस्य भाव इति यत्सत्यं श्रुते: सम्मतम् II
द्वैतं हेतुरहो भयस्य गदितं ज्ञात्वैक्यमालंब्य च I
नित्यं तं बदरीश्वरं गुरूवरं सच्चित्सुखं नौम्यहम् II ३ II
वंध्यापुत्रजनिर्यथैव किलतद्धेतुस्तथैवं मृषा I
विश्वं, तस्यच कारणं तदपि चेन् मिथ्येन्द्रजालादिवत् II
यस्मिन्नैव जगन्नहेतुरपि या मायाSस्य वा प्रस्फुरेत् I
नित्यं तं बदरीश्वरं गुरूवरं सच्चित्सुखं नौम्यहम् II ४ II
भ्रान्त्युत्थं यदि वा भवेत्भवतु तज्जीवेश-विश्वादिकम् I
मायामात्रमिदं न मेSस्ति नितरां भ्रान्तेरधिष्ठानतः II
यस्मिन् भूम्नि नरश्चयोषिदिति वा नामापि न श्रूयते I
नित्यं तं बदरीश्वरं गुरूवरं सच्चित्सुखं नौम्यहम् II ५ II
जीवन्मुक्तीप्रदं शुद्धं श्रीनारायण-पंचकम् I
पठनाच्श्रवणादस्य जीवन्मुक्तिमवाप्नुयात् II ६ II
इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्रीधरस्वामिना विरचितं श्री बद्रीनारायण स्तोत्र संपूर्णं II

श्री बद्रीनारायण स्तोत्र 
मराठी अर्थ:
१) जो नारायण आत्मरूप (परब्रह्मरूप) आहे हे मी खरोखर जाणतो, ज्याप्रमाणे दोरीच्या ठिकाणी सर्पाची खोटी कल्पना केली जाते, त्याप्रमाणे अहो ! ज्याच्या ठिकाणी हे सर्व जग कल्पिले जाते, ज्यास मायेचा नाश करणारे आत्मतेज (ब्रह्म) असे म्हणतात त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ट बदरीनाथांचे मी स्तवन करितो.
२) स्वतःला पावन करणारे, सुंदर, मायाहीन, सर्व असे ब्रह्मैक्य जाणून मायिक असे जीव, ईश्वर व विश्व इत्यादींच्या पलिकडे जाऊन ज्याप्रमाणे पाण्यांत पाणी एकरूप होते त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये मी एकरूप होऊन राहिलो आहे त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ट बदरीनाथांचे मी स्तवन करितो.
३) एका वस्तूमध्ये दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व असू शकत नाही हे श्रुतींनी मान्य केले आहे तर त्या एका (ब्रह्मा) मध्येच हे सर्व जग किंवा हि माया कशी अभिव्यक्त होऊ शकते? द्वैत हेच भयाचे मूळ सांगितले आहे. अद्वैत जाणून व त्याचा अवलंबकरून त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ट बदरीनाथांचे मी स्तवन करितो.
४) ज्याप्रमाणे खरोखर वंध्यापुत्रजन्म खोटा आहे त्याप्रमाणे त्याचा हेतुहि मिथ्या आहे. विश्व व त्याचे कारण हे जर असतील तर तेहि इंद्रजालाप्रमाणे मिथ्या आहेत.ज्यांचे ठिकाणी जगत व त्याचे मूळकारण माया हे (परमार्थिक धृष्ट्या) स्फुरणार नाहीत त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ट बदरीनाथांचे मी स्तवन करितो.
५) अथवा जीव, ईश्वर, विश्वादि सर्व भ्रांतीने उत्पन्न झाले असतील तर असू द्या. ते फक्त मायास्वरूप आहे व मी भ्रांतीचे अधिष्ठान असल्यामुळे त्याचा माझ्याशी मुळींच संबंध नाही. ज्या भूमाच्या ठिकाणी स्त्री व पुरुष हें नांव सुद्धा ऐकू येत नाही त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ट बदरीनाथांचे मी स्तवन करितो.
६) हें बद्रीनारायण पंचक शुद्ध व जीवन्मुक्तप्रद आहे. त्याच्या श्रवणाने किंवा पठणाने जीवन्मुक्ती प्राप्त होईल.
अशारीतीने श्रीमत् परमहंस परिव्रजाकाचार्य सद्गुरु भगवता श्रीधर स्वामिनी रचिलेले श्री बद्रीनारायण स्तोत्र संपूर्ण झाले.
Shri BadriNarayan Stotra श्री बद्रीनारायण स्तोत्र








Custom Search


No comments: