Sunday, July 3, 2011

Shri Vishnu Panjar Stotram विष्णुपंजरस्तोत्र


Shri Vishnu Panjar Stotram
This stotra is from Garud Purana. It has arisen in the conversation in-between God Vishnu and God Rudra. This stotra is in Sanskrit. Panjar means Kavacha. Devotee is asking God Vishnu to protect him from all sides- East-West-North-South/South-east-South-west-North-east-North-west and from above and from down. Finally he is asking God Vishnu to protect his body. Earlier this stotra was told to Goddess Eashani Katyayani and then she has defeated and killed demon Mahishasur.
Anybody who recites this stotra every day with faith, concentration and devotion receives a strong body, protection by God Vishnu and he can become victorious by defeating his enemies.
1 O! God Govind I bow to you, please take your Sudarshan chakra in your hand and protect me from East. O! God Vishnu I surrender to you.
2 O! God Padmanabha I bow to you, please take Koumodaki Gada (Weapon) in your hand and protect me from South. O! God Vishnu I surrender to you.
3 O! God Purushottam I bow to you, please take hal (Plough) named as Sounandan in your hand and protect me from West. O! God Vishnu I surrender to you.
4 O! God Pundarikasha! I bow to you, please take musal (Pestle) named as Shatan in your hand and protect me from North. O! God Jagannatha I surrender to you.
5 O! God Hare! I bow to you, please take Khadga, Charma and all other weapons in your hand and protect me from North-East (Eshanya). O! God you are destroyer of demons, I surrender to you.
6 O! God Yadnya-Varaha! I bow to you; please take Panchyajanya and Padma (weapon) named as Anughosha in your hand and protect me from South-East (Agneya). O! God Vishnu, I surrender to you.
7 O! God Bhagwan Nrusinha! You are lustrous like Sun and like calm moonlight I bow to you, please take Khadga (weapon) in your hand and protect me from South-West (Nairutya).
8 O! God Bhagwan Hayagriva! I bow to you, please ware Vaijayanti Mala (Garland made up of holy basil) and Shri Vatsa (Neck ornament) around your neck and protect me from North-West (Vayavya).
9 O! God Janardan I bow to you, please ride on Vainateya Garud (An Eagle), your vehicle and protect me from above (in the sky).
10 O! God Ajit (Victorious)! O! God Aparajit (who is never defeated)! I always bow to you. O! God Kurmaraj! I bow to you. O! God Mahamin! I bow to you. O! Satya-Swaroop God Vishnu! Protect my hands, head, fingers etc. and all parts of my body. I always bow to you.
11 O! Rudra! This Vishnu Panjar stotra, earlier in vary old days was told to Eshani Katyayani by me (Shrihari). By dignity (impact) of this stotra Eshani Katyayani defeated and destroyed demons like Mahishasoor and Raktabij; who were troubling Gods. Any person who will recite/listen this Shri Vishnu Panjar Stotram; daily with devotion, concentration and faith in mind; will conquer all his enemies and become victorious.
Here completes this Shri Vishnu Panjar Stotram from Garud purana; arisen from the discussion in between God ShriHari and God Rudra.
विष्णुपंजरस्तोत्रं
प्रवक्ष्याम्यधुना ह्येतव्दैष्णवं पंजरम् शुभं I
नमो नमस्ते गोविंद चक्रं गृह्य सुदर्शनम् II १ II
प्राच्यां रक्षस्व मां विष्णो त्वामहं शरणं गतः I
गदां कौमोदकीम् गृह्य पद्मनाभ नमोस्तु ते II २ II
याम्यां रक्षस्व मां विष्णो त्वामहं शरणं गतः I
हलमादाय सौनन्दम् नमस्ते पुरुषोत्तम II ३ II
प्रतीच्यां रक्ष मां विष्णो त्वामहं शरणं गतः I
मुसलं शातनं गृह्य पुण्डरीकाक्ष रक्ष मां II ४ II
उत्तरस्यां जगन्नाथ भवन्तं शरणं गतः I
खड्गमादाय चर्माथ अस्त्रशस्त्रादिकं हरे II ५ II
नमस्ते रक्ष रक्षोघ्न ऐशान्यां शरणं गतः I
पांचजन्यं महाशंखमनुघोष्यम् च पंकजं II ६ II
प्रगृह्य रक्ष मां विष्णो आग्नेय्यां यज्ञशूकर I
चंद्रसूर्यं समागृह्य खड्गं चान्द्रमसं तथा II ७ II
नैऋत्यां मां च रक्षस्व दिव्यमूर्ते नृकेसरिन् I
वैजयंतीम् सम्प्रगृह्य श्रीवत्त्सं कंठभूषणं II ८ II
वायव्यां रक्ष मां देव हयग्रीव नमोSस्तु ते I
वैनतेयं समारुह्य त्वन्तरिक्षे जनार्दन II ९ II
मां रक्षस्वाजित सदा नमस्तेSस्त्वपराजित I
विशालाक्ष समारुह्य रक्ष मां त्वं रसातले II १० II
अकूपार नमस्तुभ्यं महामीन नमोSस्तु ते I
करशीर्षाद्यगुलीषु सत्य त्वं बाहुपंजरम् II ११ II
कृत्वा रक्षस्व मां विष्णो नमस्ते पुरुषोत्तम I
एतदुक्तम् शंकराय वैष्णवं पंजरं महत् II १२ II
पुरा रक्षार्थमीशान्याः कात्यायन्या वृषध्वज I
नाशयामास सा येन चामरं महिषासुरम् II १३ II
दानवं रक्तबीजं च अन्यांश्च सुरकंटकान् I
एतज्जपन्नरो भक्त्या शत्रून् विजयते सदा II १४ II
II इति श्री गरुड पुराणे श्री हरी रुद्र संवादे विष्णुपंजरस्तोत्रं संपूर्णं II
विष्णुपंजरस्तोत्रं चा मराठी अर्थ:
हे रुद्र मी आता विष्णुपंजरस्तोत्र सांगत आहे. हे स्तोत्र अत्यंत कल्याणकारी आहे.
१) हे गोविंद आपल्याला माझा नमस्कार आहे. आपण सुदर्शन चक्र हातात घेऊन पूर्व दिशेकडून माझे रक्षण करा. हे विष्णो ! मी आपल्याला शरण आलेलो आहे.
२) हे पद्मनाभ आपल्याला माझा नमस्कार आहे. आपण आपली कौमोदकी गदा हातात घेऊन दक्षिण दिशेकडून माझे रक्षण करा. हे विष्णो ! मी आपल्याला शरण आलेलो आहे.
३) हे पुरुषोत्तम आपल्याला माझा नमस्कार आहे. आपण आपले सौनंद नावाचे हल हातात घेऊन पश्चिम दिशेकडून माझे रक्षण करा. हे विष्णो ! मी आपल्याला शरण आलेलो आहे.
४) हे पुंडरीकाक्ष आपल्याला माझा नमस्कार आहे. आपण आपले शातन नावाचे मुसळ हातात घेऊन उत्तर दिशेकडून माझे रक्षण करा. हे जगन्नाथ ! मी आपल्याला शरण आलेलो आहे.
५) हे हरे ! आपल्याला माझा नमस्कार आहे. आपण आपले खड्ग, ढाल आदि अस्त्र- शस्त्र हातात घेऊन ईशान्य दिशेकडून माझे रक्षण करा. हे दैत्यविनाशक ! मी आपल्याला शरण आलेलो आहे.
६) हे यज्ञवराह ! आपल्याला माझा नमस्कार आहे. आपण आपले पांच्यजन्य नावाचा महाशंख आणि अनुघोष नावाचे पद्म हातात घेऊन आग्नेय दिशेकडून माझे रक्षण करा. हे विष्णो ! मी आपल्याला शरण आलेलो आहे.
७) हे दिव्यशरीर असलेल्या भगवान नृसिंहा ! आपल्याला माझा नमस्कार आहे. आपण सूर्यासारखे दैदिप्यमान व चन्द्रासारखे चमत्कृत खड्ग हातात घेऊन नैरुत्य दिशेकडून माझे रक्षण करा. हे विष्णो ! मी आपल्याला शरण आलेलो आहे.
८) हे भगवान हयग्रीव ! आपल्याला माझा नमस्कार आहे. आपण वैजयंती माळा व श्रीवत्स नावाचा कंठामध्ये शोभणारा हार घालून वायव्य दिशेकडून माझे रक्षण करा. हे विष्णो ! मी आपल्याला शरण आलेलो आहे.
९) हे जनार्दन ! आपल्याला माझा नमस्कार आहे. आपण वैनतेय गरुडावर आरूढ होऊन अंतरिक्षामध्ये माझे रक्षण करा. हे विष्णो ! मी आपल्याला शरण आलेलो आहे.
१०-११) हे अजित ! हे अपराजित आपल्याला माझा नमस्कार आहे. हे कूर्म-राज आपल्याला माझा नमस्कार आहे. हे महामीन आपल्याला माझा नमस्कार आहे. हे सत्यस्वरूप महाविष्णो ! आपण आपल्या बाहूंचा उपयोग करून माझे हात, डोके, माझी हात-पायाची बोटे आदि माझ्या सर्व अंग-प्रत्यंगाचे रक्षण करा. हे पुरुषोत्तम ! आपल्याला माझा नमस्कार आहे.
१२-१३) हे वृषध्वज ! मी फार प्राचीनकाळी सर्व प्रथम भगवती ईशानी कात्यायनीचे रक्षणासाठी हे विष्णुपंजरस्तोत्र तीला सांगितले होते. या स्तोत्राच्या प्रभावाने त्या कात्यायनीने स्वताला अमर समजणाऱ्या महिषासूर, रक्तबीज आणि देवांना त्रास देणाऱ्या अन्य दानवांचा नाश केला.
१४) या विष्णुपंजरस्तोत्र नावाच्या स्तोत्राचा जो मनुष्य भक्तीपूर्वक जप करतो, तो नेहमी आपल्या शत्रूंवर विजय मिळवतो.
अशा प्रकारे हे गरुड पुराणांतील श्री हरी-रुद्र संवादांत आलेले विष्णुपंजरस्तोत्र संपूर्ण झाले.
Shri Vishnu Panjar Stotram









Custom Search

No comments: