Saturday, October 29, 2011

Brahma Kruta ShriKrishana Stotra

Brahma Kruta ShriKrishana Stotra

Brahma Kruta ShriKrishana Stotra is in Sanskrit. It is a beautiful creation of God Brahma. God Brahma has praised God ShriKrishna in this stotra. This is a very pious stotra. Whosoever recites/listens this stotra early in the morning his sins get vanished, bad dreams covert into good dreams, he becomes famous, and his family becomes famous and increases. Ashvin Vadya Chaturdashi Today i.e. 26th October 2011 we are celebrating Narakchaturdashi. God ShriKrishna had killed demon king Narakasur on this day that is Ashvin Vadya Chaturdashi. However when Narakasur was sure of his end of life by God Shrikrishna he (Narkasur) asked for a blessing from God ShriKrishna which was awarded by God; according to which whosoever makes a special bath on this day early in the morning becomes free from Yama Yatana (pains of sins). That is he becomes free from sins. This Diwali day is called as Narkachaturdashi
ब्रह्मकृतं श्रीकृष्ण स्तोत्रम्

कृष्णं वन्दे गुणातीतं गोविन्दमेकमक्षरं I
अव्यक्तमव्ययं व्यक्तं गोपवेषविधायीनम् II १ II
किशोरवयसं शान्तं गोपीकान्तं मनोहरम् I
नवीननीरदश्यामं कोटिकन्दर्पसुन्दरम् II २ II 
वृन्दावनवनाभ्यर्णे रासमण्डलसंस्थितम् I 
रासेश्वरं रासवासम् रासोल्लाससमुत्सुकम् II ३ II
इत्येवमुक्त्वा तं नत्वा रत्नसिंहासने वरे I
नारायणेषौ सम्भाष्य स उवास तदाज्ञया II ४ II
इति ब्रह्मकृतं स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् I
पापानि तस्य नश्यन्ति दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेत् II ५ II
भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्रविवर्धिनी I 
अकीर्तिः क्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वर्धते चिरम् II ६ II
II इति श्रीब्रह्मवैवर्ते ब्रह्मकृतं श्रीकृष्णस्तोत्रं संपूर्णम् II 
ब्रह्मकृत श्रीकृष्ण स्तोत्रम
मराठी अर्थ:

ब्रह्मदेव म्हणाले: जो तिन्ही गुणांच्या पलीकडे असून एकमात्र अविनाशी परमेश्वर आहे. ज्याला कोणतेही विकार नाहीत, जो अव्यक्त व व्यक्तरूप सुद्धा आहे, तसेच जो गोपवेष धारण करतो, त्या गोविंद श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. ज्याला नित्य किशोर अवस्था आहे, जो नेहमी शांत असतो, ज्याचे सौंदर्य करोडो कामदेवांपेक्षा अधिक आहे तसेच जो नूतन पाण्याने भरलेल्या ढगांसारखा श्याम वर्ण आहे त्या अत्यंत मनोहर गोपिवल्लभाला मी नमस्कार करतो. जो वृन्दावनांत रासमंडळांत विराजमान आहे, रासलीलामध्येच जो रममाण आणि त्या आनंदात जो मग्न असतो त्या रासेश्वराला मी नमस्कार करतो. असे म्हणून ब्रह्मदेवांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणांना नमस्कार केला आणि त्यांच्या अनुज्ञेने नारायण व महादेव यांच्या बरोबर बोलत त्या श्रेष्ट रत्नजडीत सिंहासनावर बसले. जो कोणी सकाळी लवकर उठून ब्रह्मदेवांनी केलेल्या ह्या स्तोत्राचा पाठ करेल त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याची वाईट स्वप्ने चांगल्या स्वप्नांत बदलतात. भगवान गोविंदांची भक्ती होऊन पुत्र व पौत्रांची वृद्धी होते. ह्या स्तोत्राच्या पठणाने अपयश नष्ट होऊन चिरकाल सुयशाची प्राप्ती होते. अशारितीने हे ब्रह्मकृत श्रीकृष्ण स्तोत्र भगवान श्रीकृष्णानां अर्पण करू.
Brahma Kruta ShriKrishana Stotra

No comments: