Wednesday, October 19, 2011

Devi 108 pithani Nam Stotra

Devi 108 pithani Nam Stotra

This is a Devi Pithas Name (sacred holy, pious places) Stotra. It is in Sanskrit and from ShriMAT Devi Bhagwat MahaPurana. By listening or reciting the stotra we receive blessings from the Goddess Devi. Anybody visiting these holy places is very fortunate and he along with his relatives live with the Goddess in Devi Loka. . Vyâsa uvacha :-- O King! I will now describe those Pîthas (Sacred places), the mere hearing of which destroys all the sins of men. Hear. I describe duly those places where the persons desiring to get lordly powers and to attain success ought to worship and meditate on the Devî Thus are mentioned all the seats of the Devîs in this stotra and along with that, the chief places in India (the world). He who hears these excellent one hundred and eight names of the Devî as well as Her seats, gets himself freed from all sins and goes to the Loka of the Devî. O Janamejaya! His heart gets purified and is rendered blessed.Many a people have attained success by repeating these one hundred and eight names of the Deity. Any place wherein are kept those names, embodied in a book, becomes free from such dangers as plague, cholera or any misapprehensions from planetary Deities and so forth. Nothing remains to be attained by these persons who repeat these one hundred and eight names. That man, devoted to the Devî, certainly attains blessedness. That saintly person becomes of the nature of the Devî. 

देवी एकशे आठ पीठांची नावे स्तोत्र 
व्यास उवाच श्रुणु राजन्प्रवक्ष्यामि देवीपीठानि सांप्रतम् I येषां श्रवणमात्रेन पापहीनो भवेन्नरः II १ II
येषु येषु च पीठेषूपास्येयं सिद्धिकाङ्क्षिभिः I भूतिकाभैरभिध्येया तानि वक्ष्यामि तत्त्वतः II २ II 
वाराणस्यां विशालाक्षी गौरीमुखनिवासिनि I क्षेत्रे वै नैमिषारण्ये प्रोक्ता लिङ्गधारिणी II ३ II 
प्रयागे ललिता प्रोक्ता कामुकी गंधमादने I मानसे कुमुदा प्रोक्ता दक्षिणे चोत्तरे तथा II ४ II
विश्वकामा भगवती विश्वकामप्रपूरिणी I गोमन्ते गोमती देवी मन्दरे कामचारिणी II ५ II 
मदोत्कटा चैत्ररथे जयन्ती हस्तिनापुरे I गौरी प्रोक्ता कान्यकुब्जे रम्भा तु मलयाचले II ६ II
एकाम्रपीठे सम्प्रोक्ता देवी सा कीर्तिमत्यपी I विश्वे विश्वेश्वरीं प्राहुः पुरुहूतां चा पुष्करे II ७ II 
केदारपीठे सम्प्रोक्ता देवी सन्मार्गदायिनी I मन्दा हिमवतः पृष्टे गोकर्णे भद्रकर्णिका II ८ II 
स्थानेश्वरी भवानी तु बिल्वके बिल्वपत्रिका I श्रीशैल्ये माधवी प्रोक्ता भद्रा भद्रेश्वरे तथा II ९ II 
वाराहशैले तु जया कमला कमलालये I रुद्राणी रुद्रकोट्यां तु काली कालंजरे तथा II १० II 
शालग्रामे महादेवी शिवलिंगे जलप्रिया I महालिंगे तु कपिला माकोटे मूकुटेश्वरी II ११ II 
मायापुर्यां कुमारी स्यात्संताने ललितांबिका I गयायां मंगला प्रोक्ता विमला पुरुषोत्तमे II १२ II
उत्पलाक्षी सहस्राक्षे हिरण्याक्षे महोत्पला I विपाशायाममोघाक्षी पाडला पुंड्रवर्धने II १३ II
नारायणी सुपार्श्वे तु त्रिकुटे रुद्रसुंदरी I विपुले विपुला देवी कल्याणी मलयाचले II १४ II 
सह्याद्रावेकवीरा तु हरिश्चंद्रे तु चंद्रिका I रमणा रामतीर्थे तु यमुनायां मृगावती II १५ II
कोटवी कोटतीर्थे तु सुगंधा माधवे वने I गोदावर्यां त्रिसन्ध्या तु गङ्गाद्वारे रतिप्रिया II १६ II 
शिवकुडे शुभानंदा नंदिनी देविकातटे I रुक्मिणी द्वारवत्यां तु राधा वृन्दावने वने II १७ II 
देवकी मथुरायां तु पाताले परमेश्वरी I चित्रकूटे तथा सीता विंध्ये विंध्याधिवासिनी II १८ II 
करवीरे महालक्ष्मीरुमा देवी विनायके I आरोग्या वैद्यनाथे तु महाकाले महेश्वरी II १९ II 
अभयेत्युष्णतीर्थेषु नितम्बा विंध्यपर्वते I मांडव्ये मांडवी नाम स्वाहा माहेश्वरीपुरे II २० II 
छगलण्डे प्रचण्डा तु चंडिकाSमरकण्टके I सोमेश्वरे वरारोहा प्रभासे पुष्करावती II २१ II 
देवमाता सरस्वत्यां पारावारातटे स्मृता I महालये महाभागा पयोष्ण्यां पिंगलेश्वरी II २२ II 
सिंहिका कृतशौचे तु कार्तिके त्वतिशांकरी I उत्पलावर्तके लोला सुभद्रा शोणसङ्गमे II २३ II
माता सिद्धवने लक्ष्मिरनंगा भरताश्रमे I जालंधरे विश्वमुखी तारा किष्किंधपर्वते II २४ II 
देवदारुवने पुष्टिर्मेधा काश्मीरमण्डले I भीमा देवी हिमाद्रौ तु तुष्टिर्विश्वेश्वरी तथा II २५ II 
कपालमोचने शुद्धिर्माता कायावरोहणे I शंखोद्धारे धरा नाम धृतिः पिंडारके तथा II २६ II
कला तु चन्द्रभागायामच्छोदे शिवधारिणी I वेणायाममृता नाम बदर्यामुर्वशी तथा II २७ II 
औषधिश्चोत्तरकुरौ कुशद्विपे कुशोदका I मन्मथा हेमकूटे तु कुमुदे सत्यवादिनी II २८ II 
अश्वत्थे वंदनीया तु निधिर्वैश्रवणालये I गायत्री वेदवदने पार्वती शिवसन्निधौ II २९ II 
देवलोके तथेंद्राणी ब्रह्मास्येषु सरस्वती I सूर्यबिंबे प्रभा नाम मातृणां वैष्णवी मता II ३० II
अरुन्धती सतीनां तु रामासु च तिलोत्तमा I चित्ते ब्रह्मकला नाम शक्तिः सर्वशरीरिणाम् II ३१ II 
इमान्यष्टशतानि स्युः पीठानि जनमेजय I तत्संख्याकास्तदिशान्यो देवश्च परिकीर्तिताः II ३२ II सतीदेव्यंगभूतानि पीठानि कथितानि च I अन्यान्यपि प्रसंगेन यानि मुख्यानि भूतले II ३३ II 
यः स्मरेच्छुणुयाद्वापि नामाष्टशतमुत्तमम् I सर्वपापविनिर्मुक्तो देवीलोकं परं व्रजेत् II ३४ II
एतेषु सर्वपीठेषु गच्छेद्यात्राविधानतः I सन्तर्पयेच्च पित्रादीन्छ्राद्धादीनि विधायच II ३५ II 
कुर्याच्च महति पूजां भगवत्या विधानतः I क्षमापयेज्जगद्धात्रीं जगदम्बां मुहुर्मुहुः II ३६ II
कृतकृत्यं स्वमात्मानं जानीयाज्जनामेजय I भक्ष्यभोज्यादिभिः सर्वान्ब्रह्मणान्भोजयेत्ततः II ३७ II 
सुवासिनीः कुमारीश्च बटुकादीस्तथा नृप I तस्मिन्क्षेत्रे स्थिता ये तु चांडालाद्या अपि प्रभो II ३८ II 
देवीरुपाः स्मृता सर्वे पूजनीयास्ततो हि ते I प्रतिग्रहादिकं सर्वं तेषु क्षेत्रेषु वर्जयेत् II ३९ II
यथाशक्ति पूरश्चर्यां कुर्यान्मंत्रस्य सत्तमः I मायाबीजेन देवेशीं तत्तत्पीठाधिवासिनीम् II ४० II 
पूजयेदनिशं राजन्पुरश्चरणकृद्भवेत् I वित्तशाठ्यं न कुर्वीत देवीभक्तिपरो नरः II ४१ II 
य एवं कुरुते यात्रां श्रीदेव्याः प्रीतमानसः I सहस्रकल्पपर्यंतं ब्रह्मलोके महत्तरे II ४२ II 
वसंति पितरस्तस्य सोSपि देवीपुरे तथा I अन्ते लब्ध्वा परं ज्ञानं भवेन्मुक्तो भवांबुधेः II ४३ II नामाष्टशतजापेन बहवः सिद्धतां गताः I यत्रैतल्लिखितं साक्षात्पुस्तके वापि तिष्टति II ४४ II
ग्रहमारीभयादीनि तत्र नैव भवंति हि I सौभाग्यं वर्धते नित्यं यथा पर्वणि वारिधिः II ४५ II 
न तस्य दुर्लभं किंचिन्नामाष्टशतजापिनः I कृतकृत्यो भवेन्नूनं देवीभक्तिपरायणः II ४६ II
नमंति देवतास्तं वै देवीरूपो हि स स्मृतः I सर्वथा पूज्यते देवैः किं पुनर्मनुजोत्तमैः II ४७ II 
श्राद्धकाले पठेदेतन्नामाष्टशतमुत्तमम् I तृप्तास्तत्पितरः सर्वे प्रयांति परमां गतिम् II ४८ II 
इमानि मुक्तिक्षेत्राणि साक्षात्संविन्मयानि च I सिद्धपीठानि राजेन्द्र संश्रयेन्मतिमान्नरः II ४९ II
पृष्टं यत्तत्त्वया राजन्नुक्तं सर्वं महेशितुः I रहस्यातिरहस्यं च किं भूयः श्रोतुमिच्छसि II ५० II
II इति श्रीदेवीभागवते महापुराणे सप्तमस्कन्धे त्रिशोSध्यायः अन्तर्गतं देवी अष्टशत पीठ नामानि स्तोत्रं श्री देविर्पणास्तु II
१०८ देवी (शक्ती) पीठे स्तोत्र 
मराठी अर्थ: 
व्यासऋषी म्हणाले हे जनमेजय राजा ऐक, 
आता मी देवीच्या पिठांचे वर्णन करतो. हे वर्णन नुसते ऐकल्याने सुद्धा मनुष्य पापातून मुक्त होतो. सिद्धीच्या अपेक्षेने किंवा ऐश्वर्याच्या इच्छेने ज्याज्या स्थानी मनुष्याने देवीची उपासना केली पाहिजे ते मी तुला तत्त्वपूर्वक सांगतो. वाराणसी मध्ये गौरीच्या मुखांत निवास करणारी देवी विशालाक्षी प्रतिष्ठित आहे. नैमिषारण्यांत लिंगधारिणी नावाने प्रसिद्ध आहे. तिला प्रयाग मध्ये ललिता तर गंधमादन पर्वतावर कामुकी नाव आहे.ती दक्षिण मानस सरोवरांत कुमुदा तर उत्तर मानस सरोवरांत सर्व इच्छा पूर्ण करणारी विश्वकामा म्हणून प्रसिद्ध आहे. तिला गोमंतावर गोमती, मंदाराचलावर कामचारिणी, चैत्ररथावर मदोत्कटा, हस्तिनापुरांत जयंती, कान्यकुब्जी गौरी तर मलयाचलावर रम्भा म्हटलेले आहे. ही भगवती एकाम्रपिठावर कीर्तिमती तर विश्वपिठावर लोक तिला विश्वेश्वरी आणि पुष्कर क्षेत्री पुरुहूता नावाने ओळखतात. हि देवी केदारपिठी सन्मार्गदायिनी, हिमवत्पृष्टावर मंदा, गोकर्णी भद्रकर्णिका, स्थानेश्वरी भवानी, बिल्वक्षेत्री बिल्वपत्रिका, श्रीशैल्यी माधवी आणि भद्रेश्वरी भद्रा म्हटली गेली आहे. तिला वराहपर्वतावर जया, कमलालयांत कमला, रुद्रकोटी क्षेत्री रुद्राणी, कालंजरमध्ये काली, शालिग्राम क्षेत्री महादेवी, शिवलिंगक्षेत्री जलप्रिया, महालिंगक्षेत्री कपिला, तर माकोटक्षेत्री मुकुटेश्वरी म्हंटले आहे. ही भगवती मायापुरी कुमारी, संतान्पीठी ललिताम्बिका, गयेमध्ये मंगला आणि पुरुषोत्तमक्षेत्री विमला नावाने प्रसिद्ध आहे. ती सहस्त्रक्षेत्री उत्पलाक्षी, हिरण्याक्षक्षेत्री महोत्पला, विपाशामध्ये अमोघाक्षी, पुंड्रवर्धनी पाडला, सुपार्श्वक्षेत्री नारायणी, त्रिकूटांत रूद्रसुन्दरी, विपुलक्षेत्री विपुला, मलयाचलावर देवी कल्याणी, संह्याद्री एकवीरा, हरिश्चंद्रावर चंद्रिका, रामतीर्थी रमणा, यमुनाक्षेत्री मृगावती,कोटीतीर्थी कोटवी, माधववनी सुगंधा, गोदावरीक्षेत्री त्रिसंध्या, गंगाद्वारी रतिप्रिया, शिवकुंडी शुभानंदा, देविकातटी नंदिनी, द्वारकेमध्ये रुक्मिणी, वृदावनांत राधा, मथुरेमध्ये देवकी, पाताळांत परमेश्वरी, चित्रकूटांत सीता, विंध्याचलावर विंध्यवासिनी, करवीरक्षेत्री महालक्ष्मी, विनायकक्षेत्री देवी उमा, वैद्यनाथक्षेत्री आरोग्या, महाकालक्षेत्री महेश्वरी, उष्णक्षेत्री अभया, विन्ध्यपर्वतावर नितम्बा, मांडवक्षेत्री मांडवी तर माहेश्वरीपुरामध्ये स्वाहा नावाने प्रसिद्ध आहे. ही देवी छगलण्डमध्ये प्रचण्डा, अमरकण्टकी चण्डिका, सोमेश्वरी वरारोहा, प्रभासक्षेत्री पुष्करावती, सरस्वतीतिर्थान्त देवमाता, समुद्रतटावर पारावारा, महालयक्षेत्री महाभागा आणि पयोष्णी क्षेत्री पिंगलेश्वरी नावाने प्रसिद्ध आहे. ती कृतशौचक्षेत्री सिंहिका, कार्तिकक्षेत्री अतिशांकरी, उत्पलावर्तकामध्ये लोला, सोनभद्रनदाच्या संगमावर सुभद्रा, सिद्धवनामध्ये माता लक्ष्मी, भरताश्रम तीर्थांत अनंगा, जालंधर पर्वतावर विश्वमुखी, किष्किंधा पर्वतावर तारा, देवदारुवनामध्ये पुष्टी, काश्मीरमध्ये मेधा, हिमाद्रीवर देवी भीमा, विश्वेश्वर क्षेत्रांत तुष्टी, कपालमोचनतीर्थी शुद्धि, कामावरोहणतीर्थी माता, शंखोद्धारतीर्थी धारा आणि पिंडारकतीर्थी धृती नावाने प्रसिद्ध आहे. चंद्रभागानदीच्यातटी कला, अच्छोदक्षेत्री शिवधारिणी, वेणानदीच्या किनारी अमृता, बदरीवनांत उर्वशी, उत्तर कुरुप्रदेशांत औषधि, कुशद्वीपांत कुशोदका, हेमकूटपर्वतावर मन्मथा, कुमुदवनांत सत्यवादिनी, अश्वत्थतीर्थामध्ये वंदनीया, वैश्रवणालयक्षेत्री निधि, वेदवनतीर्थी गायत्री, भगवान शिवांच्या बरोबर पार्वती, देवलोकांत इंद्राणी, ब्रह्मदेवांच्या मुखांत सरस्वती, सूर्यबिम्बांत प्रभा, तर मातृकांमध्ये वैष्णवी नावाने सांगितली गेली आहे. सतींमध्ये अरुंधती, अप्सरांमध्ये तिलोत्तमा, आणि सर्व शरीरधारणीयांमध्ये ब्रह्मकला नावाने ती शक्ती प्रसिद्ध आहे. हे जनमेजया ! ही सर्व एकशे आठ सिद्ध पीठे आहेत. त्या त्या स्थानांवर असलेल्या देवींची नावे सांगितली आहेत. भगवती सतीच्या निमित्याने मी संबंधित पीठांची माहिती सांगितली. तसेच या पृथ्वीवर आणि अन्य जी प्रमुख ठिकाणे आहेत त्याचे वर्णन मी केले. जो माणूस या एकशे आठ सिद्ध पिठांच्या नावांचे पठण किंवा श्रवण करतो तो सर्व पापांतून मुक्त होऊन भगवतीच्या परम धामी निवास करतो. विधाना प्रमाणे या सर्व तीर्थांची यात्रा केली पाहिजे. त्या ठिकाणी श्राद्ध आदी करून पितरांना संतुष्ट केले पाहिजे. त्यानंतर भगवतीची विधिवत पूजा करावी. जगद्धात्री जगदम्बेकडे वारंवार क्षमा याचना करावी. हे जनमेजय ! असे करून कृतकृत्य व्हावे. हे राजन् ! नंतर ब्राह्मण, सुवासिनी आणि कुमारिकांना तसेच बटुन्ना भोजन द्यावे. हे प्रभो ! या क्षेत्रांत राहणारे चांडाळ आदी सर्व देविरूप म्हंटले आहेत. म्हणून या सर्वांची पूजा केली पाहिजे. या सर्व क्षेत्री कोठल्याही प्रकारचे दान घेऊ नये. श्रेष्ट साधकांनी या क्षेत्री जमेल त्याप्रमाणे देवी मंत्रांचे पुरश्चरण करावे. मायाबीज मंत्राने त्या त्या क्षेत्रांतील अधिष्ठात्री देवीची उपासना करावी. हे राजन् ! या प्रकारे साधकाने पुरश्चरण कर्मामध्ये तत्पर राहिले पाहिजे. देवीच्या भक्तीमध्ये साधकाने अनुष्ठान करताना कंजूसपणा करू नये. जो मनुष्य या प्रकारे श्रीदेवीच्या पिठांची प्रसन्न मनाने यात्रा करतो त्याचे पितर हजार कल्पानपर्यंत ब्रह्मलोकी निवास करतात. अंती तो सुद्धा उत्तम ज्ञान प्राप्त करून संसार सागरांतून मुक्त होऊन देवी लोकांत निवास करतो. या एकशे आठ नावांच्या जपाने अनेक लोकांनी सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. जेथे ही अष्टोत्तरशत नावे स्वयं लिखित किंवा पुस्तक रूपाने असतात त्या ठिकाणी ग्रहपीडा अगर महामारी आदींचा उपद्रव होत नाही. पर्वकाळी जसा समुद्राला भरती येते तशी त्या ठिकाणी सौभाग्याची निरंतर वृद्धी होते. या एकशे आठ नावांचा जप करणार्याला काहीहि असाध्य उरत नाही. असा देवी भक्त निश्चितच कृतकृत्य होतो. देवता पण त्याला नमस्कार करतात कारण अशा भक्ताला देवी रुपच म्हटले आहे. देवतासुद्धा त्याची सर्वत्र पूजा करतांत मग श्रेष्ट मानवांची काय कथा? जो मनुष्य आपल्या पितरांच्या श्राद्ध दिवशी या उत्तम अष्टोत्तरशत नावांचा पाठ करतो त्याचे सर्व पितर तृप्त होऊन परम गती प्राप्त करतात. हे राजेंद्र ! हे सिद्धपीठ प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप तसेच मुक्तीचे क्षेत्र आहे. बुद्धिमानाने याचा आश्रय घ्यावा. हे राजन् ! आपण भगवती महेश्वरी च्या अत्यंत गूढ रहस्याच्या विषयी जे विचारले ते सर्व मी सांगितले. आता अजून आपल्याला काय ऐकायचे आहे?
Devi 108 pithani Nam Stotra 

No comments: