Tuesday, July 3, 2012

ShriSadGuruStavan श्रीसद्गुरुस्तवन

ShriSadGuruStavan 
We are celebrating Guru Pournima on 3rd July 2012 i.e. on Aashadha Shudha Pournima. Hence I am uploading this ShriSadGuruStavan. It is in Marathi. This is written by Shri Shridhar Swami. Shri Ramdas Swani was his Guru. Shri Shridhar Swami is describing the virtues of his Guru, Ramdas Swami.
श्रीसद्गुरुस्तवन 
श्रीगणेशाय नमः । श्री सीतारामचंद्राय नमः । 
श्रीसमर्थ सद्गुरवे नमः । ॐ नमो भगवते श्रीधराय । 
जय जय श्रीगुरु माउली । तुझ्या कृपेची जीवा साउली । 
तुजवीन न कोणी वाली । भवतप्ता या ॥ १ ॥ 
तूं नारी नरासी अभेद । सर्वात्मरुप आनंद कंद । 
तुज भजता विषयछंद । नासोनी जाये ॥ २ ॥ 
जय जयाजी श्रीसदगुरु । भवाब्धीचें तूं सुदृढ तारुं । 
मज यापाववी पैलपारु । अनाथ नाथा ॥ ३ ॥ 
अज्ञाननिशीच्या अंती । निजात्मरुपेंचि तुझी प्राप्ति । 
तूं चित्सुखसूर्य दिनरातीं । प्रकाशसी स्वप्रभें ॥ ४ ॥ 
'मी माझे' हे दयाळा । नुरवोनि प्रतिपाळी बाळा । 
उपेक्षा करुं नेणसी कृपाळा । शरणागताची ॥ ५ ॥ 
 माझें शरीर इंद्रियें प्राण । सकळ वासनेसह हें मन । 
ससर्व कर्म बुद्धि ही जाण । अर्पियली तुज ॥ ६ ॥ 
तूं शुद्ध बुद्ध सच्चिदानंद । निष्कलंक निर्लेप अभेद । 
स्वरुपबोधे नाशिसी खेद । शरणागताचा ॥ ७ ॥ 
मज दीना अभय द्दावें । मायानिर्मुक्त मज करावें । 
भवभय घालवूनि न्यावें । मज निजधामा ॥ ८ ॥ 
बाधा कसलीहि मज नसावी । सकळ आपदा नष्ट व्हावी । 
निर्विघ्नपणेचि गा मज मिळवी । ब्रह्मपदीं तुझ्या ॥ ९ ॥ 
तूं निराकार ब्रह्म निर्गुण । होसी बा आकार आणि सगुण । 
सदगुरुरुपें आलें कळून । आम्हां सोडविण्या ॥ १० ॥ 
जय जयाजी दीन दयाळा । घालवी संसारसुखाचा हा चाळा । 
मिळवी निजरुपीं निर्मळा । शीघ्रचि आतां ॥ ११ ॥ 
माया अविद्देहूनि पर । जीवेश कल्पना विदूर । 
सृष्टिस्थितिलयादि वेव्हार । तुजमाजीं नसे ॥ १२ ॥ 
गुरुराया तूं आमुचे स्वरुप । अरुप सुखसमुद्र अमूप । 
अद्वय तव चिद्रूपीं ऐक्यरुप । आम्ही सर्वदा ॥ १३ ॥ 
सदाचारें श्रीगुरुभक्तियुक्त । नित्यपाठ करितां होई मुक्त । 
तेरा ओव्या या श्रीधरोक्त । भवदुःख विनाशिती ॥ १४ ॥ 
॥ इति श्रीमत् परमहंस परि व्राजकाचार्य श्रीसदगुरु भगवान श्रीधरस्वामी महाराज विरचित श्रीसदगुरुस्तवन संपूर्ण ॥
ShriSadGuruStavan 
श्रीसद्गुरुस्तवन


Custom Search

No comments: