Sunday, November 11, 2012

Anadikalpeshwar Stotra अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम्

Anadikalpeshwar Stotra 
Anadikalpeshwar Stotra is in Sanskrit. It is a beautiful creation of Param Poojya Vasudevanand Saraswati. Anadikalpeshwar means God Shiva. This is a God Shiva Stotra. 
1 His body color is white as camper. He has worn a garland of snakes. He has held the holy river Ganga in his Jatajut (hairs). He is helping people. He is master of all. He is great among Gods. However he is very cruel in his look. He is no other than Anadikalpeshwar. 
2 He lives on the Kailas Mountain. He happily lives with Girija his wife. He found in cemetery. He lives in the mind of his devotees. He stays in holy Kashi city. He is who makes us victorious. He is no other than Anadikalpeshwar. 
3 He holds trishool in his hand as a weapon. He removes difficulties and troubles in the life of people. He had destroyed pride of God Kamdev. He is having moon on his head. He fulfills the desires of the people who worship him. He is no other than Anadikalpeshwar. 
4 He is leader of all. He is leader of Pramath Ganas. He is giver of all type of knowledge. He knows Shruti and Shastras. He has knowledge of Dharma, Artha, Kam and Moksha. He is no other than Anadikalpeshwar. 
5 God Vishnu and God Brahma tried to measure his greatness. God Vishnu went into Patala and God Brahma in the heaven for finding out his (God Shiva’s) adi and anta. But both were unsuccessful. He is no other than Anadikalpeshwar. 
6 Demon Ravan by his famous Tandav Dance and Stotra pleased him and receives blessings from him. He is no other than Anadikalpeshwar. 
7 Demon Banasur bowed only once at his feet and received more wealth and money than God Indra by his (God Shiva’s) blessings. He is no other than Anadikalpeshwar. 
8 I am full of troubles and difficulties and as such unable to praise his appearance, form and greatness. Even Shruties are also unable to describe and praise him. He is no other than Anadikalpeshwar. 
9 O Anadikalpeshwar! Whosoever recites this stotra three times a day becomes happy and wealthy and all his desires are fulfilled by your blessings. At the end of his life he goes to Kailas, abode of God Shiva. 
Thus here completes this Anadikalpeshwar Stotra created by Param Poojya Vasudevanand Saraswati.

अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम् 
कर्पूरगौरो भुजगेन्द्रहारो गङ्गाधरो लोकहितावहः सः । 
सर्वेश्र्वरो देववरोऽप्यघोरो योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ १ ॥ 
कैलासवासी गिरिजाविलासी श्मशानवासी सुमनोनिवासी । 
काशीनिवासी विजयप्रकाशी योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ २ ॥ 
त्रिशूलधारी भवदुःखहारी कन्दर्पवैरी रजनीशधारी । 
कपर्दधारी भजकानुसारी योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ३ ॥ 
लोकाधिनाथः प्रमथाधिनाथः कैवल्यनाथः श्रुतिशास्त्रनाथः । 
विद्यार्थनाथः पुरुषार्थनाथो योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ४ ॥ 
लिङ्गं परिच्छेत्तुमधोगतस्य नारायणश्र्चोपरि लोकनाथः । 
बभूवतुस्तावपि नो समर्थौ योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ५ ॥ 
यं रावणस्ताण्डवकौशलेन गीतेन चातोषयदस्य सोऽत्र । 
कृपाकटाक्षेण समृद्धिमाप योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ६ ॥ 
सकृच्च बाणोऽवनमय्यशीर्षं यस्याग्रतः सोप्यलभत्समृद्धिम् । 
देवेन्द्रसम्पत्त्यधिकां गरिष्ठां योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ७ ॥ 
गुणान्विमातुं न समर्थ एष वेषश्र्च जीवोऽपि विकुण्ठितोऽस्य । 
श्रुतिश्र्च नूनं चलितं बभाषे योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ८ ॥ 
अनादिकल्पेश उमेश एतत् स्तवाष्टकं यः पठति त्रिकालम् । 
स धौतपापोऽखिललोकवन्द्यं शैवं पदं यास्यति भक्तिमांश्र्चेत् ॥ ९ ॥ 
॥ इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीकृतमनादिकल्पेश्वरस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम् मराठी अर्थ: 
१ ज्यांचा वर्ण कापराप्रमाणे पांढरा शुभ्र आहे, ज्यानी सर्पांचा हार गळ्यांत घातला आहे, जटाजूटामध्ये ज्यांनी गंगेला धारण केले आहे, संसाराचे हित करणारे जे आहेत, जे सर्वांचे स्वामी आहेत आणि देवतांमध्ये श्रेष्ठ असूनही जे अघोर आहेत असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
२ जे कैलासावर राहतात, भगवती गिरीजेसहित आनंद उपभोगतात, जे स्मशानवासी आहेत, भक्तांच्या मनांत राहणारे, काशीमध्ये निवास करणारे आणि विजयी करणारे असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
३ जे त्रिशूल धारण करतात, संसारांतील दुःखाचे हरण करतात, कामदेवाचा गर्व हरण करणारे, मस्तकावर चंद्राला धारण करणारे, जटाजूटधारी आणि भजन करणारांचे मनोरथ पूर्ण करणारे असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
४ जे सर्व लोकांचे स्वामी, प्रमथगणांचे नाथ, मोक्ष मिळवून देणारे, श्रुति व शास्त्र यांचे ज्ञान देणारे, सर्व विद्यांचे दाते, तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारहि पुरुषार्थांचे अधिष्ठाते असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
५ ज्यांच्या लिंगाची उंची व खोली जाणण्यासाठी विष्णु पाताळांत आणि ब्रह्मदेव स्वर्गांत गेले परंतु ते दोघेहि त्यांत असफल झाले असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
६ ज्यांना रावणाने आपल्या ताण्डव नृत्य कौशल्याने आणि स्तुतिने प्रसन्न करुन घेतले आणि ज्यांच्या कृपाप्रसादाने समृद्धि प्राप्त करुन घेतली असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
७ बाणासुराने ज्यांच्यासमोर एकदाच मस्तक झुकवून एकदाच नमस्कार केला आणि त्यांच्या प्रसन्नतेने देवेन्द्राच्या संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती आणि समृद्धि प्राप्त करुन घेतली असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
८ अनेक प्रकारच्या संकटांनी आणि अडचणीनी ग्रस्त असलेला हा जीव ज्यांच्या स्वरुपाचे आणि गुणांचे योग्य ते वर्णन करण्यास असमर्थ आहे. श्रुतिसुद्धा ज्यांचे वर्णन करु शकत नाही व नेति नेति असेच म्हणते. असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
९ हे अनादिकल्पेश्वर उमापती! आपल्या या आठ श्र्लोकांमधून केलेल्या स्तुतिचा पाठ जो तीन्हि त्रिकाळ करतो त्याची सर्व पापे धुतली जाऊन तो सर्वां वंदनीय होतो आणि अन्ती शिवसन्निधानास प्राप्त होतो. 
अशा प्रकारे श्रीवासुदेवानंदसरस्वतींनी रचिलेले हे अनादिकल्पेश्वर स्तोत्र पूर्ण झाले. 
Anadikalpeshwar Stotra 
अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम्


Custom Search

1 comment:

JP said...

I glad to hear the translation of अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम्"