Sunday, July 26, 2015

Narayan Sukta नारायण सूक्त


Narayan Sukta 
Narayan Sukta is in Sanskrit. It is a Vaidik Sukta. There are six ruchas of this sukta. All these ruchas are considered as Vaidik Mantras. The sukta in English is as under. Whoso ever recites this sukta daily early in the morning, It is said that all gods comes under his control. 
 Narayan Sukta 
adbhyaha sambhrutaha pruthivyai rasaachcha vishvakarmanaha samavartataagre I 
tasya tvashtaa vidadhadroopmeti tanmartyasya devtvamaajaanamagre II 1 II 
vedaahametam purusham mahaantamaadityavarnam tamasaha parastaat I 
tameva viditvaati mrtyumeti naanyaha panthaa vidyateayanaada II 2 II 
 prajaaptishcharati garbhe antarajaayamaano bahidhaa vi jaayate I 
tasya yonim pari pashyanti dheeraastasmin ha tasthurbhuvanaani vishwaa II 3 II 
yo devebhya aatapati yo devaanaam purohitaha I 
poorvo yo devebhyo jaato namo ruchaya braahmaye II 4 II 
rucham brahmam janayanto devaa agre tadabruvan I 
yastvaivam braahmano vidyattasya devaa asan vashe II 5 II 
shreeshcha te lakshmishcha patnyaavahoraatre paarshve nakshatraani rupamashvinou vyattam I ishnannishaanaamum ma ishaana sarvalokam ma ishaana II 6 II

नारायण सूक्त
अद्भ्यः सम्भृतः पृथिव्यै रसाच्च विश्वकर्मणः समवर्तताग्रे ।
तस्य त्वष्टा विदधद्रूपमेति तन्मर्त्यस्य देवत्वमाजानमग्रे ॥ १ ॥
वेदाहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमसः परस्तात् ।
तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्यः पन्था विद्यतेऽयनाद ॥ २ ॥
प्रजापतिश्र्चरति गर्भे अन्तरजायमानो बहुधा वि जायते ।
तस्य योनिं परि पश्यन्ति धीरास्तस्मिन् ह तस्थुर्भुवनानि विश्वा ॥ ३ ॥
यो देवेभ्य आतपति यो देवानां पुरोहितः ।
पूर्वो यो देवेभ्यो जातो नमो  रुचाय ब्राह्मये ॥ ४ ॥
रुचं ब्राह्मं जनयन्तो देवा अग्रे तदब्रुवन् ।
यस्त्वैवं ब्राह्मणो विद्यात्तस्य देवा असन् वशे ॥ ५ ॥
श्रीश्र्च ते लक्ष्मीश्र्च पत्न्यावहोरात्रे पार्श्वे 
नक्षत्राणि रुपमश्विनौ व्यात्तम् ।
इष्णन्निषाणामुं म इषाण 
सर्वलोकं म इषाण  ॥ ६ ॥
नारायण सूक्त या सूक्ताचे ऋषि नारायण, देवता आदित्य पुरुष आणि छन्द भूरिगार्षी त्रिष्टुप् , निच्यृदार्षी त्रिष्टुप् तसेच आर्ष्यनुष्टुप् आहे. या सूक्तामध्ये सहा मंत्र आहेत.  
हे उत्तर नारायण सूक्त या नावाने प्रसिद्ध आहे. ह्यामध्ये सृष्टीच्या विकासाबरोबरच व्यक्तिच्या कर्तव्याचा बोध होतो. त्याचबरोबर आदि पुरुषाचा महिमा प्रतित होतो. ह्याची विशेषता ह्यातील मंत्राच्या ज्ञात्याला सर्व देवता वश झालेल्या असतात. 
मराठी अर्थ
१) पृथ्वी आणि इतर सृष्टिच्या प्रेमाखातर तो ( आदि ) पुरुष पाणी इत्यादीने परिपूर्ण होऊन फार पूर्वीपासूनच प्रभावीत झाला आहे. त्या पुरुषाच्याच रुपाला धारण करुन सूर्य उदित होतो. ज्याचे मनुष्यासाठी मुख्य देवत्व आहे. 
२) मी अज्ञानान्धकाराच्या पलिकडे आदित्यप्रतिकात्मक असलेल्या सर्वोत्कृष्ट पुरुषाला जाणतो. नुसते त्याला जाणले तरी मृत्यु येत नाही. शरण जाण्यास दुसरे कोठचाच मार्ग ( किंवा ठिकाण ) नाही. 
३) तो परमात्मा ( आपल्या ) अभ्यंतरांतच विराजमान आहे. उत्पन्न न होणारा होऊनसुद्धा नाना प्रकाराने तो उत्पन्न होतो. संयमी ( योगी ) पुरुषच त्याच्या ( परमात्म्याच्या ) स्वरुपाचा साक्षात्कार करु शकतो. सर्व भूतमात्र त्याच्यातच ( परमात्म्यातच ) सन्निविष्ट आहे.  
४) जे देवतांसाठी सूर्यरुपाने प्रकाशित होते. जे देवतांचे कार्य साधणारे आहे. जे देवतांच्याआधी स्वयंभू आहे. त्या देदीप्यमान ब्रह्म; त्याला नमस्कार आहे. 
५) त्या शोभायमान ब्रह्माला प्रथम प्रगट करुन देवता म्हणाल्या जो ब्राह्मण तुला ( ब्रह्मला ) यास्वरुपांत जाणेल त्याच्या आधिन सर्व देवता असतील.

६) समृद्धि आणि सौंदर्य तुझ्या पत्नीच्या सारख्या आहेत. दिवस आणि रात्र तुझ्या जवळपासच आहेत. अगणित नक्षत्र तुझीच रुपें आहेत, द्यावा अणि पृथ्वी तुझ्या मुखावरच आहेत. इच्छा करतांना परलोकाची इच्छा करा. मी ( त्या ब्रह्मन् सारखा ) सर्वलोकात्मक होईन अशी इच्छा करा, अशी इच्छा करा. 
Narayan Sukta 
नारायण सूक्त

Custom Search

No comments: