Friday, December 4, 2015

Shri Navanatha Bhaktisar Adhyay 9 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय नववा ( ९ ) भाग १/२


Shri Navanatha Bhaktisar Adhyay 9 
Shri Navanatha Bhaktisar Adhyay 9 is in Marathi. Machchhindra proceeded for his visit to holy places. He visited all seven moksha puries namely Kashi, Avantika, Mathura, Mathura, Ayodhya, Gaya, Prayaga, Kashmiri. Then he entered into Bangal. He reached to the Chandragiri. He remembered that he had given Vibhuti-Bhasma to Saraswati in that village so that she would have a child. Pleas refer Adhyay 2. Reaching to called her and asked her to bring her son. But she old him that she had no son. She didnot believed the Mantra-vibhuti which she had thrown in cows mud. He asked her to show the place which she deed. Then Machchhindra called the son by the name Goraksha who replied from the mud and asked Machchhindra to help him come out. Machchhindra helped him and saw that a boy of 12 years with a very vibrant body. Then he asked Saraswati to leave the place to avoid him to curse her. Then Goraksha and Machchhindra proceeded for visiting Jagannath puri. In between they came to Kanakgiri a village. Machchhindra asked Goraksha to bring bhiksha. Which Goraksha did and asked Machchhindra to eat. One particular namely wada was liked by Machchindra very much. Hence Goraksha again went to the same house from where he was served the bhiksha. He particularly asked for wada for his guru. The lady unbelieving asked to give her his eye in return of wada. Gorksha immediately took out his eye and offered it to the lady for wada. The lady was very frighten by seeing the blood and the eye in the hand of Goraksha. She asked him to forgive her and brought wadas and asked Goraksha to took wadas and eye also with him. Goraksha brought the wadas but he was hiding his eyes as such Mchchhindra warned him that he will not eat wada unless Goraksha tells him what has happened to his eyes. Pleased by his devotion towards his guru. Machchhindra was very much pleased and he immediately placed Goraksha's eye by chanting SanjivaniMantra. Then he also teach him everything of Astra-vidya and also gave him Shabari Kavittva. Goraksha also became expert in all these vidyas within a month. Now what happened next will be told to us by Malu who is from Dhindi's son and from Narahari family, in the Adhyay 10.

श्रीनवनाथभक्तिसार अध्याय नववा ( ९ ) भाग १/२

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जयजयाजी जगदुद्धारा । अवतारदीक्षाज्ञानेश्र्वरा ।
अघटितमायावतारधरा । भिंतीवाहना गुरुराया ॥ १ ॥
रेड्यामुखीं वेदोच्चार । करुनि तोषविले सकळ विघ्न ।
फोडोनि भगवद्गीताभांडार । सकळ जनां वाढिलें ॥ २ ॥
ऐसा तूं कविमहाराज । तरी मम कामनेचें धरुनि चोज ।
ग्रंथार्थी विपुल सुरस । दिधली भाक मच्छिंद्रास ॥ ३ ॥
मागिले अध्यायीं कथा सुरस । दिधली भाक मच्छिंद्रास ।
वर देऊनि वातचक्रास । गमन करिता पैं झाला ॥ ४ ॥
आणि श्रीरामाची झाली भेटी । तेणेंहीं वर ओपूनि शेवटीं ।
पाशुपतरायाची रामाचे पोटीं । कामना संतुष्ट केली मच्छिंद्र ॥ ५ ॥
असो आतां येथूनि मच्छिंद्रनाथ । सप्त मोक्षपुर्‍या पाहुनि त्वरित ।
अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ । काशी काश्मिरी पाहिलीं ॥ ६ ॥
मिथिला प्रयाग गया सुरग । तेथें नमूनि विष्णुपदास ।
अन्य तीर्थें करुनि बंगालदेश । चंद्रागिरीस तो पातला ॥ ७ ॥
गांवांत करितां भिक्षाटन । तों सर्वोपकारा दयाळू ब्राह्मण ।
तयाचे दृष्टी पडतां सदन । झालें स्मरण भस्माचें ॥ ८ ॥
मनांत म्हणे याच सदनीं । पुत्रमंत्रसंजीवनी । 
वरदभस्मी सिद्ध करुनी । दिधली होती निश्र्चयें ॥ ९ ॥
तरी ती साध्वी विप्रजाया । सरस्वती नामें होती जया ।
सर्वोपय्कारी दयाळ द्विजभार्या । सुकृत होतें तियेचे ॥ १० ॥
तरी द्वादश वर्षे पोटल्यापाठीं । पुन्हां मी येईन शेवटीं ।
ऐसें वदोनि भस्मचिमुटी । सरस्वतीतें दिधली असे ॥ ११ ॥ 
तरी त्या मायेचा शोध करुन । पाहूं तियेचा वरदनंदन ।
ऐसें हृदयीं मच्छिंद्र आणून । सदनामाजी प्रवेशला ॥ १२ ॥   
उभा राहूनि विप्रांगणीं । हे सरस्वति ऐसी पुकारी वाणी ।
तंव ती ऐकूनि शुभाननी । बाहेर आली अति त्वरें ॥ १३ ॥
येतां देखिला योगद्रुम । मग भिक्षा घेऊनि उत्तमोत्तम । 
म्हणे महाराजा भिक्षान्न । झोळीमाजी स्वीकारीं ॥ १४ ॥
मच्छिंद्र म्हणे वो शोभाननी । तव नाम काय तें ऐकूं दे कानीं ।
येरी म्हणे सरस्वती अभिधानी । लोकोपचारें मज असे ॥ १५ ॥
उपरी मच्छिंद्र बोले तीतें । नाम काय तव भ्रतारातें ।
येरी म्हणे सर्व त्यातें । दयाळपती म्हणताती ॥ १६ ॥
नाथ म्हणे तुम्ही कवण जाती । गौड विप्र म्हणे ती तैं सरस्वती ।
ऐसें ऐकूनि खूण चित्तीं । मिळाली तेव्हां नाथाच्या ॥ १७ ॥
मच्छिंद्र म्हणे माये ऐक । दावीं कोठे तव बाळक ।
येरी म्हणे जी पुत्रमुख । पाहिले नाही अद्यापि ॥ १८ ॥
मच्छिंद्र म्हणे बोलसी कां खोटें । म्यां वरदभस्माचीं दिधली चिमुट ।
भस्म नोहे तें संजीवनीपीठ । पुत्ररुपींचे दर्शवीं ॥ १९ ॥
दाखवी परी तो पुत्र कैसा । अजरामर मागें सोडिला कैसा ।
तेजःपुंज अन्यून अनिळ महेशा । ऐसा पुत्र असेल कीं ॥ २० ॥
असो भस्मचिमुटी ऐकतां वाणी । खूणयुक्त झाली नितंबिनी ।
परी भस्मचिमुटीतें उकिरडाभुवनीं । सांडिलें अन्याय वाढला ॥ २१ ॥
तेणेंकरुनि जाहली भयग्रस्त । हृदयीं संचरला कंपवात ।
चित्ती म्हणे आतां हा नाथ । शिक्षा करील मजलागीं ॥ २२ ॥
नेणों शापें करील भस्म । कीं तोडील स्वशक्तीनें माझा काम ।
कीं तरुरुप हो ऐसा शाप देऊन । सांडूनि जाईल अवनीतें ॥ २३ ॥
आधीं मी अल्पबुद्धीपासुनी । घेतल्या आहेत नितंबिनीवाणी ।
कीं कानफाट्याची विपरीत करणी । अविद्यार्णवी असती ते ॥ २४ ॥
नाटक चेटक कुडे अपार कपट । जाणती दुर्गुण परम पापिष्ट ।
जाया पाहुनि उत्तम बरवट । स्तुती करिती तियेची ॥ २५ ॥
दिनमानपर्यंत कुत्री । उत्तम जाया करिती रात्रीं ।
मग शयनीं घेऊनि शेजपात्रीं । भोग भोगिती दुरात्मे ॥ २६ ॥
ऐसें पूर्वीं मज श्रुत । सखियामुखीं श्रवण केलें होतें ।
परी तोचि बोल समस्त । सत्य होऊं पाहतसे ॥ २७ ॥
तरी आतां कपाळ फुटकें । होणार ते होऊ शके ।
कानफाट्या करुनि चेटकें । दशा करील कीं माझी ॥ २८ ॥
तरी यातें कवण उपाय । कांहीं सुचेना करुं काय । 
हा ओळख धरुनि समय । साधूनि आला परतोनि ॥ २९ ॥   ऐसें रीतीं मनीं जल्पत । तरी गात्रें थरथरा कापत ।
अत्यंत भयाचें भरुनि भरतें । शुद्धि पात्रा सोडिलें तिनें ॥ ३० ॥
यावरी नाथ म्हणे वो जननी । पाहसी काय तूं पिशाचपणीं ।
पुत्र कोठें तो दावी नयनीं । उशीर न लावीं वो माते ॥ ३१ ॥
ऐसिया बोलाची होतां दाटी । मग विचारी हृदयीं गोरटी ।
कीं यासी वदावी खरी गोष्टी । वृत्तांत जितुका झाला तो ॥ ३२ ॥
खरेपणीं आहे वर्म । मिथ्यावादी होय न शर्म ।
दैवे अन्यायसाफी होऊन । मुक्त होतसे तो प्राणी ॥ ३३ ॥
तस्मात् जी खरी सत्यनीती । त्यांत साहते बहु असती ।
पांचांमुखी वदूनि श्रीपती । मुक्त करी अन्यायीं ॥ ३४ ॥
तस्मात राहो अथवा जावो प्राण । पुढें येवी कैसे घडून ।
परी सत्य वाचे खरें भाषण । वृत्तांत झाला तैसा वदूं ॥ ३५ ॥
मग चरणीं ठेवूनि माळ । उभय जोडूनि करकमळ ।
म्लानमुख दीन विकळ । वृत्तांत सकळ निरोपी ॥ ३६ ॥
म्हणे महाराजा क्षमाशीळा । आपण जो कां प्रसाद दिधला ।
परी अन्याय मज पासूनि झाला । भस्म गारी सांडिलें ॥ ३७ ॥
सांडिले म्हणाल काय म्हणून । तरी विश्वासें व्यापिलें नव्हतें मन ।
भस्मानें पुत्र होईल कोठून । ऐसें म्हणून सांडिलें ॥ ३८ ॥
शेजारी असती बोलती जन । दारा म्हणती प्रज्ञावान ।
खरें नाहे निरुपण । केले विचित्र तुजलागी ॥ ३९ ॥
तेणें संशय आणूनि मनीं । नेणीं कैसी घडेल करणी ।
जठरीं पेटला कोपवन्ही । तरी आपणची भोगावा ॥ ४० ॥
अपत्याकरितां परम आहेत । परगृहीं मिरवावें कां यथार्थ ।
म्हणोनि गौप्य धरिलें चित्तांत । समस्ती वदलीसे ॥ ४१ ॥
जन्मांत आल्या परोपकार । करावा हें शास्त्रनिर्धारे ।
न घडेल तरी उपकार । अनुपकार करुं नये ॥ ४२ ॥
उत्तम वृक्षाची करावी लावणी । न घडे तरी न टाकावा खंडूनी ।
धर्म करावा न मेदिनीं । वारुं नये कवणातें ॥ ४३ ॥
आपण स्वतां तीर्थासी जावें । न घडे तरी परा न वारावें ।
विवाहकार्य कदा न मोडावें । आपुली बुद्धी वेंचुनियां ॥ ४४ ॥
गौतमीं करुं जातां चोरी । तेथे वेचूं नये वैखरी ।
तस्करातें मारिता अधिकारी । आड त्यातें होऊं नये ॥ ४५ ॥
सुतापाशी पित्याचे अवगुण । सांगूनि न करावें मन क्षीण ।
सुनेपाशीं सासू हीन । म्हणूं नये कदापि ॥ ४६ ॥
कूप तडाग मळे बागाईत । करतां वारुं नये कवणातें ।
कोणी कीर्तनासी असतील जात । आड येऊं नये त्यासी ॥ ४७ ॥
आपुली वैखरी वेचल्यांत । होऊं पाहे पराचे अनहित ।
तरी ते विचारुनि स्वस्थचित्तांत । मौनें कांहीं न बोलावें ॥ ४८ ॥
ऐसें जाणोनि सरस्वती । सत्य बोलली ती युवती ।
कीं महाराजा विश्वास चित्तीं । ठसला नव्हता त्या वेळे ॥ ४९ ॥
ऐसिया युक्तीप्रयुक्तीकरुन । भावाभावी दृष्टी वेंचून ।
जेणे जनांचे होय कल्याण । तोचि अर्थ करावा ॥ ५० ॥
म्हणूनि भस्माचें सांडवण । मज दयाळा घडलें पूर्ण ।
काय करुं दैवहीन । उपाय तो अपाय झालासे ॥ ५१ ॥
कीं वाटे चालतां चाली । धनाची ग्रंथिका पुढें आली ।
परी दैवहीना बुद्धी संचरली । अंध व्हावें तें समयीं ॥ ५२ ॥
कीं कल्पतरुच्या वृक्षाखालीं । कल्पिली कल्पना फळा आली ।
कीं पिशाचवत बुद्धी संचरली । दैवहीना शेवटीं ॥ ५३ ॥
तन्न्यायें मातें झालें । आतां क्षमा करावी माउले ।
अज्ञानपणें उडविलें । हित माझे महाराजा ॥ ५४ ॥
परी ही ऐकतां वाणी । मच्छिंद्र खिन्न झाला मनीं ।
म्हणे स्त्रिया जाती पापरुपिणी । अविश्र्वासाचें भांडार हें ॥ ५५ ॥
हिताहित कदा न जाणती । भलतेसें पद ठेविती ।
आपण बुडूनि दुसर्‍यास बुडविती । बेचाळीस पूर्वजांसी ॥ ५६ ॥
स्त्रियांसंगें लाभ किंचित । कांहीं दिसेना सकळ अनहित ।
उगाचि रावे भडाइत । वृषभ जेवीं वनीचा ॥ ५७ ॥
उदयापासूनि सायंकाळ । कष्ट अमित होती तुंबळ ।
एक क्षणही चित्त शीतळ । विश्रांतीतें मिळेना ॥ ५८ ॥
या विषयसुखाची परी । मानावी जरी हृदयांतरी ।
तेथें होय स्वशक्तिबोहरी । निर्बळपणीं मिरवावें ॥ ५९ ॥
ऐसी जीवासी अवस्था होय । मेलिया नरकामाजी जाय ।
केल्या कर्माचें रुप फेडाया । आचरण कांहीं नसेचि ॥ ६० ॥
शिष्यपाप गुरुनाथा । स्त्रीपाप भोगणें भर्ता ।
तस्मात जिकडे तिकडे पाहतां । अनर्थाचें मूळ ती ॥ ६१ ॥  
तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जन । तो प्राणी गा प्रज्ञाहीन ।
महामूर्ख अति मलीण । दुष्कर्माचा भांडारी ॥ ६२ ॥
तन्न्यायें मी मूर्ख झालों । या बाईच्या बोलीं लागलों ।
वरदमंत्रभस्म ओपिलों । सूर्यवीर्या आणोनी ॥ ६३ ॥
याउपरी आणिक वर । मंत्रसंजीवनी आहे अमर ।
सूर्यवीर्ये देहवर । रचिला असेल कोठेंही ॥ ६४ ॥
तरी आतां ठाव सांडिला । शोध करुनि पाहूं वहिला ।
ऐसा मनीं विचार केला । सरस्वतीतें बोलतसे ॥ ६५ ॥
म्हणे माय वो ऐक वचन । घडलें घडो दैवयोगानें ।
तरी सांडिलें भस्म तें ठिकाण । मम दृष्टीसी दावीं कां ॥ ६६ ॥
तुजवरी क्षोभ करावा कांहीं । तरी पदरीं कांही पडत नाहीं ।
तरी सांडिला ठाव माझें आई । निजदृष्टीं दावी कां ॥ ६७ ॥
ऐसे बोलतां नाथ वाणी । भय फिटलें मुळींहूनी ।
प्रांजळ चित्ते शुभाननी । मुखचंद्रा उचंबळी ॥ ६८ ॥
म्हणे महाराजा योगद्रुमा । सांडिला ठाव दावित्यें तुम्हां ।
पुढे चाले उगमा । नाथ जातसे सवें सवें ॥ ६९ ॥
तंव तो उकिरडा केर उद्दाम । गोंवर पडिला पर्वतासमान ।
तेथें जाऊनि सुमधुम । नाथाप्रती सांगतसे ॥ ७० ॥
हे महाराजा तपाजेठी । येथे सांडिली भस्मचिमुटी ।
ऐसें ऐकोनि नाथ होटीं । हांक मारी बालकातें ॥ ७१ ॥
हे हरीनारायण प्रतापवंता । मित्रवर्या सूर्यसुता ।
जरी असशील या गोवरांत । नीघ त्वरित या समयीं ॥ ७२ ॥
या गोवरगिरींत नरदेहजन्म । मिरवला असें तूतें उत्तम ।
तरी गोरक्ष ऐसें तूतें नाम । सुढाळपणीं मज वाटे ॥ ७३ ॥
द्वादश वर्षेपर्यंत । बैसलासी गोवररक्षणार्थ ।
म्हणूनि गोवररक्षक नाम तूतें । पाचारितों स्वच्छंदे ॥ ७४ ॥
तरी आतां न लावी उशीर । हे गोरक्षनाथा निघे बाहेर ।
ऐसें वदतां नाथ मच्छिंद्र । बाळशब्द उद्देला ॥ ७५ ॥
म्हणे महाराजा गुरुवर्या । गोरक्ष असें मी या ठाया । 
परी गोवरनगानें गुंफित काया । भार मौळीं विराजला ॥ ७६ ॥
तेणेंकरुनि शरीरवेष्टण । झालें आहे दडपण ।
तरी गौरीयाते विचारुन । बाहेर काढीं महाराजा ॥ ७७ ॥
ऐसें ऐकूनि बोले उत्तर । लौकरी आणून लोहपत्र ।
मही विदारुनि नगगौर । बाळतनू काढिली ॥ ७८ ॥
काढिली परी ती तनुलता । बालार्ककिरणीं दिसे समता ।
कीं घनमांदुसी विद्युलता । चमक दावी आगळी ॥ ७९ ॥
कीं पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा । दिशा उजळे समयीं निशीच्या । 
तेवी तनुगर्भ मदनाचा । जगामाजी मिरवला ॥ ८० ॥
कीं दुसरा ईश तो चक्रधर । त्यजोनि आतां मूर्तिसार ।
वीट मानूनी क्षीरसागर । म्हणूनि येथें आला असे ॥ ८१ ॥
कुंकुमाकार पदपंकज । सरळ आंगोळ्या तेजःपुंज ।
चंद्राकारसम विराजे । नखें अग्र आंगोळी  ॥ ८२ ॥
घोटींव सुनीळ अपूर्व देखा । कीं इंद्रनिळाची झळके बिका ।
मनगटावरी अलौलिका । सकळ पोटरी विराजे ॥ ८३ ॥
गुडघ्यावरी जानुस्थळ । जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ ।
त्यावरी कटितटा अति निर्मळ । हरिमाजासम जाणावी ॥ ८४ ॥
कटीवरती नाभिधाम । त्यावरतें हृदय अति सुगम ।
सुगम परी विद्याधाम । ऐसेपरी वाटतसे ॥ ८५ ॥
सरळ बाहु स्कंधीं शोभत । परी आजानबाहु दिसों येत ।
तयामाजी जग समस्त । उभ्या कर्दळी मिरवती ॥ ८६ ॥
त्यातेंही अंगुळ्या सरळ प्रकाम । तयांअग्रीं नख उत्तम ।
चंद्राकृती तेज उत्तम । कोर जैसी द्वितीयेची ॥ ८७ ॥
असो स्कंधामाजी ग्रीवा सकळ । घोटितां बीक दावी सकळ  ।।
तयावरी हनुवटी निर्मळ । अधरोपरी शोभतसे ॥ ८८ ॥
अधर दंत जिव्हेसहिेत । आनन (मुख) केवळ चंद्र मूर्तिमंत ।
परी आनन नोहे धाम निश्र्चित । वेदधनाचें विराजे ॥ ८९ ॥
सरळ नासिका शुकाग्रवत । उभय चक्षु विशाळवंत ।
चक्षु नव्हेत ते शशिआदित्य । नांदावया विराजे ॥ ९० ॥
भाळ विशाळ कबरी (कुंतल, केस) भार । कुरळ वरती पिंगटाकार ।
ऐसा महाराज सर्वेश्र्वर । उदया आला वाटतें ॥ ९१ ॥
द्वादश वर्षे अलोलिक । सर्वगुणी पाहतां बालक । 
सरस्वतीनें भाळी देख । तर्जनीतें लाविलें ॥ ९२ ॥
मनांत म्हणे ती गोरटी । आहा जनीं मीच करंटी ।
ऐसा पुत्र माझिये पोटीं । येतां दैवें उच्छेदिला ॥ ९३ ॥
चित्तीं उठोनि परम तळमळ । नेत्रीं दाटलें अपार जळ ।
मोहें करपें हृदयकमळ । रुदनसंवादा अनुवादी ॥ ९४ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । म्हणे खेद कां वो करिसी व्यर्थ ।
तुझा नव्हता तो सुत । प्राप्त कैसा होईल ॥ ९५ ॥
पहा पहा अन्नयोग । श्र्वान पराचा भक्षितो भाग ।
परी उलटोनि रसनामार्ग । श्र्वान दैवें विराजे ॥ ९६ ॥
तन्न्यायें मूर्तिमंत । विभाग नसे हा ऐसा सुत । 
आता शोक करिसी कां व्यर्थ । नवशापविभाग ( नवा शाप मिळेळ ) मिरविसी ॥ ९७ ॥
तरी जा तूं येथूनी । नाहक घेसील शापवाणी ।
माझा कोप प्रत्यक्ष अग्नी । ब्रह्मादिकां साहेना ॥ ९८ ॥
ऐसी बोलिला क्रूर वार्ता । सरस्वती पावली भय चित्ता ।
मागें पाऊल ठेवूनि तत्त्वतां । निजसदना पातली ॥ ९९ ॥
येरीकडे गोरक्षनाथें । येऊनि वंदिलें गुरुपदातें ।

मच्छिंद्रनाथ तो प्रसन्नचित्तें । अनुग्रह ओपितसे ॥ १०० ॥
Shri Navanatha Bhaktisar Adhyay 9 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय नववा ( ९ )


Custom Search

No comments: