Friday, January 22, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 13 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेरावा ( १३ ) भाग २/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 13 
Shree Navanath Bhaktisar Adhyay 13 is in Marathi. Jalindar obtained blessings from all gods for Kanifa for his Mantravidya. He along with Kanifa had written forty corers twenty lakhs stanzas of Shabari kavitva as per instructions from God Shiva. He asked Kanifa to complete 12 years Tapas at Badrinath under guidance of God Shiva. Then he proceeded for thirth yatra. He came to Goud-Bangal where Gopichand was a king. His mother Mainavati thought that Jalindar could be her Guru. Jalindar also found her to be his disciple, imparted her with the Brahma-Dnyan.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेरावा ( १३ ) भाग २/२ 
असो ऐसा नृपनाथ । हेलापट्टणी विराजीत ।
जयाची माता सद्गुणभरित । मैनावती विराजली ॥ ९१ ॥
तंव ती सती मैनावती । कोणी एके दिवशीं उपरीवरती । 
दिशा न्याहाळी सहजस्थिती । जालिंदरातें देखिलें ॥ ९२ ॥
तृणभार अधर मौळी । मुक्त विरजला हस्तकमळीं ।
पथिकासमान ग्राममेळीं । मार्गी-येतसे पुढारां ॥ ९३ ॥
परी तेजःपुजं जैसा तरणी । मदनाकृति स्वरुपखाणी ।
निःस्पृह निवृत्त योगींद्र मुनी । देखियला तियेनें ॥ ९४ ॥
मग म्हणे मैनावती । अधर भारा मौळीवरती ।
कैसा चाले धैर्यशक्ती । काय असे तयातें ॥ ९५ ॥
नोहें आधार करबंधन । तेही मिरवती मुक्तमन ।
तरी हा कोणी प्रतापवान । महींलागीं उतरला ॥ ९६ ॥
गण किंवा गंधर्व सुरवर । विरिंची किंवा गंधर्व हरिहर ।
कीं वाचस्पती उशना थोर । प्रतापवान हा असे ॥ ९७ ॥
परी सुदृढ आराधोनि भक्तीं । मिरवूं नरदेहसार्थकगती ।
प्रसन्न करुनि चित्तभगवती । अचळपद वरावें ॥ ९८ ॥
ऐसा विचार करुनि मनीं । परिचारिके पाचारुनी ।
तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी । जगामाजी मिरवीतसे ॥ ९९ ॥
सन्मुख उभी करसंपुटीं । जोडूनि बोले वागवटी ।
कवण अर्थ उदेला पोटीं । निवेदावा महाराज्ञी ॥ १०० ॥
येरी म्हणे वो गजगामिनी । अर्थ उदेला माझे मनीं ।
परी प्राणजीवित्व रक्षूनी । कार्य आपुलें साधावें ॥ १०१ ॥  
प्रगट होता ती वार्ता । परम पडेल क्षोभ चित्ता ।
मग त्या उदकप्रवाहीं वाहतां । परम संकट मिरवेल ॥ १०२ ॥
म्हणोनि गौप्य धरोनि वचन । कार्यमांदुसा सोडिजे संधान ।
मग तें वर्णितां सभाग्यपण । अंबर ठेंगणें वाटतसे ॥ १०३ ॥
म्हणोनि तिनें उभवूनि तर्जनि । खुणें दाविलें तिजलागुनी ।
कोण येत प्रविष्टतरणी । मौळीं तृण वाहोनियां ॥ १०४ ॥
तंव ती खूण परिचारिका । पाहती झाली जालंदर विवेका ।
तों मौळीं भारा अधर देखा । सवें सवें चालतसे ॥ १०५ ॥ 
तें पाहूनियां निजदृष्टीं । विस्मय करी आपुले पोटीं ।
म्हणे माय वो परम धूर्जटी । योगसिद्ध असे हा ॥ १०६ ॥
कनकवर्ण बालार्ककिरणीं । महीं मिरवितसे योगप्राज्ञी ।
तरी हा स्चर्भूवर्लोकप्राणी । सहसा येत असे जननीये  ॥ १०७ ॥
सत्यलोक भूलोक तपोलोक । तयाचे गमनें शोभती देख ।
स्मरारि कीं स्मरजनक । महीलागीं उतरला ॥ १०८ ॥
तरी माय वो ऐक वचन । सलीलभक्तीं आराधून ।
तैं चित्तभगवती प्रसन्न करुन । कल्याणदरीं रिघावें ॥ १०९ ॥
जैसें ध्रुवानें अढळपद । जिंकूनि हरिला सकळ भेद ।  
जन्ममृत्यूंचे दृढ बंध । मुक्त केले जननीये ॥ ११० ॥
तन्न्याय दास दासी । ओपूनि ऐशा शत पुरुषांसी ।
चिरंजीव प्रसाद ओपूनि देहासी । अचळ महीतें वर्तावें ॥ १११ ॥
ऐसी परिचारिकेची युक्ती । ऐकूनि बोले मैनावती ।
म्हणे माय वो तरुनि आर्ती । चित्तस्वरुप करावें ॥ ११२ ॥
तरी येवढा प्राज्ञीक ज्ञानी । वस्तीस राहतो कोणे स्थानीं ।
तितुकें गुज गोचर करुनी । लगबगें येईं कां ॥ ११३ ॥
अवश्य म्हणोनि परिचारिका । जाती झाली सदैविका ।
तंव तो संचारुनि ग्रामलोका । गोधनांतें पाहतसे ॥ ११४ ॥
तंव तीं गोधनें ग्रामवाटीं । अपार जात असती चव्हाटीं ।
तृण सोडूनि ते थाटी । सुपंथी तेथ गमतसे ॥ ११५ ॥
तंव ती दासी मागे मागे । जात असे लगबगें ।
मग गंधगल्लीं कुश्र्चळयोगें । जाऊनियां बैसला ॥ ११६ ॥
तेथें क्षण एक उभी राहून । पहात त्याचें अचळपण ।
सूर्य पावें तों अस्तमान । अचळस्थान रक्षिलें ॥ ११७ ॥
मग ती येऊनि वाताकृती । पूर्ण झाली सांगती । 
अमुक स्थानीं चित्तभगवती । प्रसन्नचित्तीं स्थिरावे ॥ ११८ ॥
कुश्र्चित जागा दुर्गंधव्यक्त । माये वो असे सर्व एकांत ।
तया स्थानीं पिशाचवत । वस्तीलागीं ठिकाण ॥ ११९ ॥
जेथे न राहे श्र्वानसूकर । कर्दम कुवेग गंध अपार ।
वस्ती विराजून पिशाचसर । वल्गना ते वदतसे ॥ १२० ॥
ऐसी ऐकूनि तियेची वाणी । म्हणे स्थिर वो शुभाननी । 
रहित होतां जनसंबोध यामिनी । मग जाऊं दर्शना ॥ १२१ ॥
अवश्य म्हणोनि परिचारिका । मग मध्ययामिनीं सद्विवेका ।
उत्तम फळ ठेऊनि तबकां । षड्रसाने मिरविलें ॥ १२२ ॥
काळीं कांबळी गुंतूनि बुंधी । परिचारिका मैनावती ।
येत्या जाहल्या स्थान एकांती । लक्षोनियां महाराजा ॥ १२३ ॥
तंव तो सिद्धरायमुनी । परमहंसाच्या आव्हानूनि वहनीं ।
मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानीं । बैसलासे महाराजा ॥ १२४ ॥
मग त्या उभय सहित युवती । जाऊनि लोटल्या पदावरती ।
मूर्ध्नीकमळ प्रेमभरती । पदकमळीं ओपिती ॥ १२५ ॥ 
सन्मुख जोडूनि उभय कर । सप्रेम भक्ती वागुच्चार ।
चातुर्यगंध म्लान अपार । समर्पिली लाखोली ॥ १२६ ॥
म्हणसी महाराजा सर्वज्ञराशी । त्रिविधताप उभय उद्देशी ।
ते तूं दाहिले जीवित्वासीं । मोक्षमांदुसा जाणूनियां ॥ १२७ ॥
तरी ऐशिया तपोदरीं । समयजलदा लक्षूनि अंतरी ।
कल्पनासदनाचा पेटला भारी । विझवावया पातलों ॥ १२८ ॥
तरी औदार्याचें पाहूनि मुख । त्रिविधतापांचा सबळ पावक ।
विझवूनि चित्तमहीतें पिक । ब्रह्मकर्णी पिकावें ॥ १२९ ॥
ऐसें तयाचें वागुत्तर । प्रविष्ट होतां निशिकर । 
तेणेंकरुनि चित्तसागर । आनंदलहरीं दाटला ॥ १३० ॥ 
दाटला परी संकोचित । चंद्र आकाशीं उदधि महींत ।
तरी भक्तिपंथिका चक्रवात । अस्ताचळीं योजावा ॥ १३१ ॥
ऐसे चित्त योजूनि नाथा । दाविता झाला तीव्रवार्ता ।
मैनावतीचे सकळ चित्ता । किंवा कसोटीं पाहतसे ॥ १३२ ॥
पिशाच चेष्टा उद्दामनीती । आव्हानूनि सदृढयुक्तीं ।
महीचे पाषाण हातीं । कवळोनियां झुगारी  ॥ १३३ ॥
अशुभवाणीं करुनि वल्गना । भंगूं पाहे चित्तप्रेमा ।
मेघऔदार्याच्या दुर्गुणा । पाषाणकारका ओसांडी ॥ १३४ ॥
परी ते जाया धैर्यवंत । निश्र्चयअर्गळी योजूनि सदृढ चित्त ।
म्हणे याचे हस्तें मृत्य । आल्या मोक्ष वरीन मी ॥ १३५ ॥
ऐसें योजूनि सदृढ मांडी । बैसली ठाव कदा न सांडी ।
जैसा पर्वत अचळ विभांडी । मेघधारा न गणोनि ॥ १३६ ॥
परी तो नाथ जालिंदर । ओसंडितां पाषाणपूर ।
परी ती रामा वज्राकार । अचळ पाहूनि तोषला ॥ १३७ ॥ 
मग हस्तें झाडूनि पाषाणद्याडी । म्हणे कोण तूं सांग गोरटी ।    
किमर्थ आजि माझिये पृष्ठीं । लागपाळती केली त्वां ॥ १३८ ॥
दुर्गंधी गल्ली ओंगळींत । आहे उगलाचि मी पिशाच येथ ।
तरी तुज पेटला किमर्थ अर्थ । कामानळें दाटला ॥ १३९ ॥
कवण कोणाची नितंबिनी । वेगीं वद वो शुभाननी ।
आम्ही तपी अलक्ष ध्यानीं । लक्ष भंगाया कां आलीस ॥ १४० ॥
यावरी म्हणे ती महाराजा । त्रिलोचनराज विजयध्वजा । 
तयाची कांता सर्वज्ञभोजा । धर्मपत्नी मी असें ॥ १४१ ॥
असे परी जी योगद्रुमा । काळें भक्षूनि पतिउत्तमा ।
मातें केलें प्लवंगमा ( वानरी ) । जगामाजी मिरवावया ॥ १४२ ॥
ऐसेपरी योगजेठी । काळचक्र पाहूनि राहटी ।
मग भयार्कउदक पाहूनि पोटीं । पश्र्चातापी मिरविलें ॥ १४३ ॥
काळें पतीची केली गती । तैसीच करील मम आहुती ।
 तरी मानवसन्निपातीं । आरुक मातें होई कां ॥ १४४ ॥
येरि म्हणे त्वद्भर्ता । पावोनि लया त्वरिता ।
कवण आश्रमीं काळचरिता । लोटसी तूं जननीये ॥ १४५ ॥
येरी म्हणे वो सदैवभरिता । सुत एक आहे प्रपंचा ।
येरु म्हणे कवण अर्था । प्रपंचराहटी चालवी ॥ १४६ ॥
तंव ती म्हणे गौडबंगाल । राज्यसदनीं देश विपुल ।
तयाचा नृप गोपीचंद मूल । दास तुमचा विराजे ॥ १४७ ॥
परी असो कर्मराहटी । कृतांतउद्देशाचे पाठीं ।
मम मौळींचा भार निवटीं । कृपा झणीं करुनियां ॥ १४८ ॥
ऐसें ऐकूनि तियेचें वचन । म्हणे कृतांतपाश दृढबंधन ।
कैसें तुटे गे मग पिशाचान । तुवां काय जाणितले ॥ १४९ ॥
तरी आतां क्षण उभी न राहीं । वेगीं आपुल्या सदना जाईं ।
तव सुता कळतां अनर्थप्रवाहीं । मति त्याची मिरवेल ॥ १५० ॥
ऐसें बोलतां सांगोपांग । तों मित्रउदयाचा पाहिला मार्ग । 
मग नमस्कारुनि स्वामी सवंग । सदनाप्रती पातली ॥ १५१ ॥
पातली परी अर्थवियोग । चित्तसरितीं दाटला भाग ।
अति तळमळे प्रसादमार्ग । कृपार्णवीं भेटावया ॥ १५२ ॥
ऐसी तळमळे दुःखव्यथा । तों दिनकर लोटला अस्ता ।
होतां चंद्रविकास ती वनिता । विकासली आनंदे ॥ १५३ ॥
पुन्हां घेऊनि परिचारिका । तेथें आली सदयविवेका ।
दृष्टीं पाहूनि योगिमृगांका । चरणीं माथा ठेवीतसे ॥ १५४ ॥
मग सलगभक्तीची करुनि दाटी । सदृढ चरणीं घातली मिठी ।
पद कवळोनि हस्तपूटीं । पद चुरीत प्रेमानें ॥ १५५ ॥
ऐशी सेवा दोन प्रहर । करितां अगम्यलीला तंव ।
तें पाहूनि नमस्कार । स्वामीसी करुणा उठतसे ॥ १५६ ॥
पुन्हां येऊनियां सदनीं । आचरे आपुली प्रपंचराहणी ।
अस्त होताचि वासरमणी । स्वामीसी जाऊनि लक्षीतसे ॥ १५७ ॥
सद्भाव उदय दावूनि प्रेमा । सेवा करीतसे मनोधर्मा ।
परी सेवा करितां षण्मासउगमा । दिन लोटूनि गेले पैं ॥ १५८ ॥
 यापरीं कोणे एके दिवशीं । काळुखी दाटली अपार महीसी ।
परी सेवा करावयासी । पातली नित्यनेमानें ॥ १५९ ॥
तंव ती मूर्ध्नीखाली अंक । ठेऊनियां देतसे टेंक ।
त्या संधींत योगिनायक । काय करिता झाला पैं ॥ १६० ॥ 
मायिक सबळ करुनि भ्रमर । रुंजी घाली तियेवर ।
न कळतां येऊनि महीवर । अंकाखाली रिघाला ॥ १६१ ॥
ऐसें करुनि अवस्थेंत । आपण गाढ झाले निद्रिस्त ।  
चलनवलन सांडूनि स्थित । कंठी घोर वाजवी ॥ १६२ ॥
तंव तो षट्पद जानूपरी । फोडूनि निघाला नेटें उपरी ।
ग्रीवे डसूनि जांलिदरा परी । सुचविलें अर्थातें ॥ १६३ ॥
 तंव तो लगबगें अति त्वरित । उठोनि हस्तें पाहे ग्रीवेंत ।
ग्रीवा पाहोनि सतीअंकांत । दृष्टी करी महाराजा ॥ १६४ ॥
अंक फोडोनि पडे छिद्र । रुधिर दाटलें महीं अपार ।
तें पाहूनियां जालिंदर । धैर्यबळ ओळखिले ॥ १६५ ॥ 
मग सहज कृपेची करोनि दृष्टी । मौळी कुरवाळी कृपाजेठी ।
मग तारकमंत्र कर्णपुटीं । उपदेशिला तत्काळ ॥ १६६ ॥
मंत्रउपदेश ओपितां कानीं । खूण व्यक्त दाविली संजीवनी ।
तेणें खुणें पारायणीं । ब्रह्मव्यक्त झालीसे ॥ १६७ ॥
किंबहुना चराचरीं । जीव तितुका संगमस्थावरीं ।
अहंब्रह्म भुवनापासुनि आकारीं । ब्रह्मदृष्टी हेलावे ॥ १६८ ॥
ऐसा होतां चमत्कार । मग मौळी ठेवी चरणावर ।
म्हणे महाराजा सकळ व्यापार । आजि मिरवला सुगमत्वें ॥ १६९ ॥
यापरी तो कृपाळू मोक्षदानी । आणिक करिता झाला करणी ।
मंत्रप्रयोगें संजीवनी । ते देहीं प्रेरीतसे ॥ १७० ॥
जी निर्जीवित्वा उठवील । ती जीवित्वा काय न करील ।
असो मैनावतीसी अमरवेल । देहीं होऊनि ठेविलीसे ॥ १७१ ॥
जैसें रामें दानवकुशीं । चिरंजीव केले बिभीषणासी ।
तन्न्यायें मैनावतीसी । श्रीजालिंदरे केले पैं ॥ १७२ ॥
मग नित्यनित्य प्रेमभक्ती । विशाल मिरवे भावस्थिती ।
परी आणिक काम उदेला चित्तीं । पुत्रमोहेंकरोनियां ॥ १७३ ॥
मनांत म्हणे चमत्कार । जानू भेदिली स्थिर भ्रमरें ।
त्या दुःखाचा घाय अनिवार । जानू वरी मिरवला ॥ १७४ ॥
घाय पडतां अनिवार । अशुद्धाचा लोटला पूर ।
तयावरी स्पर्शतां कर । जैसी तैसी मिरविली ॥ १७५ ॥
तरी सध्यां चमत्कार । झाला मम दृष्टीं गोचर ।   
आणिक केले सनातनसार । ब्रह्मव्यक्तिपरायण ॥ १७६ ॥
तरी चिरंजीवपद देऊनि मातें । अचल केलें त्रैलोक्यातें ।
याचि रीतीं माझ्या सुतातें । होतें तरी फार बरवें ॥ १७७ ॥
ऐसें योजूनि दृढ मानसीं । वियोगव्यथा वरिली देहासी । 
ती व्यथा नरहरिवंशीं । धुंडीसुत मालू सांगे ॥ १७८ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । त्रयोदशाध्याय गोड हा ॥ १७९ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्रीनवनाथभक्तिसार त्रयोदशाध्याय संपूर्ण ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 13 
 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेरावा ( १३ )


Custom Search

No comments: