Friday, January 8, 2016

Shri NavnathBhaktisar Adhyay 12 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बारावा ( १२ ) भाग २/२


Shri NavnathBhaktisar Adhyay 12
Shri NavnathBhaktisar Adhyay 12 Jalindar ran away from the palace as he was not ready to marry. He came in the forest where God Agni met him. God Agni told him that you are not son of king Bruhadrava but he was son of God Agni only. Then he asked Jalinder what was his wish. Jalinder told him that he wanted to do some good to the people. God Agni thought carefully and decided to take Jalindar to God Datatreya at BadriNath. God Dattatreya welcomed both of them. Knowing about Jalinder he asked God Agni to leave Jalinder with him for 12 years so that he can teach him all vidyas. After 12 years God Agni came back till that time Jalindar has acquired knowledge of all vidyas. God Dattatreya asked God Agni to get blessings from all gods of the vidyas for Jalinder and then Jalinder should complete 12 years of rigorous Tapas. As told by God Dattatreya Jalinder completed the tapas. Then God Shiva stood before him and God Agni. He blessed Jalinder and told him that prabhudha Narayan has taken birth from brahma vidya in the ear of a big elephant. Hence all three searched for the elephant then they saw the elephant in the forest. God Shiva told them that the elephant was very powerful and he won't allow anybody to come near to him. However Jalindar used Sprashastra Mantravidya and fixed elephant. Then he went near, praised the elephant and called Prabudha Narayan at the ear of elephant. Jalinder told him that as his birth is from the ear he was named as KarnaKanifa. Kanifa came out. Then Jalindar helped him to come down to the ground. Then he asked Kanifa to bow to God Shiva and God Agni. Then after God Agni went away and God Shiva took care of Kanifa for about six months after which God Datta and Jalindar imparted all the knowledge of the Astra-Mantra vidya to Kanifa. However Jalindar purposely held back knowledge of Sanjivani vidya and Vatakarshan vidya from Kanifa as his birth was from the ear of elephant. Elephants are very wise in taking revenge. If Kanifa has this bad virtue he may mutualise Sanjivani vidya and Vatakarshan vidya hence that knowledge was not passed on to him. God Shiva asked Jalindar to obtain blessings for Kanifa from Gods of all vidyas. Hence Jalindar called all the gods by using stavanastra. All gods of all vidyas came but refused to bless Kanifa since he has not completed 12 years tapas. Jalinder was very angry and there started a war between Gods and Jalindar. Jalindar defeated them and made them to bless Kanifa. He further asked all Gods to be helpful for his Shabari Kavitva. Now in the 13th adhyay Dhundi sut poet Malu from Narahari family will tell us what happened next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बारावा ( १२ ) 
भाग २/२
प्रळयकाळ कृतांत शमे । तोही शांतवेल उत्तमोत्तमें ।
तें दिग्गजा तीव्रता प्रकाम । कोठें असेल महाराजा ॥ १०१ ॥
वातगती चक्रराहटी । तेही कुंठित होईल जेठी ।
मम मित्रस्यनंदन भवकोटी । स्थिर कैसा होईना ॥ १०२ ॥
तन्न्याये ब्रह्मांड जिंकितां । पावे हा मज कां न स्थिरता ।
तरी महाराज चमत्कार आतां । निजदृष्टीं विलोकीं  ॥ १०३ ॥
मग कक्षेमाजी भस्मझोळी । करतर्जनीं चिमुटी ओळी ।
मोहनास्त्र तदनुकाळीं । जपता झाला महाराज ॥ १०४ ॥
मोहनास्त्रामागें पवित्र । प्रेरिता झाला स्पर्शास्त्र ।
जपूनियां शुद्ध मंत्र । भस्मचिमुटी सोडीतसे ॥ १०५ ॥
तवं तें अस्त्र होतां व्यक्त । तीव्रपणी गज झाला शांत ।
यापरी महीं चरण चतुर्थ । सुदृढ व्यक्त झाला तो ॥ १०६ ॥
मग म्हणे शिवासी तातासहित । येथेंचि असावें स्वस्थचित्त ।
मी करीपाशी जाऊनि त्वरित । कानिफातें आणितो ॥ १०७ ॥
ऐसें ऐकतां वागुत्तर । अवश्य म्हणे श्रीशंकर ।
मग तो तेथूनि जालिंदर । गजापाशीं पातला ॥ १०८ ॥
परी मोहनास्त्र प्रतापवंत । सर्व अंगे गज झाला शांत ।
निकट जाऊनि तयाचे त्वरित । आदरोक्ती बोलतसे ॥ १०९ ॥
म्हणे बा रे धीरपण । कोणी नसे तुजसमान ।
तुझे कर्णी दिव्यरत्न । महासिद्धीनें निर्मिलें ॥ ११० ॥
हांक मारुनि बोले त्यातें । म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ ।
गजकर्णी होऊनि व्यक्त । अवतारदीक्षा मिरविसी ॥ १११ ॥
तरी आतां झडकरी । कर्ण सोडूनि ये बाहेरी ।
तूतें नाम या देहापरी । कर्णकानिफा साजतसे ॥ ११२ ॥
ब्रह्मवीर्य कर्णउत्पत्ती । म्हणूनि नाम तुजप्रती ।
तूं तव कानिफा सर्वज्ञमूर्ती । दृश्यमान होई कां ॥ ११३ ॥
ऐकूनि जालिंदराचें वचन । बोलता झाला विधिनंदन ।
हे महाराजा गुणनिधान । स्थिर असा महीतें ॥ ११४ ॥
मग त्वरें येऊनि कर्णद्वारीं । दृष्टीं पाहे ब्रह्मचारी ।
सहज करुनि उभयकरीं । नमस्कारी प्रेमानें ॥ ११५ ॥
षोडशवर्षीं वयमान । बाळतनू देदीप्यमान ।
तयाचे तेजें सकळ कानन । तेजामाजी डवरलें ॥ ११६ ॥
मग जालिंदरे देऊनि हस्त । खालीं उतरिला कर्णसुत ।
स्कंधीं वाहूनि प्रेमें स्नेहभरित । शिवापाशीं पातला ॥ ११७ ॥
स्कंधींचा उतरुनि ठेवी महीशीं । म्हणे कानिफा सर्वज्ञराशी ।
नमस्कारीं उमावरासी । वीर्यवंता महाराजा ॥ ११८ ॥
त्यातें नमूनि जनकासमेत । द्विमूर्धनी आजी तात ।
त्यातें नमस्कारुनि त्वरित । श्रेयवंत होई कां ॥ ११९ ॥
मग शिवासी करुनि नमस्कार । उपरी नमिला वैश्र्वानर ।
त्याहूनि प्रीती अति थोर । जालिंदर नमिलासे ॥ १२० ॥
उपरी अत्यंत स्नेहभरितीं । शिवें कवळूनि सप्रेम हस्तीं ।
आपुले अंकीं बाळमूर्ती । कर्णकानिफा बैसविला ॥ १२१ ॥
परम प्रिय अति लालन । घेतलें बाळाचें चुंबन । 
मग जालिंदरा बोले वचन । बाळा देई अनुग्रह ॥ १२२ ॥
तव अनुग्रह झाल्यापाठीं । मोडेल अज्ञानदशाराहाटी ।
सकळार्थ विजय पोटीं । कर्णकानिफा मिरवेल ॥ १२३ ॥
जैसा होतां अर्कोदय । अंधकार पावे विलय ।
तैं सकळ जनांचे हे व्यवसाय । तन्न्यायें बाळा करावें ॥ १२४ ॥
कीं द्रव्य असतां गृही भरतीं । मग सकळ व्यवसाय तया सुचती ।
तन्न्यायें कृपामूर्ती । बाळालागी करावें ॥ १२५ ॥
ऐसें ऐकूनि आदिनाथवचन । जालिंदर तो तुकावी मान ।
मग तोचि घडी क्रियामंडन । संकल्पांत आव्हानी ॥ १२६ ॥
तन मन धन काया वाचा । त्याग केला दुर्गुणांचा ।
तो संकल्प निःसंकल्प साचा । गुरुराज वंदिला ॥ १२७ ॥
मग वरदहस्त स्पर्शोनि चंद्रमौळी । कर्णी ओपिली मंत्रावळी ।
तेणें सकळ अज्ञानकाजळी । फिटोनि गेली तत्काळ ॥ १२८ ॥
जैसा सदनीं लावितां दीप । तीव्र तमाचा होय लोप ।
तेवीं मंत्रबीजमाप । अज्ञानकर्दमपण निवटी कां ॥ १२९ ॥
व्यक्ताव्यक्त सकळ भास । पूर्ण झाला विजयपणास ।
मग चराचरीं माझाचि वास । एके रुपें चर्ततसे ॥ १३० ॥
ब्रह्मदृष्टी संकलित खूण । दृश्यगुरुमुखेंकरुन ।
तें हरि रुद्र ब्रह्मरुप चैतन्य । ऐक्यरुपें मीनलें ॥ १३१ ॥
असो ऐशी होतां राहाटी । मग उठते झाले चतुर्थ जेठी ।
पदीं चालतां महीपाठीं । बद्रिकाश्रमीं पातले ॥ १३२ ॥
मग सुवचनीं द्विमूर्धन । युक्ती सांगे जालिंदराकारण ।
बा रे जें कां दत्तवचन । कानिफातें समर्पी ॥ १३३ ॥
ऐसें सांगूनि स्वयें युक्ती । अदृश्य झाला दाहकमूर्ती ।
वरी सादृश्यपणें उमापती । षण्मासें त्यातें मिरवला ॥ १३४ ॥
परी षण्मासदिनांमाझारी । दत्तकृपेची विद्यालहरी । 
सांठवूनि कानिफाअंतरी । केला भांडारी विद्येचा ॥ १३५ ॥
सकळ अस्त्रीं केला प्रवीण । परी संजीवनी अस्त्र देदीप्यमान ।
आणि दुसरें वाताकर्षण । जालिंदरें रक्षिलें असे ॥ १३६ ॥
म्हणाल करुनि रक्षण । सांगितलें सकळ विद्येचें कारण ।
तरी इतुकेंच रक्षावयास संशय कोण । जालिंदरा उदेला हो ॥ १३७ ॥
तरी संशयाचें कारण । गजकर्णी झाला जन्म ।
तया स्थानींचा उत्तम गुण । उभयतांचा मिरवेल ॥ १३८ ॥
दांभिक बुद्धिसंस्कार । पाहूनियां जालिंदर ।
वाताकर्षण संजीवनीमंत्र । अस्त्र भिन्न रक्षिलें ॥ १३९ ॥
परी सकळ अस्त्रीं झाला निपुण । मग बोलता झाला उमारमण ।
अस्त्र देवता करुनि प्रसन्न । कानिफातें देई कां ॥ १४० ॥
मग स्तवनास्त्र जपोनि त्वरित । बोलाविले सकळ दैवत ।
इंद्र वरुण आश्र्विनीसहित । महीलागीं उतरले ॥ १४१ ॥
दानव मानव प्रतापवंत । अतळ वितळ पाताळीं जे विख्यात ।
नवनागकुळें वंशवंत । तेही पातले ते ठाया ॥ १४२ ॥
चंद्रसूर्य गणगंधर्व । यक्ष किन्नर आले सर्व ।  
विष्णुसहित कामोद्भव । महींलागीं उतरले ॥ १४३ ॥
खगेंद्रासहित प्लवंगम । येता झाला दाशरथी राम । 
अवतारदक्ष विष्णु दशम । दशअवतारीं मिरवला ॥ १४४ ॥
बावन्न वीर जळदेवता । शंखिनी डंखिनी कालिकेसहिता ।
अष्टभैरव गण पाताळनाथ । गजानन मिरवला ॥ १४५ ॥
ऐशा देवता वर्णू किती । मृत्युलोकीं पूर्ण विख्याती ।
तेहतीस कोटी संख्या बोलती । दृश्य झाले तितुकेही ॥ १४६ ॥
असो ऐशा समुच्चयाकारणें । त्यासी जालिंदर करी नमन ।
बद्धांजळी सर्वा जोडून । बोलता झाला त्तक्षणीं ॥ १४७ ॥
म्हणे महाराजा कृपामूर्ति । कानिफा मिरवला सद्विद्येप्रती ।
तैं योग देऊनि निगुतीं । कार्यालागीं वर्तावें ॥ १४८ ॥
ऐसें ऐकूनि तयाचे वचन । दैवतें बोलती सकळ जाण ।
तुज आम्हीं वरप्रदान । सद्विद्येसी दिधलेसें ॥ १४९ ॥
दिधलें परी कवणार्थी । श्रीपावकाच्या मोहाप्रती ।
आणि अत्रिसुत तुम्हांप्रति । विद्यानाथ झालासे ॥ १५० ॥
ऐसें उभयतांच्या भिडेंकरुन । तुम्हासी दिधलें वरप्रदान ।
परी पुढें आणिका कारण । वर मिरवत नाहीं जी ॥ १५१ ॥
तेथूनि तुम्ही पुढतपुढती । शिष्य सकळ अगणित मिती ।
तितुक्यांसी सद्विद्येप्रती । वर किती ओपावा हो ॥ १५२ ॥
बरें म्हणाल का वाइट । परी वर न ओपूं आम्ही स्पष्ट ।
मानाल तैसें महाश्रेष्ठ । दुःख देहीं आपुल्या ॥ १५३ ॥
ऐसें म्हणूनि विमानीं । बैसते झालें तत्क्षणीं ।
तें जालिंदर दृष्टीं पाहोनी । परम चित्तीं क्षोभला ॥ १५४ ॥
म्हणे माझा अनादर । करुनि जातां स्थानावर ।
परी माझा चमत्कार । निजदृष्टीं पाहावा ॥ १५५ ॥
मग करीं कवळूनि भस्मचिमुटी । वातास्त्र प्रेरिता झाला जेठी ।
तेणेंकरुनि नभापोटी । प्रेरक झालें वातास्त्र ॥ १५६ ॥
तें वातास्त्र अति तीव्र । प्रगट होतां वातचक्र । 
तैं सकळ विमानें नभावर । भ्रमण करिती वातानें ॥ १५७ ॥
तें पाहूनियां गंधर्वनाथ । गुणीं गांडीव चढवितां सिद्ध । 
आदिदेव सुरवरादि समस्त । सज्ज केले सायकें ॥ १५८ ॥
मग नानास्त्रें जपूनि युक्ती । शर सोडिती नाथावरती ।
तें पाहूनि जालिंदर जती । निवारण करी सर्वांचें ॥ १५९ ॥
पर्वतास्त्र गंधर्व प्रेरिती । वज्रास्त्र प्रेरी अमरपती ।
यक्ष अग्निअस्त्रें सोडिती । जळदास्त्र वरुण तो ॥ १६० ॥
धूमास्त्र अश्र्विनी देव । नागास्त्र प्रेरिती सकळ दानव ।
ऐशीं अस्त्रें बहुत गौरव । बहुतांनी तीं निर्मिलीं ॥ १६१ ॥
परी हरि आणि हर । दृष्टीं पाहाती चमत्कार ।
म्हणती पुढें कैसा विचार । निजदृष्टीं पाहूं कीं ॥ १६२ ॥
ऐशी अस्त्रें प्रेरिती बहुत । तें पाहुनि जालिंदरनाथ ।
मग सकळ अस्त्रांवरी मोहनास्त्र । योजिता झाला महाराजा ॥ १६३ ॥
तें मोहन अस्त्रांतरीं । प्रवेशूनि करी प्रताप बाहेरी ।
जालिंदरातें अवलोकन करी । नमूनि जात असे अस्त्र ॥ १६४ ॥
ऐसें अस्त्र सकळ आलें । परी जालिंदरा नमूनि गेलें ।
परी पर्वतास्त्रें युक्त केलें । निवटिलें वातास्त्र ते ॥ १६५ ॥
मग विमानें होऊनि स्वर्गी स्थिर । समूळ आटले वातचक्र ।
मग एकाएक बोलती उत्तर । कैसा विचार करावा ॥ १६६ ॥
जीं जीं अस्त्रें प्ररितो आपण । तीं तेथें जातीं नमून ।
तरी आतां शस्त्रें घेऊन । महींलागीं उतरावें ॥ १६७ ॥
तीव्र शस्त्रघातेंकरुन । द्वंद्वमुखांते करावें आव्हान ।
मग तयाचा घेऊन प्राण । स्वर्गवासी करावा तो ॥ १६८ ॥  
ऐसें मानलें सर्वां चित्तीं । विमानें उतरली महीवरती ।
मग मुद्गल फरश अंकुश शक्ती । घेवोनियां धांवले ॥ १६९ ॥
त्रिशूळ खड्ग भाले तोमर । फरश मुरस पाडू कट्यार ।
गदा चक्र बरची यंत्र । दारुकादि उभवले ॥ १७० ॥
गुप्ती भाले असिलता । ऐशी शस्त्रें किती वर्णिता ।
असंख्यरुपी प्राणहर्ती । घेवोनियां धावलें ॥ १७१ ॥
तें पाहूनि जालिंदर । सोडता झाला कामिनीअस्त्र ।
कामिनीअस्त्रावरी पवित्र । कामअस्त्र प्रेरिले ॥ १७२ ॥
कामिनीअस्त्र प्रगट होतां । अगणित स्त्रिया तेजभरिता ।
उदया पावूनि कामवार्ता । दर्शविता रायासी ॥ १७३ ॥
परी त्या स्त्रिया कैशा । रंभेहूनि शतगुण ऐशा ।
भ्रुकुटीसायक नेत्रकटाक्षां । शर सोडिती कामाचे ॥ १७४ ॥
तयामागें कामास्त्र । सर्वां हृदयीं रिघोनि पवित्र ।
तेणें लंपट होऊनि सर्वत्र । प्रणययुद्धा उसळले ॥ १७५ ॥
मग एकाएकींच्या ध्यानीं । लागूनि करिती नम्र विनवणी ।
तंव त्या पळती रानोरानीं । हेही धावती त्यामागें ॥ १७६ ॥
परी बद्रिकाश्रमीं बद्रितरु । त्यातें वर्णितां नसे पारु ।
कीं वाट दावी कंटकापारु । तयामाजी रिघाल्या ॥ १७७ ॥
तंव त्या कामिनी कंटकवनीं । बद्रतरुतें जाती वेधुनीं ।
देवही तैसे तरु कवळूनी । वृक्षावरी वेंधती ॥ १७८ ॥
एक वृक्षावरी एक एकावरी । तैसे एक एक वेंधले तयांवरी ।
निकट जाऊनि विनंती करी । वश्य होय म्हणवूनि ॥ १७९ ॥
सकळ वृक्षा गेले वेंधून । तें पाहूनि जालंदर नंदन ।
मग स्पर्शास्त्र मंत्र जपून । भस्मचिमुटी सोडीतसे ॥ १८० ॥
स्पर्शास्त्र प्रगट होतां । सकळ कामिनींसी झाली प्रेरकता ।
तें पाहूनि कामिनी तत्त्वता । उड्या सोडिती महीतें ॥ १८१ ॥
तयांच्या मागें देव भले । उड्या सोडिती अति वहिलें ।
परी स्पर्शास्त्रें पदातें धरिलें । तरुशाखेतें कवळूनी ॥ १८२ ॥
मग खालीं मौळी वरते पद । मध्येंचि लोंबती देववृंद ।
मुकुट महीतें पडोनि बद्ध । कबरी मोकळी हेलावे ॥ १८३ ॥
जैसें सुग्रीव पक्ष्याचें घर । तरुसी लोंबती दिसती अपार ।
कीं दिनउदयीं शाखेवर । वडकाळिका झोंबती ॥ १८४ ॥
तन्न्यायें तरुवरती । देव उफराटे झोळकंबे घेती ।
तें पाहूनी उमापती रमापती । हास्य करिती गदगदां ॥ १८५ ॥
म्हणती बरवी झाली मौज । ऐसा मिळाला नाहीं भोज ।
न मारितां सकळ ज्ञानकाज । बरें जाणोनियां घेतलें ॥ १८६ ॥
मग स्त्रियां तळवटीं । काम करित्या झाल्या शेवटीं ।
सकळांचें चीर फेडूनि करपुटीं । नग्नशरीरी मिरवले ॥ १८७ ॥
सकळ वस्त्रें जालिंदरापासीं । स्त्रिया आणूनि करिती राशी ।
मग जालिंदर कानिफापाशीं । हळूचि खुणे सांगतसे ॥ १८८ ॥
देव सकळ झाले नग्न । त्यांतें नेसवूनि येई वसन ।
मग तो कानिफा घेऊन वसन । ज्याचे त्यासी नेसवीतसे ॥ १८९ ॥
नेसवितां देव बोलत । अहो गुरुची करणी विपरीत ।
विध्वंसले असे सामर्थ्य । योग्यायोग्य दिसेना ॥ १९० ॥
ज्यांची ब्रह्मांडभरी कीर्ति । ते तरुलागीं कैसे लोंबती ।
ऐसे म्हणूनि तयापरती । वसनालागीं परिधानी ॥ १९१ ॥
म्हणे महाराजा गुरुसी चोरुन । तुम्हां परिधानितों गुप्त वसन ।
तरी हें ऐसें वर्तमान । बोलूं नका गुरुतें ॥ १९२ ॥
वसन नेसल्या उपरी । पाय वंदी उभय करीं ।
भाळ ठेवूनी पदावरी । आणिक जात पुढारां ॥ १९३ ॥
मग कानिफाची नेत्रभक्ती । पाहुनी तुष्टले देव चित्तीं ।
मग प्रसन्न होऊनि वरदहस्तीं । वरा ओपिती कृपेनें ॥ १९४ ॥
मनीं करुनि दृढ विचार । विना दिधल्यावाचूनि वर ।
सोडणार नाहीं जालिंदर । कृतनिश्र्चय हा असे ॥ १९५ ॥
ऐसा निश्र्चय करुनि चित्तीं । प्रसन्न चित्तें वर ओपिती ।
जें जें अस्त्र तयाचे शक्ती । आम्ही मिरवूं निश्र्क्यें ॥ १९६ ॥
मग सकळीं देऊनि वरप्रदान । कानिफा केला वरदवान ।
तें ऐकूनि पावकनंदन । विभक्तास्त्र सोडीतसे ॥ १९७ ॥
विभक्तास्त्र होतां प्राप्त । सकळ देव झाले मुक्त ।
सांवरुनि वस्त्रभूषणातें । नाथापाशीं पातलें ॥ १९८ ॥
मग सर्वत्रीं करुनि नमस्कार । म्हणती तव सुता दिधला वर ।
सकळ अस्त्रीं साक्षात्कार । आम्ही मिरवूं निजांगें ॥ १९९ ॥
उपरी बोले जालिंदरनाथ । पुढें करीन साबरी कवित्व ।
त्यातें साह्य तुम्हीं समस्त । कृपा करुनि असावें ॥ २०० ॥
मग अवश्य म्हणोनि वचन देती । साह्य असों तव कवितीं ।
ऐसें बोलोनि स्वस्थाना जाती । विमानारुढ होऊनियां ॥ २०१ ॥
यावरी रमावर आणि उमावर । कानिफा आणि जालिंदर ।
बद्रिकाश्रमीं होऊनि स्थिर । तीन रात्र राहिले तेथें ॥ २०२ ॥
तेथील स्वाद धुंडीसुत । पुढें सांगेल यथास्थित । 
नरहरिवंशीं नाम ज्यातें । मालू ऐसें वदताती ॥ २०३ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । द्वादशाध्याय गोड हा ॥ २०४ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्रीनवनाथभक्तिसार द्वादशाध्याय संपूर्ण ॥ 

Shri NavnathBhaktisar Adhyay 12
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बारावा ( १२ ) 


Custom Search

No comments: