Wednesday, February 10, 2016

Shri NavanathBhaktiSar Adhyay 17 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सतरावा ( १७ ) भाग १/२


Shri NavanathBhaktiSar Adhyay 17 
Kanifa asked Gopichand to prepare 5 statues of him made up of Gold, Silver, Copper, Brass and Iron. Then on a very good day he along with Gopichand went to the place where Gopichand had buried Jalindar. Kanifa told Gopichand that Gopichand had to dig and took out Jalindar from that. However immediately after starting digging Jalidar would ask who was digging. Then Gopichand should tell his name and immediately come out behind his statue of Gold. He put some vibhuti on the head of Gopichand. Then Gopichand started the digging. Jalinder from inside asked who was digging. Gopichand told his name and hurried behind the gold statue. Because of the anger of Jalindar Gold statue burned into ashes. the same thing happened with remaining statues every time. Then Kanifa told Gopichand that now he can dig till Jalinder from inside ask him to stop. Jalindar came out. Kanifa, Mainavati and Gopichand bowed to him. Jalindar as per wish of King Gopichand imparted the brhmadnyan and Gopichand took diksha of Natha panth. What happened next will be told to us by DhundiSut Malu from Narahari family in the 18th Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सतरावा ( १७ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी वैकुंठाधीशा । अलक्ष अगोचरा आदिपुरुषा ।
पूर्णब्रह्म निष्कल निर्दोषा । सनातना आदिमूर्ते ॥ १ ॥
ऐसा स्वामी पंढरीअधीश । बैसूनि मालूचे कवित्वपृष्ठीस ।
भक्तिसारसुधारस । निर्माण केला ग्रंथासी ॥ २ ॥
तरी मागिले अध्यायीं कथन । कानिफा पातला हेलापट्टण ।
गोपीचंदाची भेटी घेऊन । मैनावतीसी भेटला ॥ ३ ॥
तरी सिंहावलोकनीं तत्त्वतां । मैनावती भेटूनि नाथा ।
सकळ वृत्तांत सांगूनि सुता । समाधानीं मिरवले ॥ ४ ॥
असो गोपीचंद दुसरे दिनीं । नाथागृहें शिबिरीं जाऊनि । 
मौळी ठेवूनि नाथाचे चरणीं । उभा राहिला सन्मुख ॥ ५ ॥
कानिफा पाहूनि राव दृष्टीं । बोलता झाला स्ववाग्वटी ।
श्रीजालिंदर महीपोटी । कोठे घातला तो सांग पां ॥ ६ ॥
येरु म्हणे महाराजा । ठाव दावितो चला ओजा ।
तेव्हां म्हणे शिष्य माझा । घेऊनि जावें सांगातीं ॥ ७ ॥
ऐसी कानिफा बोलतां मात । अवश्य म्हणे नृपनाथ ।
मग सच्छिष्य घेऊनि सांगात । यता ठायीं पातला ॥ ८ ॥
ठाव दाखवूनि सच्छिष्यासी । पुन्हां आले शिबिरासी ।
शिष्य म्हणती त्या ठायासी । पाहूनि आलों महाराजा ॥ ९ ॥
मग रायासी म्हणे कानिफानाथ । जालिंदर काढाया कोणती रीत ।
येरु म्हणे तुम्ही समर्थ । सकळ जाणते सर्वस्वीं ॥ १० ॥ 
बाळें आग्रहें करुं जाती । परी तयाचा निर्णय कैशा रीतीं ।
करावा हें तों नेणती निश्र्चतीं । सर्व संगोपी माता ती ॥ ११ ॥
तेवीं माता पिता गुरु । त्राता मारिता सर्वपारु ।
तरी कैसे रीती हा विचारु । आव्हानिजे महाराजा ॥ १२ ॥
ऐसें बोलतां नृपनाथ । मग बोलता झाला गजकर्णसुत ।
तुझे रक्षावया जीवित । विचार माझा ऐकिजे ॥ १३ ॥
कनक रौप्य ताम्रवर्ण । पितळ लोह धातु पूर्ण ।
पांच पुतळे करुनि आण । तुजसमान हे राया ॥ १४ ॥
ऐसी आज्ञा करितांचि नाथ । प्रेरिले रायें ग्रामांत दूत ।
हेमकार लोहकारासहित । ताम्रकारका आणिलें ॥ १५ ॥
जे परम कुशल अति निगुती । लक्षूनि सोडिले हेराप्रती ।
धातु ओपूनि तयांचे हातीं । पुतळ्यांतें योजिलें ॥ १६ ॥
मग ते आपुले धीकोटी ( बुद्धिने ) । पुतळे रचिती मेणावरती ।
नाथालागीं दावूनि दृष्टी । रसयंत्रीं ओतिले ॥ १७ ॥
पाहोनि दिन अति सुदिन । मग नृपासह पुतळे घेवोन ।
पाहता झाला गुरुस्थान । विशाळबुद्धी कानिफा ॥ १८ ॥
गरतीकांठीं आपण बैसोन । पुतळा ठेवोनि हेमवर्ण ।
राजाहातीं कुदळ देवोन । घाव घालीं म्हणतसे ॥ १९ ॥
घाव घालितां परी लगबगां । पुसता स्वामी नांव सांगा । 
सांगितल्यावरी अति वेगा । गरतीबाहेर निघे कीं ॥ २० ॥   
ऐसें सांगोनि प्रथम रायातें । मग कुदळी दिधली हातातें ।
उपरी चिरंजीव प्रयोगातें । भाळी चर्चिली विभूती ॥ २१ ॥
पुतळा ठेवोनि मध्यगरतीं । मागें उभा राहिला नृपती ।
लवकर घाव घाली क्षिती । आंतूनि पुसे महाराज ॥ २२ ॥
कोणी येुवोनि घालिती घाव । वेगीं वदे कां तयाचें नांव ।
नृप म्हणे मी राणीव । गोपीचंद असें कीं ॥ २३ ॥
रायें सांगतांचि नाम । निघाला होता गरतींतून ।
श्रीजालिंदराचे शाप वचन । कणकप्रतिमे झगटलें ॥ २४ ॥
तीव्रशाप वैश्र्वानर । व्यापिलें कनकपुतळ्याचें शरीर ।
क्षण न लागतां महीवर । भस्म होवोनि पडियेलें ॥ २५ ॥
भस्म होतां कनकप्रतिमा । दुसरा ठेविला उगमा ।
तयाही मागे नरेंद्रोत्तमा । पुन्हां गरति स्थापिलें ॥ २६ ॥
रौप्यवर्णी पुतळ्यामागें । राव उभा केला वेगें ।
पुन्हा विचारिलें सिद्धेयोगें । कोण आहेस म्हणवोनि ॥ २७ ॥
पुन्हां सांगे नृप नांव । गरतीबाहेर वेगीं धांव ।
जालिंदरशापगौरव । जळ जळ खाक होवो कीं ॥ २८ ॥
ऐसें वदतां शापोत्तर । पुतळा पेटला वैश्र्वानरें ।
तोही होवोनि भस्मपर । महीलागीं मिरवला ॥ २९ ॥
मग तिसरा लोहपुतळा पूर्ण । तोही झाला शापें भस्म ।
चवथा पांचवा गति दुर्गम । त्याचिपरी पावला ॥ ३० ॥
यावरी त्या नृपनाथा । श्रीकानिफा झाला सांगता । 
मातें वदोनि नाम सर्वथा । नाथाप्रती सांगावें ॥ ३१ ॥
अवश्य म्हणोनि गौडपाळ । लवकरी भेदी अति सबळ ।
तो नाद ऐकूनि तपी केवळ । विचार करीत मानसीं ॥ ३२ ॥
माझा क्रोध वडवानळ । जाळूनि टाकील ब्रह्मांड समग्र ।
तेथें वांचला त्रिलोचनकुमर । हें आश्र्चर्य वाटतें ॥ ३३ ॥
कृतांताचे दाढेआंत । सांपडलिया सुटोनि जात ।
न शिवे वैश्र्वानर मृत्य । हें आश्र्चर्य वाटतसे ॥ ३४ ॥
महातक्षकानें दंश करुन । वांचवूं शके कोणी प्राण ।
केंवीं वांचला नृपनंदन । हें आश्र्चर्य वाटतें ॥ ३५ ॥
परम संकट पाहोनी । प्राण उदित घेत हिरकणी ।
तो वांचूनि मिरवे जनीं । हें आश्र्चर्य वाटतसे ॥ ३६ ॥
उरग खगेंद्रा हातीं लागतां । परी न मरे भक्षण करितां ।
तेवीं झालें नृपनाथा । हेंचि आश्र्चर्य वाटतें ॥ ३७ ॥
कीं मूषक सांपडल्या मुखांत । त्यांतें कदा न ये मृत्य ।
तेवीं वांचला हा नृपनाथ । हेंचि आश्र्चर्य वाटतें ॥ ३८ ॥
सहज उभा पर्वतानिकटी । कडा तुटोनि लडला माथीं ।
त्यांत वाचलां ऐसें म्हणती । हेंचि आश्र्चर्य वाटतसे ॥ ३९ ॥
ऐसा विचार मनांत । करिता झाला जालिंदरनाथ । 
चित्तीं म्हणे त्या भगवंत । साह्य झाला रक्षणीं ॥ ४० ॥
तरी आतां असो ऐसें । वांचल्या अमर करुं करुं त्यास ।
ऐसें विचारुनि चित्तास । मनीं गांठी दृढ धरिली ॥ ४१ ॥
येरीकडे कानिफनाथ । हुंकार नृपासी देत । 
तंव उभा स्वकरीं व्यक्त । लवकरी मही भेदीतसे ॥ ४२ ॥
लवकरी घाव कानीं उठता । श्रीजालिंदर होय पुसता ।
कोण आहेस अद्यापपर्यंत । घाव घालिसी महीतें ॥ ४३ ॥
ऐकतां श्रीगुरुवचन । रायाआधीं गजकर्णनंदन ।
सांगूनि आपलें नामाभिधान । गोपीचंदाचें सांगतसे ॥ ४४ ॥
म्हणे महाराजा तपोजेठी । मी बाळक कानिफा महीपाठी ।
पहावया चरण दृष्टीं । बहुत भुकेले चक्षू ते ॥ ४५ ॥
म्हणवोनि गोपीचंद नृपनाथ । तुम्हां काढावया उदित ।
ऐसी ऐकोनि स्वच्छिष्यमात । म्हणे अध्यापी नृप वांचला ॥ 
४६ ॥
तरी आतां चिरंजीव । असो अर्कअवधी ठेव ।
अमरकांती सदैव भाव । जगामाजी मिरवो कां ॥ ४७ ॥
ऐसें वदोनि जालिंदरनाथ । निजचक्षूनें पहावया सुत ।
बोलता झाला अति तळमळत । म्हणे महीतें विदारीं ॥ ४८ ॥
ऐसी आज्ञा होतांचि तेथें । मग काढिते झाले वरील लिदीतें ।
तंव ते मृत्तिका दशवर्षांत । महीव्यक्त झालीसे ॥ ४९ ॥
मग कामाठी लावूनि नृपती । उकरिता झाला मही ती ।
वरील प्रहार वज्राप्रती । जावोनियां भेदलासे ॥ ५० ॥           
मग तो नाद ऐकूनि नाथ । म्हणे आतां बसा स्वस्थ ।
मग जल्पोनि शक्रास्त्र । वज्रास्त्रातें काढिलें ॥ ५१ ॥
मग नाथ आणि गजकर्णनंदन । पाहते झाले उभय वदन ।
मग चित्तीं मोहाचे अपार जीवन । चक्षुद्वारे लोटलें ॥ ५२ ॥
मग गरतीबाहेर येवोनि नाथ । प्रेमें आलिंगला सुत ।
म्हणे बा प्रसंगे होतासी येथ । म्हणवोनि नृपनाथ वांचला ॥  ५३ ॥
परी गरतीबाहेर येतांचि नाथ । चरणीं लोटला नृपनाथ । 
मग त्यातें कवळोनि धरीत । मौळीं हात ठेवीतसे ॥ ५४ ॥
म्हणे बाळा प्रळयाग्नी । त्यांत निघालासी वांचुनी ।
आतां जोंवरी शशितरणी । तोंवरी मिरवें महीतें ॥ ५५ ॥
यावरी त्रिलोचनकामिनी । मैनावती लोटली चरणीं ।
नेत्रीं अश्रुपात आणोनी । स्वामीलागीं बोलतसे ॥ ५६ ॥
म्हणे महाराजा एकादश वर्षांत । मातें लोटली महातमरात ( अत्यंत अंधारी रात्र ) ।
माझा अर्क गुरुनाथ । अस्ताचळीं पातलासे ॥ ५७ ॥
मित्रकुमुदिनी दीनवाणी । हुरहुर पाहे जैसी तरणी ।
कीं मम बाळकाची जननी । गेली कोठें कळेना ॥ ५८ ॥ 
कीं मम वत्साची गाउली ( गाय ) । कोणे रानीं दूर गेली ।
समूळ वत्साची आशा सांडिली । तिकडेचि गुंतली कैसेनि  ॥ ५९ ॥
कां मम चकोराचा उड्डगणपती । कैसा पावला अस्तगती ।
कीं मज चातकाचे अर्थी । ओस घन पडियेला ॥ ६० ॥ 
सदा वाटे हुरहुर जीवा । कीं लोभ्याचा चुकला द्रव्यठेवा ।
की अंधाची शक्ती काठी टेकावा । कोणें हरोनि नेलीसे ॥ ६१ ॥
ऐसे एकादश संवत्सर । मास गेले महाविकार ।
ऐसें बोलोनि नेत्रीं पूर । अश्रुघन वर्षतसे ॥ ६२ ॥
मग तियेसी हृदयीं धरोनि नाथ । स्वकरें नेत्राश्रु पुसीत ।
तीन्ही बाळकें धरोनि यथार्थ । माय हेलवे त्यामाजी ॥ ६३ ॥
गोपीचंदाचें मुख कुरवाळून । बोलता झाला अग्निनंदन ।
बा रे तुझें काय मन । इच्छीतसे मज सांग ॥ ६४ ॥
राजवैभवा भोगावें । कीं आत्मीं समयोग्यते मिरवावें ।
कोणतें तुझें मनीं भावे । तैसा योग घडेल बा ॥ ६५ ॥
अशाश्वत शाश्वत दोन पद । राज्य वैराग्य मार्गभेद ।
तरी तुज आवडे तोचि वृंद । स्वीकारीं कां बाळका ॥ ६६ ॥
म्यां तूते केले अमरपणीं । परी तैसे नाहीं राजमांडणी ।
अनेक आले अभ्र दाटोनी । मृगजळासमान तें ॥ ६७ ॥
बा रे संपत्ती अमरां कैसी । तेही आटेल काळवेळेसीं ।
दिसतें तितुकें वैभवासी । नाशिवंत आहे बा रे ॥ ६८ ॥
बा रे पूर्वी राज्य सांडून । कित्येक बैसले योग्यांत येवोन ।
परी तो योग सोडून । राज्यवैभवा नातळला ॥ ६९ ॥
पाहें गाधिसुताचे ( विश्र्वामित्राचे ) वैभव । महीलागीं केवढें नांव ।
परी तो सोडूनि सकळ वैभव । योगक्रिया आचरला ॥ ७० ॥
उत्तानपाद महीवरती । काय न्यून असे संपत्ती ।
परी सुताची कामशक्ती । वेगें जनीं दाटलीसे ॥ ७१ ॥      
तस्मात् अशाश्वत ओळखून । बा ते झाले सनातन ।
तरी आतां केउतें मन । इच्छितें तें मज सांगें ॥ ७२ ॥
गोपीचंद विचार करी मनांत । राज्यवैभवीं सामर्थ्य गळित ।
अहा योगी जालिंदरनाथ । चिरंजीव मिरवतसे ॥ ७३ ॥
आज एकादश वर्षेपर्यंत । गरतगलित पचला योगीनाथ । 
जेणें यम शरणागत । पायांतळीं लोळतसे ॥ ७४ ॥
जेणें कृतांत निर्बळ केला । तो राज्य मेळवूनि खळ ठेला ।
हेमकर्णे अशक्त झाला । परीस लोहाकारणें ॥ ७५ ॥
सुरभी त्रैलोक्यकामना । पूर्ण करील क्षुधार्तवचना ।
ती स्वपोटा रानोंराना । शोधील काय तृणातें ॥ ७६ ॥
ब्रह्मांडावरी जयाची सत्ता । तो कोणे अर्थी दरिद्रता ।
भोगील काय ऐसी वार्ता । श्लाघ्य दिसेना बोलाया ॥ ७७ ॥
तरी तें वैराग्य भाग्यसदन । साध्य करावें कार्ये मनें ।
ऐसा पश्र्चाताप दारुण । चित्तामाजी डवरला ॥ ७८ ॥
मग म्हणे गुरुमहाराज । इंधनीं अग्नि होतां सज्ज ।
तेवीं विधानचि तैसे विराजे । पावका स्पर्श झालिया ॥ ७९ ॥
तरी आतां सरतें पुरतें । आपुल्यासमान करा मातें ।
आळीभृंगन्यायमतें । करुनि मिरवें महीसी ॥ ८० ॥
ऐकोनि दृढोत्तर वचन । श्रीगुरु स्वकरातें उचलोन ।
पृष्ठी थापटी वाचे वचन । गाजी गाजी म्हणतसे ॥ ८१ ॥
मग वरदहस्त स्पर्शोनि मौळीं । सकळ देहातें कृपें न्याहाळीं । 
कर्णीं ओपूनि मंत्रावळी । स्वनाथमार्गीं मिरवला ॥ ८२ ॥
ऐसें होतां अंग लिप्त । मग दिसूनि आलें अशाश्वत ।
काया माया दृश्य पदार्थ । विनय चित्तीं मिरवले ॥ ८३ ॥
मग वेटतरुचें दुग्ध काढून । जटा वळी राजनंदन ।
त्रिसट कौपीन परिधानून । कर्णीं मुद्रा परिधानी ॥ ८४ ॥
शैली कंथा परिधानूनी । शिंगीनाद गाजवीं भुवनीं ।
कुबडी फावडी कवळूनि पाणी । नाथपणीं मिरवला ॥ ८५ ॥
भस्मझोळी कवळूनि कक्षेंत । आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ ।
हातीं कवळूनि नागनाथ । जगामाजी मिरवला ॥ ८६ ॥
परी हा वृत्तांत सकळ गांवांत । अंतःपुरादिकीं झाला श्रुत ।
श्रुत होतांचि अपरिमित । शोकसिंधु उचंबळला ॥ ८७ ॥
एकचि झाला हाहाकार । करितां रुदन लोटला पूर ।
स्त्रिया धरणीसी टाकिती शरीर । मुखीं मृत्तिका घालिती ॥ ८८ ॥
मैनावतीसी शिव्या देत । म्हणती हिनेंचि केला सर्वस्वीं घात ।
अहा अहा नृपनाथ । महीं कोठे पहावा ॥ ८९ ॥  
आठवूनि रायाचे विशाल गुण । भूमीवरी लोळती रुदन करुन ।
मूर्च्छागत होऊन प्राण । सोडूं पाहती रुदनांत ॥ ९० ॥
अहा हें राजवैभव । कैसी आली विवशी माव ।
अहा सुखाचा सकळ अर्णव । वडवानळें प्राशिला ॥ ९१ ॥
अहा रायाचें बोलणें कैसें । कधीं दुखविलें नाहीं मानस ।
आमुचे वाटेल ते इच्छेस । राव पुरवी आवडीनें ॥ ९२ ॥   
एक म्हणे सांगूं काय । रायें वेष्टिलें चित्त मोहें ।
म्लानवदन पाहोनि राय । हृदयीं कवळी मोहानें ॥ ९३ ॥
म्हणे बाई मुखातें कुरवाळून । परम प्रीतीनें घेत चुंबन ।
अति स्नेहानें अर्थ पुरवून । मनोरथ पुरवी माझे गे ॥ ९४ ॥   
ऐसें म्हणूनि आरंबळत । एकसरां शब्द करीत ।
एक म्हणे वो बाई मात । काय परी सांग रायाची ॥ ९५ ॥
अगे वत्सालागीं जैशी गाय । क्षणिक विसंबूं कदा न पावे ।
तेवीं क्षणाक्षणां येऊनि राय । वदन पाहे माझें गे ॥ ९६ ॥
एक म्हणे अर्थ पोटीं । किती सांगूं राजदृष्टी ।
वांकुडा केश कंबरीथाटीं ( वेणीमध्यें ) । पडतां सांवरी हस्तानें ॥ ९७ ॥
अगे कुंकुमरेषा वांकडी होत । ती सांवरी नृपनाथ ।
मायेहूनि अधिक आतिथ्य । माझें करीत होता गे ॥ ९८ ॥
ऐसें म्हणूनि धरणीं अंग । धडाडूनि टाकिती सुभाग्य ।
म्हणती विधात्या बरवा भांग । निजभाळीं रेखिला कीं ॥ ९९ ॥
मस्तक धरणीवरी आपटिती । धडधडां हस्तें हृदय पिटीती ।

महीं गडबडूनि पुन्हां उठती । पुन्हां सांडिती शरीरातें ॥ १०० ॥
Shri NavanathBhaktiSar Adhyay 17 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सतरावा ( १७ )


Custom Search

No comments: