Thursday, March 31, 2016

Shri Navnath BhaktiSar Adhyay 37 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) भाग २/२


Shri Navnath BhaktiSar Adhyay 37 
Nagnath came to know that Dattaguru is daily coming in the afternoon to Kolhapur for Bhiksha. So to meet him and found out him he started to feed all the people in Kolhapur and to those coming into Kolhapur. He was using Siddhi to do all this; So that anybody needs not to prepare food in the house at that place. He knew that Dattaguru would not accept Bhiksha of food that is prepared by using Siddhi. With this he succeeded in finding out his Guru, Who blessed him with Diksha and Brahmopadesh. Dattaguru imparted all the Astra-Shastra Vidya to Nagnath by taking him to Badrikedar. Then got done all the required practices from him and sent him for tirthyatra. Nagnath while on tirthyatra came to Vadval. He made many disciples and stayed there. One day Machchhindra came there and wished to meet Nagnath. However the disciples stopped him at the entrance of cave and asked to wait till their Guru allows him to enter. Then there was a war between Nagnath and Machchhindra at the end Machchhindra called his Dattaguru for his help. Then both knew that their Guru is the same. Then respectfully Nagnath took Machchhindra in the cave, where Machchhindra lived for three days. He told Nagnath that anybody who comes there with a wish to have his (Nagnath's) darshan must have a fee entry. In the next 38th Adhyay Dhundisut Malu from Narhari family will tell us about CharpatiNath.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) भाग २/२
मग अवश्य म्हणूनि नाथ प्रेमळ । वंदूनि श्रीगुरुचें पदकमळ ।
तीर्थें कराया उतावेळ । महीवरी संचरला ॥ १०१ ॥
अत्रिसुत गेला गिरनारपर्वतीं । येरीकडे नागनाथजती ।
तीर्थें करीत नाना क्षितीं । बालेघाटीं पातला ॥ १०२ ॥
तेथें पाहूनि शुद्ध कानन । वस्तीसी राहिला मनोधर्म । 
परी तो प्रतापी तपी सघन । गांवोगांवीं समजला ॥ १०३ ॥
मग अपार लोक येती दर्शना । दिवसानुदिवस वाढे महिमा ।
मग भक्तिपुरस्करांची वाढली महिमा । तुम्हीं येथेंचि वस्ती करावी ॥ १०४ ॥
मग अपार धर्म करुन । वस्तीसी राहिले अपार जन ।         
वडवाळ ऐसें ग्राम नाम । नागनाथें ठेविलें ॥ १०५ ॥
यावरी कोणे एके दिवशीं । मच्छिंद्र आला त्या ठायासी ।
सहज राहता झाला वडवाळासी । नाथकीर्ति ऐकिली ॥ १०६ ॥
म्हणोनि मच्छिंद्र दर्शना जात । तो मठद्वारीं येऊनि त्वरित ।
सदृढ चालतां द्वाराआंत । स्वशिष्यांनीं हटकिलें ॥ १०७ ॥
म्हणती नाथबोवा ऐका वचन । पुढें नका करुं गमन ।
श्रीनागनाथातें सांगून । तुम्हां नेऊं दर्शना ॥ १०८ ॥
तयांच्या परवानगीवांचून । होत नाहीं कोणाचें गमन ।
तस्मात् थांबावें एक क्षण । आम्ही विचारुन येतों कीं ॥ १०९ ॥
ऐसें मच्छिंद्रें ऐकतां वचन । कोपानळीं चढलें मन ।
चित्तीं म्हणे हा संतजन । कैंचा राववत (श्रीमंतासमान) दिसतसे ॥ ११० ॥
देवद्वार साधुद्वार । मुक्त असावें निरंतर । 
तरी कपटपणींचा संत वेव्हार । संग्रहातें न ठेविती ॥ १११ ॥
तरी येथें आहे बंड । जग भोंदावयाचें केलें प्रचंड ।
तरी शिक्षा आतां उदंड । दाखवावी या नरा ॥ ११२ ॥
ऐसें क्रोधें चित्तीं आणून । त्या शिष्यांसी केले ताडण ।
ताडण करितां बहुत जन । सप्तशत शिष्य धांवले ॥ ११३ ॥
तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ । स्पर्शकळा त्वरें प्रेरित । 
तेणें झाले महीव्यक्त । सातशें शिष्य सकळिक ॥ ११४ ॥
महीव्यक्त सकळ होतां । नाथ मुखवटा ताडण करितां ।
तंव ते आरंबळती आक्रोशवंत । एकआरडा ऊठला ॥ ११५ ॥
तों येरीकडे मठांत । सदा ध्यानीं भरुनि नागनाथ ।
कोल्हाळ आरडा ऐकूनि प्राजळवंत । देहावरी पातला ॥ ११६ ॥
ध्यान भंगिलें कोल्हाळेंकरुन । तेणें कोपानळीं पेटलें मन ।
मग उपरीवरी शीघ्र जाऊन । निजदृष्टीं पहातसे ॥ ११७ ॥
तैं सातशे शिष्य महीव्यक्त । झाले ते चलनवलनरहित ।
एकटा तया गणीं नाथ । मुखावरी भेदीतसे ॥ ११८ ॥
ऐसें नागनाथें पाहून । अत्यंत कोपला कोपानळानें ।
म्हणे हा नाथदीक्षेसी येतो दिसोन । परी भ्रष्टबुद्धी आहे कीं ॥ ११९ ॥
शांती क्षमा दया पूर्ण । पाळिजे साधूचें हेंचि लक्षण ।
स्वप्नामाजी तीव्रपण । ठेवूं नये निजवृत्तीं ॥ १२० ॥
तरी हा यातें नाहीं योग्य नाथ । नाथपंथा लाविला डाग ।
कोणता साधू होता मांग । उपदेशिलें ऐशासी ॥ १२१ ॥
तरी यातें शिक्षा करुन । दीक्षा घ्यावी हिरोन ।
ऐसें कोपेंची जल्पून । धुनीभस्म कवळिलें ॥ १२२ ॥
प्रथम गरुडबंधनविद्या जल्पून । स्वर्गीं गरुडाचें केले बंधन ।
सकळ नुरे चलनवलन । स्वर्गीं व्यक्त केला असे ॥ १२३ ॥
मग विभक्तास्त्र जल्पून । शिष्य मुक्त केले महीकारण ।
मुक्त होतांचि सकळ जन । नाथपृष्ठीं दडाले ॥ १२४ ॥
तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ । म्हणे चूर्ण करावे हे समस्त । 
मग जल्पूनि अस्त्रपर्वत । महानग निर्मिला ॥ १२५ ॥
तो पर्वत विशाळपणीं । येता झाला पंथगगनीं । 
तें नाथें पाहूनि  नयनीं । शक्रवज्र जल्पिलें ॥ १२६ ॥           
मग तो शीघ्र पाकशासन (इंद्र) । अंतराळीं वज्र देत सोडून २
तेणें पर्वत झाला चूर्ण । मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला ॥ १२७ ॥
मग जल्पूनि वाताकर्षण । शक्र पाडिला महीकारण । 
वज्रकाळीविद्या जल्पून । वज्रालागीं निवटिलें ॥ १२८ ॥
तें पाहूनियां नागनाथ । मनीं क्षोभला अति अद्भुत । 
मग वातप्रेरक विद्या त्वरित । वाताकर्षणावरी टाकिली ॥ १२९ ॥
तेणें शक्र सावध होऊन । पळूं लागला भयेंकरुन । 
म्हणे प्रतापी गहन दोघे जण । आपुलें काम नसे येथें ॥ १३० ॥
ऐसें म्हणोनि भयस्थित । शक्र स्थाना पळूनि जात ।
येरीकडे मच्छिंद्रनाथ । काय करितां पैं झाला ॥ १३१ ॥
मग वासवशक्ती अति दारुण । जल्पूनि मंत्रप्रयोगानें ।
सिद्ध करुनि दैदिप्यमान । नागेशभागा पाठविली ॥ १३२ ॥
परी ती शक्ति महादारुण । सहस्त्रमित्रतेजेंकरुन । 
प्रळयकाळींचा जैसा अग्न । शब्द करीत येतसे ॥ १३३ ॥
शब्द करितां कडकडाट । खचूनि पडती गिरिकपाट ।
धरा कांपे जळजळाट । द्विभाग होऊं पाहातसे ॥ १३४ ॥
श्र्वापदें पळती रानोरान । दिग्गजां न मिळे कोठें ठिकाण । 
पाताळभुवनीं शेष दचकून । मूर्धनीतें सरसावी ॥ १३५ ॥
एकचि झाला हलकल्लोळ । महींचे जीव चराचर सकळ । 
घाबरोनि झाली हडवळ । क्षमेंत स्थळ पाहती ॥ १३६ ॥
ऐसा पाहूनि महाआकांत । काय करी नागनाथ । 
सकळ दैवतें बंधनविद्येंत । जल्पता झाला महाराजा ॥ १३७ ॥
तेणें दैवतांचें बंधन समस्त । मग न धांवती स्फुरल्या विद्येंत ।
ऐसी केली गती कुंठित । सकळ अस्त्रशस्त्रांची ॥ १३८ ॥
मग हेमाद्रिपर्वत दारुण । अस्त्र योजिलें महादारुण । 
हेमाद्रि अस्त्र पावोन । नाथें वासवी शक्ती टाकिली ॥ १३९ ॥
तें पाहोनियां मच्छिंद्रनाथ । शक्रवज्रालागीं स्तवीत ।
वरी बंधन झालें सकळ दैवत । अस्त्रविद्या फळेना ॥ १४० ॥
मग नाना अस्त्रांचे प्रयोग युक्तीं । जपे परी ते सकळ व्यर्थ जाती । 
मग निःशक्त मच्छिंद्र होवोनि जगतीं । स्तब्धदृष्टीं पहातसे ॥ १४१ ॥
तों येरीकडे नागनाथ । नाना अस्त्रें जल्पोनि त्वरित ।
पर्वतासमान तक्षक तेथें । अस्त्रविद्येसी धांवले ॥ १४२ ॥
मग मच्छिंद्रातें दंशूं धांवती । शतानुशत नाहीं गणती ।
तें पाहोनि मच्छिंद्रजती । गरुडास्त्र तेव्हां जपतसे ॥ १४३ ॥
परी नागनाथें पूर्वकरणीं । केलें होतें गरुडबंधन ।
तेथें मच्छिंद्राचा योग पूर्ण । व्यर्थ झाला गरुडास्त्रीं ॥ १४४ ॥
मग ते सर्प उन्मत्त । येवोनि डंखिती ठायीं नाथ ।
तेणें मच्छिंद्र हडबडीत । प्राण सोडूं पाहातसे ॥ १४५ ॥
मग अंतकाळींचा समय जाणून । चित्त बुद्धि अंतःकरण ।
काया वाचा तन मन । गुरुचे चरण स्तवीतसे ॥ १४६ ॥          
स्तवीतसे परी कैशा रीती । ऊर्ध्वशब्द उद्भटगतीं ।
म्हणे महाराजा कृपा मूर्ती । अत्रिसुता धांव रे ॥ १४७ ॥
मी बाळक लडिवाळ जाण । वेष्टलों असें सर्पबंधनें ।
तरी माये तुजवांचून । कोण सोडवील मज आतां ॥ १४८ ॥
हे त्रयदेवअवतारखाणी । मज पाडसाची तूं हरिणी ।
व्याघ्र बैसला मम प्राणहरणीं । ये धांवोनि लगबगें ॥ १४९ ॥
परम संकटीं पडलो येथें । कैसी निद्रा लागली तूतें ।
सर्वसाक्षी असोनि जगातें । नेत्र झांकिले मजविषयीं ॥ १५० ॥
दत्त दत्त ऐसें म्हणोन । शब्द फोडिला अट्टहास्येंकरुन । 
नेत्र झाले श्र्वेतवर्ण । मुखीं हुंदका येतसे ॥ १५१ ॥
परी दत्तात्रेयनामेंकरुन । वाहे अट्टहास्यें वचन ।
ते नागनाथें शब्द ऐकून । साशंकित होतसे ॥ १५२ ॥
चित्तीं म्हणे मम गुरुचें । स्मरण हा करितो किमर्थ वाचे ।
तरी हा कोणाचा शिष्य याचें । नाम विचारुं जावोनी ॥ १५३ ॥
मग निकट येवोनि वटसिद्धनाथ । पुसता झाला स्नेहभरित ।
म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत । गुरु कोण तुमचा ॥ १५४ ॥
येरु म्हणे आदेश नाथा । नाम मच्छिंद्र तत्त्वतां ।
प्रसन्न करोनि अत्रिसुता । अनुग्रह घेतला ॥ १५५ ॥
तरी यासी नाथपंथ मूळ । मी प्रथमभागीं दत्ताचें बाळ ।
मजमागें जालिंदर सबळ । दत्तानुग्रहीं मिरवला ॥ १५६ ॥
तयामागें भर्तरीनाथ । दत्तशिष्य झाला जगविख्यात । 
जोंवरी अवनी तोंपर्यंत । चिरंजीव मिरवला ॥ १५७ ॥
तयामागें रेवणनाथ । दत्तानुग्रहीं प्रतापवंत । 
जेणें जिंकोनि देव समस्त । विप्रबाळें उठविलीं ॥ १५८ ॥
तरी महाराजा नाथपंथांत । मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सुत ।
ऐसें ऐकोनि वटसिद्धनाथ । मनामाजी कलवळला ॥ १५९ ॥
मग सुपर्णाचें सोडूनि बंधन । गरुडअस्त्र जपे वाचेकारण ।
ऐसें होतां तत्काळ सुपर्ण । महीवरी उतरला ॥ १६० ॥
उतरोनि नागकुळ समस्त । होवोनियां भयभीत ।
तत्काळ विष शोषूनि त्वरित । अदृश्यते पावले ॥ १६१ ॥
असो नागकुळ विष शोषून । अदृश्य झालिया भयेंकरुन ।
गरुडही उभयतां नमून । स्वर्गाप्रती तो गेला ॥ १६२ ॥
येरीकडे नागनाथ । मच्छिंद्रचरणीं माथा ठेवीत ।
म्हणे तातासमान वडील भ्रात । गुरु माझा तूं होसी ॥ १६३ ॥
मग नेवोनियां स्वस्थानासी । बैसविला आपणापाशीं ।
गौरवोनि उदार मानसीं । एक मास ठेविला ॥ १६४ ॥
यावरी मच्छिंद्र एके दिवशीं । बोलता झाला नागनाथासी । 
तुवां बंधन द्वारापाशीं । ठेविलें काय म्हणोनियां ॥ १६५ ॥
भाविक येती दर्शनातें । तव शिष्य येवों न देती त्यातें ।
तुज मज कळी याचि निमित्तें । झाली असे महाराजा ॥ १६६ ॥
यावरी बोले नागनाथ । मी असतों सदा ध्यानस्थ । 
जन हे येवोनि अपरिमित । ध्यान माझें भंगिती ॥ १६७ ॥
म्हणोनि द्वारीं ठेवितों रक्षण । उपरी बोले मच्छिंद्रनंदन ।
नाथ हें नव्हें चांगुलपण । भूषणिक आपणासी ॥ १६८ ॥
कोणी जन ते हीनदीन । व्हावया येती पवित्र पावन ।
तरी ते द्वार अटक पाहोन । विन्मुख मागें जाताती ॥ १६९ ॥
तरी मुक्तद्वार आतां येथून । ठेवीं जगाचें अकिंचनपण ।
हरोनियां मनोधर्म । रुढिमार्गा वाढवीं ॥ १७० ॥
ऐसें सांगोनि नागनाथासी । मच्छिंद्र जाती तीर्थासी ।
येरीकडे वडवाळगांवासी । काय करी नाथ तो ॥ १७१ ॥
मुक्तद्वार अगार टाकोन । मग दर्शना येती अपार जन ।
नाना जगाचें अकिंचनपण । फिटोनि मागें जाताती ॥ १७२ ॥
ऐसें असतां कोणे एके दिवशीं । चांगुणा संतशिष्य होता त्यासी ।
तयाची स्त्री पुण्यराशी । मृत्यु पावली मठांत ॥ १७३ ॥
तें पाहोनि वटसिद्धनाथ । उठविती तयाचे कांतेतें ।
तेणें बोभाट वडवाळ्यांत । घरोघरी संचरला ॥ १७४ ॥
मग जयाचें घरी होत मृत । आणूनि टाकिती मठा प्रेत ।
उठवूनि नागनाथ । सदना धाडी तयाच्या ॥ १७५ ॥
ऐसें होतां बहुत दिवस । संकट पडलें यमधर्मास । 
मग तो जाऊनि सत्यलोकास । विधीलागीं निवेदी ॥ १७६ ॥
मग तो मूर्तिमंत चतुरानन । वडवाळांत शीघ्र येवोन ।
श्रीनाथाचा स्तव करोन । राहविलें त्या कर्मा ॥ १७७ ॥
यापरी सहा शिष्य त्यातें । सिद्धकळा लाधली नवांतें ।
ते जगामाजी प्रसिद्धवंत । सिद्धनामीं मिरवले ॥ १७८ ॥
चांगुलसिद्ध धर्मसिद्ध । देवसिद्ध भोमसिद्ध ।
देवनसिद्ध भोमनसिद्ध । कोकिळ सुंदरचक्षू तो ॥ १७९ ॥
ऐशा नवसिद्धांमाझारी । विद्या ओपिली कवित्व साबरी ।
देव जिंकोनि सत्वरीं । विद्यावरु मिरवले ॥ १८० ॥
बावन्न वीरांचें करोनि बंधन । केल्या साबरी विद्या स्वाधीन ।
ते साबरी विद्या कवित्वरत्न । नवसिद्धांत मिरवती ॥ १८१ ॥
एक कोटी एक लक्ष । नागनाथाची विद्या प्रत्यक्ष । 
परोपकारी सौम्य दक्ष । पीडाकारक नव्हे ती ॥ १८२ ॥
धांवरें खांडूक उसण । टिके किरळ अहिरानैम ।
वृश्र्चिकसर्पविषहरण । ऐसी विद्या परोपकारी ॥ १८३ ॥
असो ऐसी विद्या साबरीं कवित । नवांनीं प्रकट केली जगांत ।
यापरी दिवस लोटले बहुत । कथा वर्तली विप्राची ॥ १८४ ॥
समाधियोग सरला शेवट । तैं उद्धरिला बहिरंभट । 
आणि रामजी भक्त सुभट । हेमकारक उद्धरिला ॥ १८५ ॥
तरी त्या कथा पूर्ण भागांत । वदलों भक्तिकथामृतग्रंथांत । 
याउपरी चरपटीनाथ । श्रवण करावें श्रोते हो ॥ १८६ ॥
धुंडीसुत नरहरिवंशीं । मालू संतकृपेंसीं ।
अवधान विद्ये सावकाशीं । श्रोते तुम्ही अवधारा ॥ १८७ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । सप्तत्रिंधत्तमाध्याय गोड हा ॥ १८८ ॥
श्रीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार सप्तत्रिंशत्तमाध्याय संपूर्ण ॥
Shri Navnath BhaktiSar Adhyay 37 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) 


Custom Search

No comments: