Friday, June 10, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 1 अर्जुनविषादयोग अध्याय १


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 1 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 1 is in Sanskrit. Name of this Adhyay is Arjun-Vishada Yoga.
अर्जुनविषादयोग अध्याय १
धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्र्चैव किमकुर्वत संजय ॥ १ ॥
सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढ दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ॥ २ ॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ ३ ॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्र्च द्रुपदश्र्च महारथः ॥ ४ ॥
धृष्टकेतुश्र्चेकितानः काशिराजश्र्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्र्च शैब्यश्र्च नरपुङ्गवः ॥ ५ ॥
युधामन्युश्र्च विक्रान्त उत्तमौजाश्र्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्र्च सर्व एव महारथाः ॥ ६ ॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य सञ्ज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ ७ ॥
भवान्भीष्मश्र्च कर्णश्र्च कृपश्र्च समितिञ्जयः ।
अश्र्वत्थामा विकर्णश्र्च सौमदत्तिस्तथैव च ॥ ८ ॥
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः  सर्वे युद्धविशारदाः ॥ ९ ॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १० ॥
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ ११ ॥
तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान ॥ १२ ॥
ततः शङ्खश्र्च भेर्यश्र्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाबहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १३ ॥
ततः श्र्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवश्र्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मुतुः ॥ १४ ॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्डृं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १५ ॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्र्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १६ ॥
काश्यश्र्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्र्च सात्यकिश्र्चापराजितः ॥ १७ ॥
द्रुपदो द्रौपदेयाश्र्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्र्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक् पृथक् ॥ १८ ॥
स घोषो धार्तराष्टृाणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्र्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९ ॥
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वाधार्तराष्टृान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ २० ॥
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१ ॥
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्रणसमुद्यमे ॥ २२ ॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्टृस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ २३ ॥
सञ्जय उवाच 
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४ ॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान्कुरुनिति ॥ २५ ॥
तत्रापश्यत्स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यन्मातुलान्भ्रातृ्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥ २६ ॥
श्र्वशुरान् सुहृदश्र्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ॥ २७ ॥
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सु समुपस्थितम् ॥ २८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्र्च शरीरे मे रोमहर्षश्र्च जायते ॥ २९ ॥
गाण्डीवं स्त्रंसते हस्तात्त्वच्कैव  परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३० ॥
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्जनमाहवे ॥ ३१ ॥
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ ३२ ॥
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३ ॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ ३४ ॥
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ ३५ ॥
निहत्य धार्तराष्टृान्नः प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६ ॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्टृान् स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७ ॥
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८ ॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९ ॥
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ ४० ॥
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ ४१ ॥
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ ४२ ॥
दोषैरेतैः कुलघ्नानां  वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ ४३ ॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४ ॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५ ॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्टृा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥
सञ्जय उवाच
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ ४७ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥  
मराठी अर्थ    
धृतराष्ट्र म्हणाला
१) हे संजया, पुण्यभूमि अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडवांनी काय केले?
संजय म्हणाला
२) त्या वेळीं पांडवांचें सैन्य व्यूहरचनेनें उभें राहिलेले पाहून, राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असें म्हणाला.
३) आचार्य द्रुपदाचा पुत्र आणि तुमचाबुद्धिमान् शिष्य (धृष्टद्युम्न) यानें व्यूह रचून उभी केलेली ही मोठी पांडवसेना पहा. 
४-६) या पांडवापक्षीय सैन्यांत भीमार्जुनांसारखे शूर, मोठमोठे धनुर्धर, युयुधान (सात्यकी) , विराट आणि महारथी द्रुपद, धृष्टकेतु, चेकितान, बलवान् काशिराजा, पुरुजित्, कुंतिभोज (कुंतीचा भाऊ), आणि नरश्रेष्ठ शिबी देशाचा राजा अतिपराक्रमी बुधामन्यु, बलशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे (पांच) पुत्र हे सगळेच महारथी आहेत.
७) हे द्विजश्रेष्ठा ! आतां आमच्या सैन्यांत जे प्रमुख, जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत, त्यांची नांवें दिग्दर्शनार्थ सांगतो. ती ऐकून घ्या.
८-९) आपण स्वतः, भीष्म, कर्ण, युद्धामध्ये जय पावणारा कृपाचार्य, अश्र्वत्थामा, विकर्ण, आणि सोमदत्ताचा मुलगा (भूरिश्रवा), ह्याशिवाय माझ्याकरिता जिवावर उदार झालेले, अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज व युद्धांत कुशल असे आणखीही पुष्कळ योद्धे आहेत.
१०) ह्या प्रकारचें भीष्माने रक्षण केलेलें आमचे सैन्य अपर्याप्त म्हणजेच अपरिमित किंवा अफाट आहे. तर भीमाने रक्षण केलेले ते (पांडवांचे) सैन्य पर्याप्त म्हणजे परिमित किंवा मोजके आहे.
११) म्हणून आपण सर्वांनी आतां प्रत्येकाला नेमून दिलेल्या व्यूहाच्या प्रवेशद्वारांत सावधतेने उभे राहून भीष्माचें सर्व बाजूंनी रक्षण करावें.
१२) दुर्योधनाला हर्ष होण्यासाठी, महाप्रतापी व सर्व कौरवांत वडील अशा भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे मोठी गर्जना करुन आपला शंख मोठ्याने वाजविला.
१३) त्याबरोबर शंख, भेरी (नगारे), पणव, (ढोल) आनक, (मृदंग), गोमुख, (कर्णें) हीं रणवाद्यें एकदम वाजविली गेलीं, तेव्हां त्यांचा फारच मोठा आवाज झाला.
१४) नंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या मोठ्या रथांत बसलेले श्रीकृष्ण व अर्जुन ह्यांनी आपापले दिव्य शंख जोराने वाजविले.
१५) श्रीकृष्णाने पांचजन्य नांवाचा शंख, अर्जुनानें देवदत्त शंख व भयंकर कर्मे करणार्‍या भीमाने पौंड्र नांवाचा शंख वाजविला. 
१६) कुंतीपुत्र धर्मराजानें अनंतविजय, आणि नकुळ व सहदेव ह्यांनी सुघोष व मणिपुष्पक नांवाचे आपापले शंख वाजविले.
१७-१८) तसेंच महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, कधींही पराजित न झालेला सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पांच पुत्र आणि आजानुबाहु आभिमन्यु या सर्वांनी, हे राजा (धृतराष्टृा)! चोहोकडून आपापले शंख फुंकले.
१९) आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडणार्‍या त्या तुंबळ नादानें दुर्योधनादि कौरवांची हृदयें विदीर्ण झाली. 
२०-२१) हे राजा, मग कौरव व्यवस्थेने उभे राहिले आहेत आणि शस्त्रास्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली आहे असें पाहून ज्याच्या ध्वजावर मारुती आहे असा पांडव म्हणजे अर्जुन आपलें धनुष्य उचलून श्रीकष्णास म्हणाल, हे श्रीकृष्णा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा कर.
२२-२३) येथें युद्धाच्या इच्छेने उभ्या राहिलेल्या वीरांना मी नीट पाहून घेतो. कारण या रणधुमाळींत मला कोणाशी युद्ध करावें हें समजलें पाहिजे. तसेंच दुष्टबुद्धि दुर्योधनाचे युद्धांत प्रिय करण्याच्या इच्छेने, येथें युद्धासाठी कोण कोण जमले आहेत, त्यांना मी नीट पाहून घेतो.
संजय म्हणाला
२४-२५) हे धृतराष्ट्र, निद्रेला जिंकणार्‍या अर्जुनानें इंद्रियप्रवर्तक श्रीकृष्णाला असेम सांगितलें. तेव्हां श्रीकृष्णानें भीष्म, द्रोण आणि सर्व राजे यांच्यासमोर, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो उत्तम रथ उभा केला आणि म्हटलें कीं, पार्था, हे जमलेले कौरव पहा.
२६-२९) अर्जुनाने तेथें दोन्ही सैन्यामध्यें उभे असलेले वाडवडील, आजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे, इत्यादि आप्तेष्ट पाहिले. उभे असलेले ते सर्व योद्धे आपले बंधुजन आहेत असें पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला अर्जुन विषादयुक्त होऊन म्हणाला, हे कृष्णा, युद्ध करण्याच्या इच्छेने (येथें) जमलेल्या या आप्त जनांना पाहून मी गलीत गात्र (माझे अवयव गळून) होत आहे, तोंडाला कोरड पडत आहे, शरीराल कंप सुटला आहे, अंगावर रोमांच उभे राहात आहेत.
३०) गांडीव धनुष्य हातांतून गळून पडत आहे, सगळ्या अंगाचा दाह होत आहे, मन भ्रमल्यासारखें होत आहे, आणि माझ्यानें उभें देखील राहावत नाही. 
३१) हे श्रीकृष्णा, मला विपरीत चिन्हें दिसत आहेत. ह्याशिवाय, युद्धांत स्वजनांना मारुन हित होईल असेंही मला वाटत नाही.
३२) हे कृष्णा, विजय, राज्य आणि सुखें ह्यांची मला इच्छा नाही. हे गोविंदा ! राज्य, भोग किंवा जीवित हें घेऊन काय करावयाचें आहे? 
३३) ज्यांच्यासाठीं आम्ही राज्य, उपभोग व सुखें यांची इच्छा करावयाची, तेच हे स्वजन जीवित व संपत्ति ह्यांची आशा सोडून युद्धाला सिद्ध होऊन उभे राहिले आहेत. 
३४) गुरु, वडील, मुलगे, तसेंच आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे व त्याचप्रमाणे इतरही अनेक आप्त येथें आहेत. 
३५) हे मधुसूदना, हे जरी आम्हांला मारण्यास उठले आहेत, तरीही मी ह्यांना त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मारुं इच्छीत नाहीं, मग पृथ्वीची काय कथा? 
३६) हे जनार्दना, कौरवांना ठार मारुन आम्हांला कोणतें सुख मिळणार? ह्या दुष्टांना मारण्याने आम्हांला पापच लागेल.
३७) म्हणून हे माधवा, आपले बांधव जे कौरव त्यांना मारणें योग्य नव्हे. स्वजनांचे प्राण घेतल्याने आम्हांला सुखप्राप्ति कशी होईल?  
३८-३९) हे जनार्दना, या लोभविष्टांना जरी कुलक्षयामुळें होणारा दोष व मित्रद्रोहाचे पातक दिसत नसलें तरी कुलक्षयाचे घोर परिणाम आम्हांला स्पष्टपणें दिसत असतां, ह्या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव झाल्याशिवाय कशी राहील? 
४०) कुलाचा क्षय झाला म्हणजे परंपरागत कुलधर्म नष्ट होतात. धर्म सुटला कीं सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो.
४१) हे कृष्णा, अधर्माने ग्रासिलें म्हणजे कुलस्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रिया बिघडल्या कीं वर्णव्यवस्थेचा नाश होतो. 
४२) वर्णसंकर हाकुलक्षय करणार्‍यांना व त्यांच्या कुलालाही नरकाला नेतो. कारण श्राद्ध-तर्पणादि किंवा लुप्त झाल्यामुळें त्यांचे पितर अधोगतीला जातात. 
४३) कुलक्षय करणार्‍यांच्या ह्या वर्णसंकरकारक दोषांनी जातीधर्म व परंपरागत कुलधर्म उध्वस्त होतात.
४४) हे जनार्दना, ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत, त्यांना खचित नरकवास प्राप्त होतो असें आम्ही ऐकत आलों आहो.
४५) अहो, आम्ही राज्याच्या व सुखाच्या लोभानें स्वजनांना ठार मारण्यास तयार झालों ! हें महत्पाप करण्यास आम्ही सिद्ध झालों हे केवढें आश्र्चर्य !
४६) ह्यापेक्षां मी निःशस्त्र राहून उलट प्रतिकार करीत नसतांही जर सशस्त्र कोरव मला रणांत ठार मारतील, तर त्यांत माझें अधिक कल्याण होईल.
संजय म्हणाला
४७) ह्याप्रमाणें रणभूमीवर भाषण करुन शोकग्रस्तहृदय असा अर्जुन, बाणासह धनुष्य टाकून देऊन, रथांत आपल्या जागीं स्तब्ध झाला.
ह्याप्रमाणें श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' अर्जुनविषाद प्रकरण ' नांवाचा पहिला अध्याय संपूर्ण झाला.         
Meaning in English
1) Gather on the holy place of Kurukshetra, O Sanjaya, what did my sons and the sons of Pandu, eager to fight, do?         
Sanjay said
2) Having seen the army of the sons of Pandu arrayed, king Duryodhana then approached the preceptor (Drona), and (spoke) these words;
3) "Behold, O preceptor, this vast army of the Pandavas arrayed by the son of Drupada, your gifted disciple.
4) " Here are mighty-bowed heroes, equals of Brima and Arjuna in battle-Yuyudhana (Satyaki) and Virata and Drupada, the mighty warrior. 
5) " Dhrishtaketu, Chekitana, the valiant king of Kasi, Purujit, Kuntibhoja and that prince amongst men, the king of the Shibis.
6) "Yudhamanyu the powerful, Uttamouja the valiant, the son of Subhadras, and the sons of Draupadi-all mighty warriors (Maharathi).
7) " know also, O best amongst the twice-born (Brahnanas), those who are distiguoshed
amongst us, the leaders of my army, I shall name them for your information.
8) "Yourself, Bhishma, Karna and Krupa, the winner of battles; Asvattama, Vikarna, and also the son of Somadatta.
9) "And many other heros as well are there, determined to give up their lives for my sake, wielding various (kinds of weapns for attack, all dexterous in battle.
10) "That army of ours, protected by Bhishma, is large, unlimited; but this army of theirs, protected by Bhima is limited.
11) "(Therefore) do you all, keeping to your respective positions (stations), at all approaches to the army, protect Bhishma alone on all sides.
12) Gladdening his (Duryodhana's) heart, the powerful eldest of the Kurus, the grandsire, thundered forth; a lion's roar, and blow his conch.
13) Then, all of a sudden conchs, kettle-drums, trumpers, drums and horns blared forth; that sound was tumultuous.
14) Then, seated in a great chariot to which white horses were yoked, Madhava (Shri Krishna) and Pandava (Arjuna) blew their celestial conchs.
15) Hrishikesa (Krishna) blew the (conch) Panchajanya, Dhananjaya (Arjuna) the Devadatta, and Vrikodara (Bhima) of terrible deeds blew the great conch Poundra.
16) King Yudhishthira, the son of Kunti, blew AnantaVijaya and Nakula and Sahadeva, the Sughosha and Manipushpaka respectively.
17-18) The mighty-bowed king of Kasi, the mighty warrior Sikhandi, Dhrishtadyumna, Virata, the unconquered Satyaki, Drupada, the sons of Droupadi, and Subhadra's son of powerful arms, (all), O Lord of the earth, blew their conchs on all sides.
19) That great tumult, making the heaven and earth resound, rent the hearts of Dhritarashtra's sons.
20-22) Them the monkey-bannered (on the chariot) son of Pandu, (Arjuna) when he saw the sons of Dhrutarashtra (thus) arrayed, and when missiles were about to be disharged , raised his bow, O King, and said to Hrishikesa (Shri Krishna) the following words. 
Arjun said
O Achyuta, (Shri Krishna) keep my chariot between the two ar,ies while I see those who are arrayed, seeking battle, and know with whom I shall have t fight in this preparation for combat.
23) (And while) I see those who are gathered here ready for fight, desirous of pleasing in battle the evil-minded son of Dhrutarashtra.
Sanjay said
24-25) O Descandant of Bharata (Dhrutarashtra), thus spoken to by Gudakehsa (Arjuna), Hrushikesha (Shri Krishna),placing that excellent chariot between the two armies, in front of Bhishma, Drona and all the kings, said," See. O Partha (Arjuna), these assembled Kurus.
26) There, situated in both the armies, Partha (Arjuna) saw fathers, as also grandsires, preceptors, maternal uncles, brothers, sons, grandsons, associates, father-in-law, and well-wishers. 
27) Seeing all these kinsmen gathered together, the son of Kunti, overcome with great compassion, spoke thus in grief.
Arjuna said
28-29) Seeing these kinsmen, O Krishna, arrayed with a view to fighting, my limbs fail, and my mouth is parched up. My body quivers, and there is horripilation; the Gandiva (Arjuna's bow) slips from my hands, and my skin burns. 
30) I am notable to stand, my mind is reeling, as it were, and I see, O Keshava (Shri Krishna), adverse omens.
31-32) And I see no good from killing linsmen in battle. I do not desire victory, O Krishna, not sovereeignty, nor pleasures; of what use is sovereignty to us, O Govinda (Shri Krishna), or enjoyments, or life itself?
33) They for whose sake we desire sovereighty, enjoyments and pleasures, are gathered here for battle, giving up (their) lives and wealth.
34) Preceptors, fathers, sons, as also grandsires; maternal uncles, fathers-in-law, grandsons, brothers-in-law, and other kinsmen as well.
35) I do not like to kill them, O Madhusudana (Shri Krishna), even if they should kill us, no, not even for the sovereignty of the three worlds, much less for that of this earth. 
36) What joy will be ours, O Janardana (Shri Krishna), by slaying these sons of Dhrutarashtra? Sin alone will overtake us if we kill these aggressors.
37) Therefore we ought not to kill these sons of Dhrutarashtra, our kinsmen; how can we indeed be happy, O Madhava (Shri Krishna), by killing our own people?
38-39) Although these, with their minds overcome by greed, see no evil in destroying the family or sin in hostility to friends, why should we, O Janardana, who see the evil resulting from destruction of the family, notlearn to desist from this sin?  
40) With the destruction of the family the time honoured family traditions are lost; and when the traditions are lost, unrighteousness overtakes the whole family.
41) When unrighteousness prevails, O Krishna, the women of the family become corrupt, and when the women are corrupt, O descendant of the Vrishnis (Shri Krishna), there arises a mixture of castes.
42) The mixture of castes in the family only leads its destroyers to hell; their ancestors fall (from heaven), for they are deprived of the offerings of funeral cakes and drink.
43) From these sins of the destroyers of the family that lead to a mixture of castes, the long-standing traditions of the caste, the family, ete, are destroyed.
44) persons whose family traditions are destroyed, O Janardana, are doomed to live perpetually in hell; thus have we heard.
45) Alas, what a heinous sins we are resolved to commit, in that we are ready to kill our kinsmen, out of good for the joys of sovereignty.
46) If The sons of Dhrutarashtra with weapons in (their) hands should slay me in battle, while I am unarmed and unresisting, that would be better for me.
Sanjay said
47) Thus speaking, Arjuna sat down on the chariot in (that) battle, casting away (his) bow and arrows, being grief-stricken at heart.
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 1 अर्जुनविषादयोग अध्याय १


Custom Search

No comments: