Thursday, June 23, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 16 दैवासुरसम्पद्विभागयोगो अध्याय १६


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 16 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 16 is in Sanskrit. Name of this adhyay is Vibhuti Yoga. Here in this Adhyay 16 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, many of Good virtues and Bad virtues. The good virtue described in this adhyay takes sadhak to Moksha Whereas the bad leads into downfall.
दैवासुरसम्पद्विभागयोगो अध्याय १६
श्रीभगवानुवाच
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्र्च यज्ञश्र्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥ १ ॥
अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥ २  ॥
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ ३ ॥
दम्भो दर्पोऽभिमानश्र्च क्रोध पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम् ॥ ४ ॥
दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ ५ ॥
द्वौ भूतसर्गो लोकेऽस्मिन्दैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रुणु ॥ ६ ॥
प्रवृतिं च निवृतिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ ७ ॥
असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्र्वरम् ।
अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम् ॥ ८ ॥
एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ ९ ॥
काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।
मोहाद्गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १० ॥
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्र्चिताः ॥ ११ ॥
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥ १२ ॥
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ १३ ॥
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्र्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १४ ॥
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १५ ॥
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६ ॥
आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥ १७ ॥
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १८ ॥
तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्त्रमशुभानासुरीष्वेव  योनिषु ॥ १९ ॥      
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥ २० ॥
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥ २१ ॥
एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ २२ ॥
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ २३ ॥
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ २४ ॥  
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम  षोडशोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥  
मराठी अर्थ
श्रीभगवान म्हणाले
१-३) निर्भया, पूर्ण सात्त्विक वृत्ति, ज्ञान व कर्मयोग या दोहोविषयीं तत्परता, दान, इंद्रियनिग्रह, यज्ञ, स्वधर्माप्रमाणे आचार, तप, सरळपणा, अहिंसा, सत्य, क्रोध नसणें, त्याग, शांति, मनांत दुष्टबुद्धि न बाळगणें, प्राणिमात्राविषयीं दया, निर्लोभता, नम्रता, जनलज्जा (वाईट कृत्यांची), स्वैर व्यापार सुटणें, तेजस्विता, क्षमा, धृति, शुचिर्भुतपणा, कोणाचाही द्रोह न करणे, अभिमान नसणें असे हे सद्गुण, हे अर्जुना, दैवी संपत्ति घेऊन जन्मलेल्या पुरुषास प्राप्त होतात.
४) हे अर्जुना, आसुरी संपत्ति घेऊन जन्मलेल्यांच्या अंगीं, दांभिकपणा, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरपणा, आणि अज्ञान हे दुर्गुण आढळून येतात.
५) दैवी सद्गुण मोक्षप्राप्तीला आणि आसुरी दुर्गुण बंधनाला कारण होतात असें मानलें आहे. हे अर्जुना, तूं दैवी संपत्तीसाठी जन्मलेला आहेस म्हणून हा शोक सोडून दे. 
६) हे अर्जुना, ह्या लोकीं दैवी आणि आसुरीअसे दोन प्रकारचे प्राणी उत्पन्न होतात. त्यांतल्या दैवी प्रकाराचें वर्णन मीं पूर्वी विस्ताराने सांगितले, आतां आसुरी प्रकाराचें वर्णन मजकडून ऐक. 
७) आसुरी स्वभावाच्या लोकांना प्रवृत्ति म्हणजे काय करावें व निवृत्ति म्हणजे काय करुं नये हें समजत नाही. त्यांच्या ठिकाणीं शुचिर्भूतपणा, सदाचार आणि सत्य हीं नसतात.
८) आसुरी स्वभावाचे लोक म्हणतात, की जग असत्य, निराधार, ईश्र्वररहित, एकमेकांपासूनही न निर्माण झालेलें (म्हणून) मनुष्याच्या विषयोपभोगाकरितां उत्पन्न झालेलें आहे. त्याखेरीज त्याचा दुसरा हेतु काय असणार?
९) अशा प्रकारच्या विचारसरणीचा आश्रय करुन हे नष्टात्मे अल्प बुद्धि, क्रूरकर्मी, घातकी व जगाच्या नाशासाठी उत्पन्न होतात. 
१०) कधीच पुर्‍या न होणार्‍या कामवासनेचा आश्रय करुन दांभिकता, अहंमन्यता व उन्मत्तपणा यांनी पछाडलेले व अशुद्ध आचारविचार स्वीकारलेले ते आसुरी लोक, मोहामुळें भलतेच वेडेपणाचे बेत मनांत योजून घाणेरडीं कामें पापाचरण करण्यास प्रवृत्त होतात.
११-१२) तसेंच (कामोपभोगाची) अपरिमित चिंता आमरणान्त वाहणारे, कामेच्छा तृप्त करणें हाच पुरुषार्थ मानणारे आणि जगांत प्राप्तव्य काय ते हेंच अशी ठाम समजूत झालेले, शेकडों आशांच्या पाशांनीं बद्ध झालेले, कामक्रोधाधीन झालेले, असे ते आसुरी लोक आपल्या कामोपभोगाकरितां अन्यायाच्या मार्गांनी द्रव्यसंचय करण्याची हांव धरतात.    
१३) आज मीं हें मिळविलें, (उद्यां) माझा तो मनोरथ प्राप्त करुन घेईन, इतके द्रव्य मजजवळ आहेच, पुनः तेंही माझें होईल.
१४-१६) हा शत्रु मी आज लोळविला, दुसरे शत्रु देखील ठार करीन. मी सत्ताधीश, मीं सुखें भोगणारा, मीच सिद्ध, बलाढ्य व सुखी, मी श्रीमंत व कुलवंत आहें, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, मी दानें देईन, मी चैन करीन अशा अज्ञानांत मोहित झालेले, नाना प्रकारच्या कल्पनांनी भ्रम पावलेले, मोहाच्या जाळ्यांत पूर्णपणे गुरफटलेले आणि विषयभोगांत लंपट झालेले हे आसुरी स्वभावाचे लोक अखेरीस अमंगळ नरकांत पडतात.
१७) स्वतःची बढाई मारणारे, गर्वाने ताठरलेले, संपत्ति व मान यांनीं मदोन्मत्त झालेले हे आसुरी वृत्तीचे लोक केवळ ढोंगीपणानें शास्त्रविधी सोडून केवळ नांवाचे यज्ञ करतात.
१८) अहंकार, शक्तीचा गर्व, उन्मत्तपणा, विषयवासना, आणि कोपाविष्टपणा ह्या दुर्गुणांनीं भरलेले मत्सरी स्वभावाचे ते लोक आपल्या व इतरांच्या देहांत वास करणार्‍या माझा (परमेश्र्वराचा) द्वेष करणारे व निंदक असे होतात.
१९) त्या ईश्र्वरद्रोही, क्रूरकर्म्या घातकी नराधमांना संसारांतील आसुरी म्हणजे पापयोनींत मी नेहमीं टाकून देतो.
२०) हे कुंतीपुत्रा, याप्रमाणें जन्मोजन्मीं आसुरी कोटीला प्राप्त झालेले ते मूर्ख लोक माझी प्राप्ती कधींच न होतां अखेर अधोगतीला जातात.
२१) काम, क्रोध व लोभ असें हें तीन प्रकारचें नरकाचें द्वार असून तें आत्मविघातक आहे म्हणून या तीहींचा त्याग करावा. 
२२) हे अर्जुना, या तीन नरकद्वारांपासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचे कल्याण तेंच आचरतो व त्यामुळें तो श्रेष्ठ गतीला जातो.
२३) जो शास्त्रोक्त विधी सोडून मनसोक्त वर्तन करतो, त्याला सिद्धि, सुख किंवा उत्तम गति हीं प्राप्त होत नाहींत. 
२४) म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामीं तुला शास्त्र हेंच आधारभूत प्रमाण मानलें पाहिजे. शास्त्रामध्यें काय विहित आहे तें जाणून कर्म करणें तुला या लोकीं योग्य आहे.
अशा रीतीने श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' दैवासुरसंपद्विभाग योग ' ह्या नांवाचा सोळावा अध्याय संपूर्ण झाला.
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 16 दैवासुरसम्पद्विभागयोगो अध्याय १६


Custom Search

No comments: