Monday, August 22, 2016

HimalayaKrutam Shiv Stotram हिमालयकृतं शिवस्यस्तोत्रम्


HimalayaKrutam Shiv Stotram 
HimalayaKrutam Shiv Stotram is in Sanskrit. It is God Shiva Stuti by Himalaya. It is from ShriBrahmavaivart Purana, ShriKrishana JanamKhanda.
हिमालयकृतं शिवस्यस्तोत्रम्  
हिमालय उवाच 
प्रसीद दक्षयज्ञघ्न नरकार्णवतारक ।
सर्वात्मरुप सर्वेश परमानन्दविग्रह ॥ १ ॥
गुणार्णव गुणातीत गुणयुक्त गुणेश्र्वर । 
गुणबीज महाभाग प्रसीद गुणिनां वर ॥ २ ॥
योगाधार योगरुप योगज्ञ योगकारण ।
योगीश योगिनां बीज प्रसीद योगिनां गुरो ॥ ३ ॥
प्रलय प्रलयाद्यैक भवप्रलयकारण ।
प्रलयान्ते सृष्टिबीज प्रसीद परिपालक ॥ ४ ॥
संहारकाले घोरे च सृष्टिसंहारकारण । 
दुर्निवार्य दुराराध्य चाशुतोष प्रसीद मे ॥ ५ ॥
कालस्वरुप कालेश काले च फलदायक ।
कालबीजैक कालघ्न प्रसीद कालपालक ॥ ६ ॥
शिवस्वरुप शिवद शिवबीज शिवाश्रय । 
शिवभूत शिवप्राण प्रसीद परमाश्रय ॥ ७ ॥
इत्येवं स्तवनं कृत्वा विरराम हिमालयः ।
प्रशशंसुः सुराः सर्वे मुनयश्र्च गिरीश्वरम् ॥ ८ ॥
हिमालयकृतं स्तोत्रं संयतो यः पठेन्नरः । 
प्रददाति शिवस्तस्मै वाञ्छितं राधिके ध्रुवम् ॥ ९ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते हिमालयकृतं शिवस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
मराठी अनुवाद 
हिमालय म्हणाला
हे सर्वेश्र्वर शिव ! तुम्ही दक्ष यज्ञाचा संहार करणारे व शरणागतांना नरकरुपी सागरांतून वाचवणारे आहात. सर्वांचे आत्मस्वरुप आहा. आपला विग्रह परमानन्दमय आहे. तुम्ही मला प्रसन्न व्हा. गुणवानांमध्ये श्रेष्ठ महाभाग शंकर आपण गुणांचे सागर असूनही गुणांच्या पलीकडे आहात. गुणांनी युक्त, गुणांचे स्वामी आणि गुणांचे आदिकारण आहात, आपण मला प्रसन्न व्हा. 
प्रभु ! आपण योगाचे आश्रयदाते, योगरुप, योगाचे ज्ञाते, योगाचे कारण, योगीश्र्वर तसेच योग्यांचे आदिकारण व गुरु आहात, आपण माझ्यावर प्रसन्न व्हा. 
आपल्यामधेच प्राणी विलय होतात त्यामुळे आपण प्रलय आहात. आपण प्रलयाचे एकमात्र आदिकारण आहात. प्रलयाच्या शेवटी सृष्टीचे बीजरुप आहात. त्या सृष्टीचे पालनहार आहात. आपण मला प्रसन्न व्हा. 
भयंकर संहारकाली सृष्टीचा संहार करणारे आपणच आहात. आपला वेग सहन करणे कोणालही शक्य नाही. आराधना करुन आपल्याला खुष करणेही सोपे नाही. तरीसुद्धा भक्तांना आपण शीघ्र प्रसन्न होता. प्रभो ! आपण मला प्रसन्न व्हा.
आपण कालस्वरुप, काल-स्वामी, कालप्रमाणे फल देणारे, कालचे एकमेव आदिकारण, कालनाशक व पोषक पण आपण आहात. आपण माझ्यावर प्रसन्न व्हा. 
आपण कल्याणमूर्त, कल्याण करणारे, कल्याणाचे बीजस्वरुप व आश्रय आहात. आपण कल्याणस्वरुप व कल्याणमय प्राण आहात. सर्वांचा परम आश्रय असलेल्या शिवप्रभु आपण माझ्यावर प्रसन्न व्हा. 

अशाप्रकारे शिवाची स्तुति करुन हिमालय स्तब्ध झाले. त्यावेळी सर्व देव व मुनिंनी हिमालयाची प्रशंसा केली. ( ते  राधिकेला म्हणाले ) राधिके ! जो मनुष्य स्वस्थचित्ताने संयमपूर्वक हिमालयाने केलेल्या ह्या स्तोत्राचा पाठ करेल त्याला भगवान शिव मनोवाञ्छित वस्तु प्रदान करतात.   
HimalayaKrutam Shiv Stotram
हिमालयकृतं शिवस्यस्तोत्रम्  


Custom Search

No comments: