Tuesday, August 2, 2016

Sankashtanamashtakam संकष्टनामाष्टकम्


Sankashtanamashtakam 
Sankashtanamashtakam is in Sanskrit. It is from PadmaMahaPuran. This is told to Yudhishthira by Markandeya Rushi. These are the eight pious names of Sankata Devi. It is said in the stotra that any devotee reciting these names with faith three times a day becomes free from all the troubles, difficulties and blessed with sons by goddess.
संकष्टनामाष्टकम्
नारद उवाच
जैगीषव्य मुनिश्रेष्ठ सर्वज्ञ सुखदायक ।
आख्यातानि सुपुण्यानि श्रुतानि त्वत्प्रसादतः ॥ १ ॥
न तृप्तिमधिगच्छामि तव वागमृतेन च । 
वदस्वैकं महाभाग संकटाख्यानमुत्तमम् ॥ २ ॥
इति तस्य वचः श्रुत्वा जैगीषव्योऽब्रवीत्ततः ।
संकटनाशनं स्तोत्रं श्रृणु देवर्षिसत्तम ॥ ३ ॥
द्वापरे तु पुरा वृत्ते भ्रष्टराज्यो युधिष्ठिरः ।
भ्रातृभिः सहितो राज्यनिर्वेदं परमं गतः ॥ ४ ॥
तदानीं तु ततः काशीं पुरीं यातो महामुनिः ।
मार्कण्डेय इति ख्यातः सह शिष्यैर्महायशाः ॥ ५ ॥
तं दृष्ट्वा स समुत्थाय प्रणिपत्य सुपूजितः ।
किमर्थं म्लानवदन एतत्त्वं मां निवेदय ॥ ६ ॥
युधिष्ठिर उवाच
संकष्टं मे महत्प्राप्तमेतादृग्वदनं ततः ।
एतन्निवारणोपायं किञ्चिद् ब्रहि मुने मम ॥ ७ ॥
मार्कण्डेय उवाच
आनन्दकानने देवी संकटा नाम विश्रुता ।
वीरेश्वरोत्तमे भागे पूर्वं चन्द्रेश्वरस्य च ॥ ८ ॥
श्रृणु नामाष्टकं तस्याः सर्वसिद्धिकरं नृणाम् ।
संकटा प्रथमं नाम द्वितीयं विजया तथा ॥ ९ ॥
तृतीयं कामदा प्रोक्तं चतुर्थं दुःखहारिणी ।
शर्वाणी पञ्चमं नाम षष्ठं कात्यायनी तथा ॥ १० ॥
सप्तमं भीमनयना सर्वरोगहराऽष्टमम् ।
नामाष्टकमिदं पुण्यं त्रिसंध्यं श्रद्धयाऽन्वितः ॥ ११ ॥
यः पठेत्पाठयेद्वापि नरो मुच्येत संकटात् ।
इत्युक्त्वा तु द्विजश्रेष्ठमृषिर्वाराणसीं ययौ ॥ १२ ॥
इति तस्य वचः श्रुत्वा नारदो हर्षनिर्भरः ।
ततः सम्पूजितां देवीं वीरेश्वरसमन्विताम् ॥ १३ ॥
भुजैस्तु दशभिर्युक्तां लोचनत्रयभूषिताम् ।
मालाकमण्डलुयुतां पद्मशङ्खगदायुताम् ॥ १४ ॥
त्रिशूलडमरुधरां खड्गचर्मविभूषिताम् ।
वरदाभयहस्तां तां प्रणम्य विधिनन्दनः ॥ १५ ॥
वारत्रयं गृहीत्वा तु ततो विष्णुपुरं ययौ ।
एतत्स्तोत्रस्य पठनं पुत्रपौत्रविवर्धनम् ॥ १६ ॥
संकष्टनाशनं चैव त्रिषु लोकेषु विषुतम् ।
गोपनीयं प्रयत्नेन महावन्ध्याप्रसूतिकृत् ॥ १७ ॥
॥ इति श्रीपद्ममहापुराणे संकष्टनामाष्टकं सम्पूर्णम् ॥
मराठी अर्थ
नारद म्हणाले
१-२) हे जैगीषव्य मुनिवरा, हे सर्वज्ञा, हे प्रीतीदायका, आपल्या कृपेने मी परम कल्याणदायक अनेक आख्याने ऐकली, परंतु आपली अमृतमय वाणी ऐकूनही अजून माझी तृप्ती झाली नाही. म्हणून आपण संकटादेवीचे उत्तम आख्यान सांगावे.
३) त्यांचे हे बोलणे ऐकून जैगीषव्य ऋषि म्हणाले, हे देवर्षिश्रेष्ठ ! आता आपण सर्व संकटांचा नाश करणारे हे स्तोत्र ऐका.
४) पूर्वि द्वापारयुगांत महाराज युधिष्ठिर राज्य हिरावून घेतल्याने भावांबरोबर राज्यसंकटांत पडले.
५) त्यावेळी ते काशीला पोहोचले तेव्हा तेथे महान महर्षि मार्कंडेय तेथे शिष्यांसह वास्तव्यास होते.
६) त्यांना पाहून युधिष्ठिराने उठून त्यांना नमस्कार केला. त्यानंतर महर्षिंचे पूजन केले, त्यावेळी मार्कंडेयानीं त्याला तुझ्या तोंडावर उदासीनता का आहे ? असे विचारले.
७) युधिष्ठिर म्हणाला, मी फार कष्टी झालो आहे. म्हणून माझ्या चेहर्‍यावर उदासिनता दिसत आहे. आपण माझ्या या कष्ट निवारणाचा काहीं उपाय सांगावा.
८) मार्कंडेय म्हणाले काशीच्या वनांत संकटा नावाची देवी वीरेश्र्वराच्या उत्तरेला व चन्द्रशेखराच्या पूर्वेला आहे. 
९-११) मनुष्यांना सर्व सिद्धि देणार्‍या तीच्या नामाष्टकस्तोत्राचे श्रवण कर. तीचे पहिले नांव संकटा, दुसरे विजया, तीसरे कामदा, चौथे दुःखहारीणी, पांचवे शर्वाणी, सहावे कात्यायनी , सातवे भीमनयना व आठवे नांव सर्वरोगहरा सांगितले गेले आहे.
१२) जो भक्त श्रद्धाळूपणे देवी संकटाच्या या कल्याणकारी नामाष्टक स्तोत्राचा तीनही संध्याकाळी पाठ करतो किंवा करवून घेतो तो संकटांतून मुक्त होतो, द्विजवर नारदाला असे सांगून जैगीषव्य ऋषि वाराणसीस निघून गेले.  
१३-१७) त्यांच्या या कथनाने नारदांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर त्यानी वीरेश्र्वरासहीत दहा हात, तीन डोळयांनी सुशोभित, माला व कमण्डलु धारण करणार्‍या, कमल-शंख-गदा हाती असलेल्या, त्रिशूल, डमरु धारण केलेल्या खड्ग व ढालीने सुशोभित, हाताची अभय मुद्रा धारण करणार्‍या देवी संकटाचे पूजन केले. अशा प्रकारे सर्वप्रकारे पूजित देवीला नमस्कार करुन व तीनवेळा चरणोदक घेऊन ब्रह्मापुत्र नारद विष्णुलोकास निघुन गेले. या स्तोत्राचा पाठ पुत्र-पौत्र वृद्धि करणारा आहे. संकटांचा नाश करणारे हे स्तोत्र तीन्ही लोकी प्रसिद्ध आहे. तसेच महावन्ध्या स्त्रीलाही संतान प्राप्ती करुन देणारे आहे. हे स्तोत्र  प्रयत्नपूर्वक गोपनीय ठेवावयास हवे. 
अशारीतीने श्रीमहापद्म पुराणांतील संकष्टनामाष्टक पूर्ण झाले. 
Sankashtanamashtakam 
संकष्टनामाष्टकम्


Custom Search

No comments: