Wednesday, October 5, 2016

Shakthe Mahatmyani Stotram शक्तेः महात्म्यनि स्तोत्रं


Shakthe Mahatmyani Stotram 
Shakthe Mahatmyani Stotram is in Sanskrit. It is a beautiful creation of Param Poojya Vasudevanand Saraswati. In some families Worship of Panchayatan is performed as a daily practice. Here in this stotra it is described why the worship is required to be done. It is said even God Shiva is not able to carry out his duties without the presence of Shakti Devata. Shakti devata has no birth, no death and she is very ancient. This goddess gives mukti to devotees.
शक्तेः महात्म्यनि स्तोत्रं
शिवोऽपि शक्तियुक्तश्चेत्प्रभुः कार्याय नान्यथा ।
स्वमायया विनेशस्य परस्यानुभवात्मनः ॥ १ ॥
न घटेतार्थसंबंधस्ततो माया परावरा ।
यस्याः प्रभावं प्रवक्तुं ब्रह्माद्या अप्यलं बलम् ॥ २ ॥
वैष्णवीयं महामाया सुरासुरमुनिस्तुता ।
शय्यां देवमयीं कृत्वा शेतेऽसाविति गीयते ॥ ३ ॥
सर्वे देवाश्च मुनयो विषमे यां स्तुवन्ति हि ।
सृष्टिस्थितिविनाशानां हेतुरेका सनातनी ॥ ४ ॥
विदुषोऽपि हठाच्चेतो महामोहाय यच्छति ।
अभक्तानां बन्धहेतुर्भक्तानां मुक्तिदा च सा ॥ ५ ॥
सर्वेष्वपि हि भूतेषु चेतनेत्युच्यते ततः ।
स्वात्मारामो शिवोऽप्यत्र रत्यर्थमनुधावति ॥ ६ ॥
माया चतुष्कपर्दाऽसौ युवतिर्नित्यनूतना ।
सुपेशा च घृतास्यादौ वस्तेस्य वयुनान्यपि ॥ ७ ॥
भक्तिश्रद्धाधृतिर्‍हीश्रीधीमेधाद्यैश्च सत्सु या ।
तृष्णालक्ष्याऽऽर्तिभीनिद्रातन्द्रारुपैरसत्सु च ॥ ८ ॥
क्षणे क्षणे विमुह्यन्ति वशिनोऽप्यत्र योगिनः ।
सैषानिर्वचनीयार्च्या या ह्यनादिरजा श्रुता ॥ ९ ॥
॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतिविरचिता शक्तेः महात्म्यनि संपूर्णा ॥
मराठी अर्थ (स्वैर)

खरोखर प्रत्यक्ष शिवसुद्धा शक्तियुक्त असेल तरच त्याचे कार्य करण्यास समर्थ होतो. अन्यथा नाही. जिचे माहात्म्य ब्रह्मदेव आदि देवसुद्धा वर्णन करु शकत नाहीत, त्या मायेच्या साहाय्याशिवाय, श्रेष्ठ आत्मतत्त्वाचा अनुभव असणार्‍या शिवाचेही कुठलेच कार्य होऊ शकत नाही. म्हणूनच ही माया सर्वश्रेष्ठ आहे. अशी ही सुर-असुर-मुनि यांनी स्तुति केलेली वैष्णवी आहे. सृष्टि-स्थिती-विनाश करणारी ही सनातन आदिशक्ति हीची सर्व देव मुनि निरनिराळ्या प्रकारे स्तुती करतात. विद्वान लोकांनासुद्धा महामोहांत पाडणारी, अभक्तांना बद्ध करणारी व भक्तांना मुक्ति देणारी आहे. सर्व भुतांच्या ठिकाणी ही चेतनारुपाने वास करते. मात्र स्वात्मारामांत न रमता भुते इतरत्र धावतात. ही नित्य नूतन युवती आहे. ही शक्तिमाता सज्जनांचे ठिकाणी भक्ति, श्रद्धा, धैर्य, लज्जा (विनम्रता), श्री, बुद्धी,स्मरणशक्ति, धारणाशक्ति इत्यादि रुपाने असते तर दुर्जानांचे ठिकाणी हाव, बुद्धिहीनता,संकट, भीति, निद्रा व आळस या रुपांनी वास करते. या शक्तिमातेच्या प्रभावाने इंद्रियांवर ताबा ठेवणारे योगीजनसुद्धा कित्येकवेळा मोहांत पडतात. या शक्तिमातेचे वर्णन करणे अशक्य आहे.  ती पूजनीय आहे, अजन्मा आहे व अनादि आहे असे शास्त्रांत म्हटले आहे. 
Shakthe Mahatmyani Stotram
शक्तेः महात्म्यनि स्तोत्रं


Custom Search

No comments: