Friday, October 7, 2016

Shri KalikAshtakam श्रीकालिकाष्टकम्


Shri KalikAshtakam 
Shri KalikAshtakam is in Sanskrit. It is a beautiful creation of Param Poojya Adi Shankaracharya. It is a Kali Stuti starting with Kali Dhyana. Ma Kali is wearing a necklace of heads of demons; she is having in her left hand a khadga and a bleeding head of demon. She is making a loud and terrifying voice. This was during the war with demons Chand-Mund.
श्रीकालिकाष्टकम् 
ध्यानम् 
गलद्रक्तमुण्डावलीकण्ठमाला 
महाघोररावा सुदंष्ट्रा कराला ।
विवस्त्रा श्मशानालया मुक्तकेशी 
महाकालकामाकुला कालिकेयम् ॥ १ ॥
भुजे वामयुग्मे शिरोऽसिं दधाना 
वरं दक्षयुग्मेऽभयं वै तथैव ।
सुमध्याऽपि तुङ्गस्तनाभारनम्रा 
लसद्रक्तसृक्कद्वया सुस्मितास्या ॥ २ ॥
शवद्वन्द्वकर्णावतंसा सुकेशी 
लसत्प्रेतपाणिं प्रयुक्तैककाञ्ची ।
शवाकारमञ्चाधिरुढा शिवाभि-
श्चतुर्दिक्षुशब्दायमानाऽभिरेजे ॥ ३ ॥
स्तुतिः
विरञ्च्यादिदेवास्त्रयस्ते गुणांस्त्रीन् 
समाराध्य कालीं प्रधाना बभूवुः ।
अनादिं सुरादिं मखादिं भवादिं 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ४ ॥
जगन्मोहनीयं तु वाग्वादिनीयं 
सुहृत्पोषिणीशत्रुसंहारणीयम् ।
वचस्तम्भनीयं किमुच्चाटनीयं 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ५ ॥
इयं स्वर्गदात्री पुनः कल्पवल्ली 
मनोजांस्तु कामान् यथार्थं प्रकुर्यात् ।
तथा ते कृतार्था भवन्तीति नित्यं 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ६ ॥ 
सुरापानमत्ता सुभक्तानुरक्ता 
लसत्पूतचित्ते सदाविर्भवत्ते ।
जपध्यानपूजासुधाधौतपङ्का 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ७ ॥
चिदानन्दकन्दं हसन् मन्दमन्दं 
शरच्चन्द्रकोटिप्रभापुञ्जबिम्बम् ।
मुनीनां कवीनां हृदि द्योतयन्तं 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ८ ॥ 
महामेघकाली सुरक्तापि शुभ्रा 
कदाचित् विचित्राकृतिर्योगमाया ।
न बाला न वृद्धा न कामातुरापि 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ९ ॥ 
क्षमस्वापराधं महागुप्तभावं 
मया लोकमध्ये प्रकाशीकृतं यत् ।
तव ध्यानपूतेन चापल्यभावात् 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ १० ॥ 
फलश्रुतिः
यदि ध्यानयुक्तं पठेद् यो मनुष्य-
स्तदा सर्वलोके विशालो भवेच्च ।
गृहे चाष्टसिद्धिर्मृते चापि मुक्तिः 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ११ ॥
॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं श्रीकालिकाष्टकं सम्पूर्णम् ॥
मराठी अर्थ (स्वैर) 
ध्यान
१) या भगवती कालिकेने गळ्यांतून रक्त गळणारी मुण्डमाला घातली आहे. ती अत्यंत भयानक आवाज करत आहे. तीच्या दाढा सुन्दर आहेत व स्वरुप भयंकर आहे. ती वस्त्रहीन असून श्मशानवासी आहे. तीचे केस अस्ताव्यस्त झाले आहेत. ती महाकालाबरोबर काम क्रीडेत रत आहे.     
२) तीने दोन डाव्या हातांत नरमुण्ड व खड्ग घेतले आहे. दोन डाव्या हातांनी वरमुद्रा व अभयमुद्रा केली आहे. तीची कंबर सुंदर आहे व स्तन उन्नत आहेत. तीचे ओष्ठ लाल आहेत व मुख मधुर हास्याने शोभत आहे.
३) तीच्या दोन्ही कानांत प्रेतासारखी आभूषणे आहेत. तीचे केस सुंदर आहेत. प्रेतांनी बनविलेल्या मंचावर ती बसली आहे  चौतर्फा भयानक आवाज करतआहे.
स्तुति
४) (हे कालिका माते )ब्रह्मा आदि त्रिदेव आपल्या तीनगुणांचा आश्रय घेऊन आपली आराधना करत आहेत. आपले स्वरुप आदिरहित आहे. देवतांमध्ये अग्रगण्य, यज्ञस्वरुप आणि विश्र्वाचे मूलभूत आहे. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
५) आपले हे स्वरुप सार्‍या विश्र्वाला मुग्ध करणारे आणि वाणीने स्तुति करण्यास योग्य आहे. आपण सुह्रुदांचे पालन करणार्‍या व शत्रुंचे नाश करणार्‍या आहात. वाणीचे स्तंभन करणारे व उच्चाटन करणारे आहे. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
६) आपण स्वर्ग (मोक्ष) देणार्‍या आहात. व भक्तांच्या मनोकामना पू्र्ण करणार्‍या आहात. त्यामुळे ते नेहमी कृतार्थ होतात. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
७) आपण सुरापानांत मग्न व भक्तांवर सदा स्नेह दाखविता. भक्तांच्या पवित्र हृदयांत आपला आविर्भाव होतो. जप. ध्यान, पूजारुपी अमृताने आपण भक्तांचे अज्ञान धुवून टाकता. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
८) आपले स्वरुप चिदानंदघन, मन्दमन्द हास्याने सम्पन्न शरत्कालीन करोडो चंद्रांच्या प्रभेसारखे आणि मुनि व कवि यांच्या हृदयांत प्रकाश (चेतना) निर्माण करणारे आहे. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
९) आपण प्रलयकालीन घटेसारख्या कृष्णवर्णा, कधी रक्तवर्णा तर कधी उजळ वर्णाच्या दिसता. आपण विचित्र आकृतीच्या योगमायास्वरुप आहात. तुम्ही बाल, वृद्धा किंवा कामातुर युवती नाही. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
१०) आपल्या ध्यानाच्या पवित्रतेने या अतिगुप्त भावाला मी या लोकी प्रगट केले आहे त्याबद्दल माझ्या अपराधाची मला क्षमा करा. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
फलश्रुति
११) जो कालिका भक्त या स्तोत्राचा ध्यानासह पाठ करेल तो सर्व लोकी महान होईल तसेच त्याच्या घरी अष्टसिद्धि वास करतील. आणि मृत्युनंतर त्याला मुक्ती मिळेल. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.

अशारीतीने श्रीमद् परम पूज्य आदि शंकराचार्यांनी केलेले हे कालिकाष्टक स्तोत्र संपूर्ण झाले.
Shri KalikAshtakam
श्रीकालिकाष्टकम् 


Custom Search

No comments: