Saturday, December 17, 2016

Paduka Panchak Stotra पादुका पंचक स्तोत्र


Paduka Panchak Stotra 
Paduka Panchak Stotra is in Sanskrit. It is composed by God Shiva himself. God Shiva has five mouths. This stotra has appeared from his five mouths. This stotra describes Kundalini. God Shiva is always found performing meditation. In this stotra he explains on which point in the kundalini he meditates. God Shiva also tells us where he meditates his Guru’s feet.
पादुका पंचक स्तोत्र 
ब्रह्मरंध्रसरसीरुहोदरे नित्यलग्नमवदातमद्भुतम् ।
कुंडलीविवरकांडमंडितं द्वादशार्णसरसीरुहं भजे ॥ १ ॥ अर्थ
१) सहस्त्रारस्थित ब्रह्मरंध्रामध्ये कुंडलिनीने युक्त अशा श्वेतरंगाच्या द्वादशवर्णाच्या पाकळ्यांच्या कमळाचे मी ध्यान करतो. त्याच बरोबर त्या कमलाच्या अद्भुत तेजाचा अनुभव घेऊन परमानंदित होतो. 
तस्य कंदलितकर्णिकापुटे क्लृप्तरेखमकथादिरेखया ।
कोणलक्षिततहलक्षमंडली भावलक्ष्यमबबलालयं भजे ॥ २ ॥
तत्पुटे पटुतडित्कडारिमस्पर्द्धमानमणिपाटलप्रभम् ।
चिन्तयामि हृदि चिन्मयं वपुर्नादबिंदुमणिपीठमंडलम् ॥ ३ ॥
उद् र्ध्वमस्य हूतभुक् शिखात्रयं तद्विलासपरिबृंहणास्पदम् ।
विश्वघमस्मरमहाचिदोत्कटं व्यामृशामि युगमादिहंसयोः ॥ ४ ॥
तत्र नाथचरणारविंदयोः कुंकुमासवझरीमरंदयोः ।
द्वंद्वमिंदुमकरंदशीतलं मानसं स्मरति मंगलास्पदम् ॥ ५ ॥
२-५) या कंदाच्या कर्णिकापुटामध्ये मी शक्तिपीठाचे भजन करतो. शक्तिपीठ वामा, ज्येष्ठा व रौद्री म्हणजे ' अ ' , ' क ' व ' थ ' या रेखांनी बनलेला त्रिकोण आहे. या त्रिकोणाच्या आतील बाजूस प्रत्येक कोणामध्ये आणखीही तीन बिंदू आहेत. या बिंदूंमुळे मंडल बनते. या तीन बिंदूंना त्रिबिंदु, त्रिशक्ती, त्रिमूर्ती इत्यादि नावांनी आपापल्या गुरुमुखानुकूल प्रसिद्धी आहे. (त्रिबिंदुः सा त्रिशक्तिः सा त्रिमूर्तिः सा सनातनी--यामल) उक्त त्रिकोणाच्या मंडलात नाद आणि बिंदूशी संलग्न अशा मणिपीठाचे अर्थात् मणि समान ज्योतीचे मी ध्यान करतो. आणि हृदय, मन व चित्त यांना एकीभूत करतो. येथे हंसपीठाच्या वरच्या भागी नादबिंदूच्या मध्यात जो त्रिकोण आहे, ते श्रीगुरुंचे स्थान आहे. त्यात परमहंस पुरुषाचे मी ध्यान करतो. ही ज्योती सर्व प्रकारच्या ज्योतींमध्ये श्रेष्ठ आहे आणि हिच्यात सर्व विश्व देखील सामाविलेले आहे. या त्रिकोणामध्ये वामारेखा अग्निरुपा आहे. ज्येष्ठारेखा चंद्ररुपा आहे. तर रौद्रीरेखा सूर्यरुपा आहे. वामारेखा दक्षिण दिशेस आरंभ होऊन उत्तरपूर्व टोकापर्यंत, ज्येष्ठारेखा उत्तरपूर्वेस आरंभ होऊन उत्तरपश्र्चिमेपर्यन्त आणि रौद्रीरेखा उत्तरपश्चिमदिशेस आरंभ होऊन वामारेखामध्ये मिळून जाते. हे तिन्ही बिंदू " त्रिपुरा " अथवा " त्रिपुरसुंदरी " या नावाने प्रसिद्ध आहेत. श्रीगुरुंच्या सहस्त्रारातील चरणकमलांमधूनच लालरंगसदृश अमृताचे निरंतर क्षरण होत असते. अशा प्रकारे सद्गुरुंच्या चरणारविंदाचे मानसध्यान केल्याने ज्याप्रमाणे चंद्राच्या अमृतमयी किरणांसमान शीतल अशा गुरुपदपद्ममकरंदाच्या सेवनाने सर्व प्रकारची दुःखे, संताप व संसार कोलाहल यांपासून साधक मुक्त होऊन त्यास शांती प्राप्त होते. अर्थात् सर्व अभीष्ट फले त्याला प्राप्त होतात. 
निषक्तमणिपादुकानियमिताघकोलाहलं ।
स्फुरत्किशलयारुणं नखसमुल्लसच्चंद्रिकम् ॥ 
परामृतसरोवरोदितसरोजसद्रोचितं ।
भजामि शिरसिस्थितं गुरुपदारविंदद्वयम् ॥ ६ ॥
६) मस्तकातील पूर्वोक्त पीठामध्ये स्थित असलेल्या सद्गुरुंच्या पदकमलाचे मी ध्यान करतो. पादपद्माशी संलग्न असलेल्या मणिमय पादुकांच्या ध्यानात साधक संसाराच्या तापादि कोलाहलापासून कायमचा निवृत्त होतो. सद्गुरुंचे चरणकमल वृक्षाच्या नवोदित पानांसारखे लालरंगाचे आहेत. तर त्यांच्या चरणांची नखें चंद्रम्याच्या प्रकाशासारखी प्रकाशमान आहेत. हे कमल अमृताच्या सरोवरामध्ये उमलेले आहे. 
पादुकापंचकस्तोत्रं पंचवक्त्राद्विनिर्गतम् ।
षडाम्नायफलं प्राप्तं प्रपचे चातिदुर्लभम् ॥ ७ ॥

७) पंचवक्त्र महादेवाच्या पाच मुखातून हे पादुकापंचक स्तोत्र बाहेर पडलेले आहे. शिवाने कथन केलेल्या सर्व षडाम्नाय स्तोत्रांप्रमाणे याच्या पठणाने व श्रवणाने मोक्ष फलप्राप्ती होते; परंतु या मायारचित संसारामध्ये अशा प्रकारची फलप्राप्ती होणे, ही अत्यंत कष्टसाध्य व म्हणूनच दुर्लभ गोष्ट आहे. 
Paduka Panchak Stotra 
पादुका पंचक स्तोत्र 


Custom Search

No comments: